चर्चा:महाराष्ट्र विधानसभा सदस्य
Untitled
संपादनभाषांतर पूर्ण झाले आहे. कृपया इंग्रजी त्यातुन वगळावे.त्यापूर्वी कोणीतरी तपासावयास हवे. या लेखात अशी सुचना लावावयास हवी असे वाटते.:या लेखाचे इंग्रजीतुन मराठीतुन भाषांतर केल्या गेले आहे. नावांचे भाषांतर बिनचुकपणे करण्याच पूर्ण प्रयत्न केल्या गेला आहे. तथापि अचुक माहितीच्या अभावी त्यात काही दोष राहिल्या गेल्याचा संभव आहे.तो कुणी निदर्शनास आणल्यास ते लेखन तपासुन त्यात दुरुस्ती त्वरीत केल्या जाईल.
वि. नरसीकर (चर्चा) १४:३९, २४ नोव्हेंबर २००९ (UTC)
- लेखातील नावे एकाच format मध्ये असावी - उदा. नाव, मधले नाव, आडनाव किंवा आडनाव, नाव, मधले नाव अन्यथा वाचणार्याचा, विशेषतः अमराठी वाचकांचा, गोंधळ होईल.
- मी यासाठी काल केलेले बदल उलटवले गेलेले दिसतात.
- अभय नातू १६:११, २४ नोव्हेंबर २००९ (UTC)
मी ते केले नाही. कोणी उलटविले असल्यास मला माहित नाही.मी फक्त काही इंग्रजी नावे गाळली.
मला वाटते ज्या प्रकारे उमेदवारीच्या फॉर्म मध्ये नाव भरल्या गेले ते त्या प्रकारे निवडणुक आयोगाच्या वेबसाईटवर येते. त्याचेच भाषांतर आपण करीत आहोत. तेथे ज्या प्रकारे इंग्रजी नाव आले तसेच आपण घेतले आहे असे या लेखावरुन दिसते. माहितगार यांच्या विनंतीवरुन मी फक्त भाषांतर केले आहे. आपण म्हणता त्याप्रकारे मुळ लेखकाने त्यात ते बदल करावयास हवे. मला व्यस्तता आहे.
वि. नरसीकर (चर्चा) १६:४४, २४ नोव्हेंबर २००९ (UTC)
- मला वाटते ज्या प्रकारे उमेदवारीच्या फॉर्म मध्ये नाव भरल्या गेले ते त्या प्रकारे निवडणुक आयोगाच्या वेबसाईटवर येते. त्याचेच भाषांतर आपण करीत आहोत
- नुसत्या भाषांतरापेक्षा वाचकाच्या माहिती/ज्ञानात भर पडणारा मजकूर असल्यास उत्तम. जो येथे येतो तो निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही जाऊ शकतो. प्रमाणबद्ध माहिती असल्यास त्याचा उपयोग जास्त होतो हे तुम्हीही मान्य करालच. शिवाय मूळ माहितीसाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाचा दुवा द्यावा म्हणजे दोन्ही प्रकारची माहिती वाचकाला मिळेल. तुम्ही केलेल्या भाषांतराचा जास्त उपयोग होईल.
- असो, आज ना उद्या कोणीतरी हे काम करेलच.
- अभय नातू १७:१२, २४ नोव्हेंबर २००९ (UTC)
- या लेखात Find and Replace वापरून थोडेफार मराठीकरण करण्यात आले होते त्यात मी पण थोडा हातभार लावला पण लेखाच महत्त्व लक्षात घेता त्यातील व्यक्तिनामांचे Find and Replace वापरूनचे मराठीकरन टाळले जावयास होते. या बाबतीतील माझ्या विनंतीस प्रतिसाद देऊन नरसिकरांनी मराठीकरण पूर्ण केल. नरसिकरजी हे एक उत्कृष्ट टिम मेंबर आहेत त्यांना माझे मःपूर्बवक धन्यवाद.,
- अभय नातूंनी म्हटल्याप्रमाणे इतर सदस्यही या लेख सुधारण्यात निस्श्चित भर घाल्तील असा विश्वास आहे. माहितगार ०५:३१, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)
महाराष्ट्र विधानसभा सदस्य/तात्पुरत पान
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ लेखातुन मी विजयी उमेदवारांची यादी तयार केली आहे व सध्या महाराष्ट्र विधानसभा सदस्य/तात्पुरत पान ह्या पानावर हि माहिती ठेवली आहे. जर तयार केलेले पान आणि ह्या लेखा मागचा उद्देश सारखाच असेल तर आपल्याला लेख रीप्लेस करता येईल. Maihudon ०७:१६, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)