चर्चा:मराठवाडा
इतरत्र सापडलेला मजकूर
संपादनइतरत्र सापडलेला मजकूर योग्य संपादने करुन या लेखात घालावा. --अभय नातू (चर्चा) २२:३८, २४ सप्टेंबर २०२२ (IST)
मराठवाड्यातील पारंपरिक व्यवसाय समाजात वेगवेगळया कला अवगत असणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यामुळे ज्यांना जी कला अवगत आहे, त्यानुसार त्या व्यक्तीला ते काम देण्यात आले. म्हणजेच त्याच्या त्याच्या कौशल्यावरून त्याचा त्याचा दर्जा त्याला बहाल करण्यात आला. हे कारागीर पूर्वी विविध कलाकुसरीची कामे करत. आजही याप्रकारची कामे होताना दिसतात. मराठवाड्यात अनेकविध प्रकारचे व्यवसाय चालत असलेले आढळून येतात. हे व्यवसाय आपापल्या सोयीसाठी व आपापसातील गरजा भागविण्याचे काम या व्यवसायांमुळे होऊ लागले. या पारंपरिक व्यवसायामध्ये सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, परीट, ग्रामजोशी शेती कसणारा शेतकरी अर्थात कुणबी या समुदायांचे व्यवसाय पारंपरिक पद्धतीने आजही सुरू असलेले दिसतात. या मराठवाड्यातील समूहाचे काम हे श्रमाचे आहे. तसेच कौशल्याचे आहे. आणि आजही या कामांना महत्त्वाचे स्थान आहे. यांना आजही बलुतेदार म्हणून संबोधले जाते. पूर्वीपासूनच ग्रामव्यवस्थेत बलुतेदारांना महत्त्वाचे असे स्थान होते. गावगाडा स्वयंपूर्ण असणे म्हणजे त्या अर्थव्यवस्थेला वेगळे महत्त्व असे. यातूनच गावगाडा आणि ग्रामीण भारत स्वयंपूर्ण होता असे सिद्ध करता येते. बलुतेदारांच्या या पारंपरिक व्यवसायाने, कौशल्याने तसेच कलेने गावात समृद्धता आणि संपन्नता आली. त्याचबरोबर शेतीविषयक व कौटुंबिक जीवन सुकर झाले. परंतु इंग्रजी अमलात इंग्रजांनी हिंदुस्थानात आपली बाजारपेठ बनविल्याने यंत्रयुगातील त्यांच्या कारखान्यातील सुबक वस्तू, कापड, हत्त्यारे व अवजारे येथे आली. त्यामुळे ग्रामीण भागातील कारागिरांनी बनविलेल्या वस्तूंची मागणी कमी झाली. पर्यायाने ग्रामीण भागातील या कारागिरांचा पारंपरिक व्यवसाय अडचणीत आला व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आपणास हे विसरता येणार नाही की, पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या व्यवस्थेने संपन्नता त्याचबरोबर सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक सुबत्ता टिकवून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. व्यवसायिकांची भाषा: प्रत्येक व्यवसायिकांची भाषा त्यांच्या त्यांच्या व्यवसायाशी जवळीक साधणारी असते.त्याचबरोबर भाषेवर भौगोलिक परिस्थिती व त्या ठिकाणचे वातावरण यांचाही परिणाम होत असतो. ज्या भाषेच्या साहाय्याने समष्टीतला व्यवहार साधला जातो, हीच भाषा संस्कृती, जात आणि व्यवसाय यानुसार समाजात आपले गट निर्माण करते.अर्थात भाषा ही विविधरुपी असते.त्याचे कारण म्हणजे म्हणजे व्यवसायिकांची भाषा त्यांच्या त्यांच्या व्यवसायानुसार वेगळी असते. त्याचे कारण त्यांच्या भाषेमध्ये व्यवसायातील विशिष्ट शब्द वापरून आपली कार्यपद्धती प्रकट करत असते.म्हणून ग्रामरचनेमध्ये त्या त्या समाजाच्या व्यवसायाच्या स्वरूपावरून भाषेची जडणघडण होते.याच भाषेने समाजव्यवस्थेतील भाषेत अनेक नवनवीन भाषिक परिमाणे दिली आहेत. यावरून आपणास व्यवसाय आणि भाषा हे समीकरण ग्रामीण बोली आणि मराठी भाषा अत्यंत जवळचे आहे असे म्हणावे लागते.