चर्चा:महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू

मराठी भाषा, साहित्य संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी आणि विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने 19 नोव्हेंबर, 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. अशा तऱ्हेच्या मंडळाची मूळ संकल्पना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण यांची होती. संपूर्ण भारतात राज्य पातळीवर स्थापन करण्यात आलेले साहित्य-संस्कृतीविषयक कार्य करणारे हे पहिलेच मंडळ होय. मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे होते.

1) मंडळाचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्राची भाषा, साहित्य, संस्कृती आणि इतिहास हे विषय तसेच कला, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्यासाठी विविध वाङ्मयीन योजनांना चालना देणे, मदत करणे व अशा योजना मंडळाने स्वत: हाती घेणे हे साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शासनाने मंडळाकडे सोपविलेली वरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधनस्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथांची भाषांतरे स्वस्त किंमतीत मराठी वाचकांना उपलब्ध करून देण्यावर मंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. मंडळाच्या साहित्य संवर्धनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी मंडळामार्फत खालील योजना/उपक्रम राबविले जातात :-

(2) प्रमुख योजना/उपक्रम (1) मंडळाची पुस्तक प्रकाशन योजना - वैचारिक, समीक्षात्मक, चरित्रात्मक, ऐतिहासिक, शास्त्रीय, वाङ्मयीन इत्यादी विषयांवरील ग्रंथ प्रकाशित करणे (2) उत्कृष्ट ग्रंथांच्या भाषांतराची योजना (3) ललित व ललितेतर वाङ्मयाच्या प्रकाशनार्थ अनुदान योजना (4) नवलेखक उत्तेजनार्थ अनुदान योजना (5) नवलेखक कार्यशाळा अनुदान योजना (6) साहित्य संस्थांना अनुदान योजना (7) नियतकालिकांना अनुदान योजना (8) महाराष्ट्राचे शिल्पकार योजना (9) स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना (10) विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार योजना (11) श्री.पु. भागवत पुरस्कार योजना (12) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनुदान योजना (13) अन्य मराठी साहित्य संमेलनांना अनुदान योजना (14) मंडळाच्या ग्रंथांचे ई-बुक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून वरील योजनांप्रमाणेच वेळोवेळी वैविध्यपूर्ण वाङ्मयीन उपक्रम राबवले जातात.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे संकेतस्थळ - www.msblc.maharashtra.gov.in


इतरत्र असलेला मजकूर येथे हलवला. योग्य त्या विभागात घालावा ही विनंती.

अभय नातू (चर्चा) २१:०५, १८ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

"महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ" पानाकडे परत चला.