असलेली / असलेले संपादन

खाली दिलेल्या वाक्यात "असलेली" बरोबर आहे का "असलेले" बरोबर आहे?

  1. बेल्हे जुन्नर तालुक्यातील एक मोठी बाजार पेठ असलेली मोठ्ठ गाव आहे.
  2. बेल्हे जुन्नर तालुक्यातील एक मोठी बाजार पेठ असलेले मोठ्ठ गाव आहे.

माझ्यामते क्रमांक २ बरोबर आहे. त्याचे कारण यस्मिन शेख यांच्या लेखात वाचता येईल.

https://www.loksatta.com/navneet/gender-in-marathi-nouns-marathi-language-learning-zws-70-2831275/

नामाचे जे लिंग असेल तेच सर्वनामाचे लिंग असते.

Shantanuo (चर्चा) १२:१८, २६ एप्रिल २०२२ (IST)Reply

बरोबर आहे.- संतोष गोरे ( 💬 ) १५:२६, २६ एप्रिल २०२२ (IST)Reply
@Shantanuo आणि संतोष गोरे: व्याकरणाच्या दृष्टीने नाही, पण सर्वसाधारण बोलीभाषेमध्ये "बेल्हे जुन्नर तालुक्यातील एक मोठी बाजार पेठ असलेलं मोठ्ठ गाव आहे." असं म्हटल्या जाते. —usernamekiran (talk) १७:४१, ३० एप्रिल २०२२ (IST)Reply
असलेलं असे अनुस्वार असलेले शब्द आपण विकिपीडियावर वापरत नाहीत. संतोष गोरे ( 💬 ) १८:२४, ३० एप्रिल २०२२ (IST)Reply
"बेल्हे" पानाकडे परत चला.