>आचार्य जुन्या ग्रंथांमधील संदर्भांचे शोध घेऊन त्याच्या व्युत्पत्तीकडे, पूर्वसंदर्भावर ते लेखन करतात तसेच जुन्या पोथ्या-पुराणे, धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे यांच्यांतील त्यातील अनेक आवृत्त्यांचा ते संदर्भ लावतात.< या वाक्यावरून काहीच बोध होत नाही. संदर्भाच्या शोधाची व्युत्पत्ती आणि संदर्भाचे पूर्व संदर्भ म्हणजे काय? आवृत्त्यांचा संदर्भ हा काय प्रकार आहे? आणि पोथ्या-पुराणे, धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे यांच्या आवृत्त्या नसतात. तर त्या आवृत्त्यांचा संदर्भ कसा काय लावणार?

मी लिहिलेल्या मूळ या वाक्यात ‘शब्द’ हा शब्द होता, तो गाळण्याचे काही कारण नव्हते. खरे मी लिहिलेले लिखाण उलटवण्याची अजिबात गरज नव्हती. ते वाक्य असे होते. ’त्या शब्दाचा, त्यानिमित्ताने त्यामागे दडलेल्या पुराणकथांचा व त्यांच्या विविध आवृत्त्यांचा ते शोध घेतात.’ पुराणांच्या आवृत्त्या नसतात, पुराणकथांच्या असू शकतात. पुराणिक आणि अन्य वक्ते पुराणकथांचा आधार घेऊन स्वतःच्या शब्दांत स्वरचित गोष्टी सांगत असताना आपोआपच पुराणकथेची नवी आवृत्ती बनते.

वा.ना. आचार्य यांच्या कथांची शीर्षके (कारुण्यकोकिळा, सत्यपीरेर भ्रमण-काहिनी, कुशीलव, कलीचा धांडोळा, हास्ययोग कृष्ण), त्यांचे पुस्तकांच्या नावातले ‘ध्वनितांचें केणें’, ‘अम्लान’ हे आणि मा.ना. आचार्य यांनी वापरलेले अनेक ‘शब्द’ सामान्य माणसाने कधी ऐकलेले नसतात. त्यामुळे मी लिहिलेल्या मूळ लेखातील ‘शब्द’ महत्त्वाचा होता.

मला वाटते की, नातूंनी केलेले बदल पुन्हा एकदा उलटवायला पाहिजेत... (चर्चा) २३:५५, २१ जून २०१६ (IST)Reply

नमस्कार ज,
दोन्ही वाक्ये येथे दिल्यास वरील उताऱ्याचा अर्थबोध होईल, तरी ती वाक्ये येथे उद्धृत करावीत ही विनंती.
पुराणांच्या आवृत्या नसतात हे बरोबर नाही. अनेकदा मूळ लिखाण (पुराणातील किंवा इतरही) सोपे करुन लिहिण्याचा प्रयत्न करीत असताना त्यात बदल होणे साहजिकच आहे. तरी आपले हे विधान पटत नाही.
कोणता शब्द वगळला गेला? कथांच्या शीर्षकातील का? असे असल्यास ती शीर्षके लिहिण्यास हरकत नाही. वरील त्रोटक टीकेवरुन काहीच कळत नाही तरी आपले मुद्दे कृपया उदाहरणासह विस्तृत करावेत ही सुद्धा विनंती
अभय नातू (चर्चा) ०४:४८, २२ जून २०१६ (IST)Reply

लेखातले मूळ वाक्य असे होते :-

एखादा फारसा परिचित नसलेला शब्द आचार्यांच्या कानांवर पडला किंवा त्यांच्या वाचनात आला की, त्याच्या व्युत्पत्तीकडे, पूर्वसंदर्भाकडे ते वळतात. मग जुन्या पोथ्या-पुराणे, धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे यांच्याकडे त्यांची दृष्टी जाते आणि त्या शब्दाचा, त्यानिमित्ताने त्यामागे दडलेल्या पुराणकथांचा व त्यांच्या विविध आवृत्त्यांचा ते शोध घेतात.

या वाक्यातील ‘शब्द’ हा शब्द महत्त्वाचा होता.

पुराणासारख्या प्राचीन ग्रंथांची पुनर्मुद्रणे होतात, फारतर पुनर्मांडणी होते, पुराणातील उतारा देताना गाळणी लावून काही मजकूर गाळला जातो, पण मूळ ग्रंथाची नवीन आवृत्ती निघत नाही. असे असते तर मनुस्मृतीच्या नव्या आवृत्त्या निघाल्या असत्या आणि त्या स्मृतीबद्दलचे वाद निर्माण झालेच नसते.

डॉ. वा.ना. आचार्य यांच्या शिक्षणाबद्दल आणि वास्तव्याबद्दलची माहिती वगळण्याचे काही कारण नव्हते. ... (चर्चा) १०:०९, २२ जून २०१६ (IST)Reply

"मा.ना. आचार्य" पानाकडे परत चला.