चर्चा:बृहन्महाराष्ट्र मंडळ
अभय नातूंनी परदेशातल्या महाराष्ट्र मंडळांच्या गावांच्या नावांचे जे शुद्धलेखनीकरण केले आहे, त्याच्याशी मी सहमत नाही. गावांची-देशांची नावे स्थानिक परंपरेनुसार लिहायची असतात. मराठी विकिपीडियासाठी स्थानिक म्हणजे महाराष्ट्र-पुणे-सदाशिव पेठ. येथे जसे लिखाण होते ते स्थानिक म्हणून प्रमाण लेखन.
मराठी विकिवर असेच प्रमाण लेखन असायला पाहिजे. हिंदी विकीपीडियावर लंदन, इंग्लैंड, मिस्र (इजिप्त नव्हे!) असे त्यांच्या स्थानिक प्रमाण परंपरेनुसार लेखन हॊते, तर मराठी विकिपीडियावर का नको?
भारत देशावर विविध विकिपीडियांवर जे लेख आहेत, त्यांत अनेकांत भारत शब्द सापडणार नाही, त्याऐवजी Inde, Ndia, Indiya, Yndia, Indie, Indië Indea, Ende, Indya, Indien, Hindistan, Intö, Indija, An India, Yin thu, Inia, Indiska, Igitia, Ubuhindi, Ubuhinde, Eynda, Înde, Índi, Inte, India, यांपैकी एक शब्द त्या त्या भाषेच्या स्थानिक लेखन परंपरेनुसार लिहिलेला आढळेल.
तसेच न्यूयाॅर्क हा शब्द. जेव्हा एखादे गावाशेजारी त्या नावाचे नवे सुखसोयीयुक्त गाव वसते तेव्हा त्या नव्या गावाच्या नावातला न्यू हा शब्द सुटा लिहिला जातो, उदा० नवी दिल्ली, नवे पनवेल वगैरे. तसे नसेल तर न्यू हे अक्षर पुढील शब्दाला चिकटून येते. उदा० न्यूझीलंड, न्यूफाउंडलंड, न्यूगिनी, वगैरे. या नियमाने न्यूयाॅर्क शब्दातला न्यू हा याॅर्कला चिकटून लिहिला पाहिजे. मी अजूनपर्यंत कोणत्याही दर्जेदार मराठी नियतकालिकात न्यू आणि याॅर्कची फारकत केलेली पाहिली नाही.
एअर इंडियाने प्रवास करत असाल तर अापल्या सीटच्या समोर असलेल्या खिशात एअर इंडियाचे मुखपत्र असलॆले एक द्वैमासिक असते, ते पहावे; मी अनेकदा पाहतो. त्यांत न्यूयाॅर्क, नेवार्क(तुमच्या लिखाणनुसार न्यू अर्क!) हे शब्द असेच लिहिलेले आढळतील. ... ज (चर्चा) १६:२५, १ नोव्हेंबर २०१६ (IST)
उत्तर
संपादन१. एर इंडियाच्या साहित्यात अनेक ठिकाणी गचाळ शुद्धलेखन आणि व्याकरण सापडते तरी त्यावर फार भिस्त नको.
२. हिंदी विकिपीडिया (किंवा इंग्लिश, कोरियन, मँडेरिन) वर जे नियम आहेत ते मराठी विकिपीडियावर आणलेच पाहिजे हा आग्रह का? जे नियम तर्कशुद्ध आहेत ते वापरण्यास काहीच हरकत नाही पण तेथे आहे म्हणून येथे पाहिजेच हा हट्ट नको.
३. न्यू.... बद्दलचा आपला तर्क सुसंगत आहे आणि अनेक गावे, शहरे, राज्यांनी तो अंगिकारलेलाही आहे परंतु न्यू यॉर्क यास अपवाद असल्याचे आढळते. न्यू यॉर्क शहर आणि राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर न्यू आणि यॉर्कमध्ये जागा सोडलेली सापडते. त्याची कारणे मला (अजून तरी) माहिती नाहीत पण शोधण्याचा प्रयत्न करेन.
४. अनेकदा मराठीमध्ये रुढ झालेले शब्द त्याकाळच्या इंग्लिशबद्दलच्या अनभिज्ञतेमुळे अशुद्धरीत्या लिप्यंतरित केले गेले. ती चुकीची पद्धत चालू ठेवण्याचे प्रयोजन दिसत नाही.
आपले विचार कळवावे.
महाराष्ट्र मंडळ ॲटलांटा हे विशेषनाम
संपादनमहाराष्ट्र मंडळांची नावे विशेष नाम प्रवर्गात मोडतात. शहरनाम म्हणून अटलांटा हे लेखन कदाचीत ॲटलांटा पेक्षा अधिक सुयोग्य असेल, परंतु तेथील महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर 'महाराष्ट्र मंडळ ॲटलांटा' असे विशीष्ट लेखन असेल तर विशेषनाम या प्रवर्गास लागू पडणाऱ्या शुद्धलेखन नियमाचे पालन व्हावे की होऊ नये अशी शंका आहे.