चर्चा:फोर सीझन्स हॉटेल (मुंबई)

Latest comment: ९ वर्षांपूर्वी by Mahitgar

@अश्विनी सुर्वे:

@अभय नातू: (आपल्या संदर्भासाठी)

या लेखातील काही माहितीस संदर्भ आहेत पण ज्ञानकोशीय उल्लेखनीयता साशंकीत आहे. मला वाटते विकिव्हॉयेज या बंधू प्रकल्पात असा माहिती प्रकाराचे (केवळ प्रवाशांच्या दृष्टीने उपयूक्त) लेखन अधिक सयुक्तीक ठरावे.

खालील वाक्यातून मला ज्ञानकोशीय उल्लेखनीयता फारशी दिसत नाहीए. यातील वाक्यांना यात ज्ञानकोशात उल्लेखनीय असावे असे विशेष काय असा प्रश्न लावून पाहावा असे वाटते.

  • फोर सीझन्स हॉटेल, मुंबई हे वरळी भागातील एक ऐशारामी हॉटेल आहे
  • हे हॉटेल टोरोंटो येथील फोर सीझन्स लक्झरी हॉटेल्सची एक शाखा आहे
  • या पंचतारांकित हॉटेलमध्ये २०२ सूट (एकाधिक खोल्यांची निवासस्थाने) आहेत
  • तसेच भारतातील सर्वात उंच आणि मोकळी हवा असणाऱ्या या फोर सीझन हॉटेलच्या गच्चीवर बारची व्यवस्था आहे (भारतातील सर्वात उंच संदर्भासहीत असेल तर ठिक आहे परंतु 'मोकळी हवा असणाऱ्या' ? प्रत्येक प्रेशर कुकर शिट्टी वाजवतोच. प्रेशर कुकर विषयक लेखात प्रेशर कुकर शीट्टी वाजवतो हा उल्लेख ठिक आहे. प्रेशर कुकरच्या प्रत्येक कंपनीच्या प्रेशर कुकर कशी मंजुळ शिट्टी वाजवतो याची माहिती असेल तरी त्या माहितीचे ज्ञानकोशीय मुल्य नेमके काय ? उल्लेखनीय माहिती आणि जाहीरात यात ज्ञानकोशीय लेखकांनी आणि संपादकांनी फरक करावयास हवा असे वाटते.
  • फोर सीझन हॉटेलची भारतीय उपखंडातील ही पहिली मोठी गुंतवणूक आहे.

फोर सीझन्स हॉटेल, मुंबईचे ३७ मजल्याचे बांधकाम इ.स. २००८ मध्ये पूर्ण झाले. (ठिक)

  • या हॉटेलचे डिझाईन लोहान असोसिएट्सच्या जॉन अर्जरो या हाँग काँग मधील डिझाईनरने, तर आतील संरचना बिलकेम लिंक्स यांनी केली आहे (ठिक)
  • फोर सीझन हॉटेल चे बांधकाम भारतीय संस्कृतीमधील बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून व त्या विचारात घेऊन केले होते. म्हणजे नेमके काय ?
  • फोर सीझन हॉटेलचे बांधकाम १.५ वर्षात पूर्ण झाले त्यात प्रत्येक ८ दिवसांनी एक स्लॅब तयार होत होता. साधारणतः फोर सीझन हॉटेलची वास्तु एक वर्षाच्या आतच पूर्ण झाली. भारतातील सर्वात वेगाने तयार झालेल्या वास्तूंपैकी ही एक आहे. ( हे नेमक केव्हाच बांधकाम आहे ? २१ व्या शतकात हा बांधकामाचा वेगाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता प्रथम दर्शनी साशंकीत वाटते)
  • दिल्ली येथे राहाणारे श्री संजीव गर्ग, जी.एम. अहलुवालिया या कंत्राटदारांनी या वास्तूच्या कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या आहेत. (ज्ञानकोशास याची नेमकी उल्लेखनीयता काय ? )
  • मुंबईच्या फोर सीझन हॉटेलमध्ये ही रेस्टॉरन्टे आहेत :- (पुन्हा तेच की यात ज्ञानकोशीय उल्लेखनीयता कुठे आहे ?)
  • हॉटेलमधील व्यायामशाळेत (जिममध्ये) अत्याधुनिक व्यायामाची साधने आहेत. यात कार्डियोव्हॅस्क्युलर तसेच इतर उपकरणांचा समावेश आहे. येथे योगासने शिकविण्यासाठी गुरू आहेत; या होटेलमध्ये ब्यूटीपार्लर तसेच मालिशकेंद्र आहे. येथे आपोहा मिजरा, ओजस, तुळा, मुक्त, थाई ब्लिस, कु.नए, सोल हार्मनी, हीलिंग हॉटस्टोन यांसारखे आयुर्वॆदिक तसेच पाश्चात्य मालिशचे प्रकार उपलब्ध आहेत. याशिवाय येथे रोझानो फेररटी नावाचेकेश कर्तनालय आहे. हे जाहीरात नाहीत पण जवळ जातात एवढे कमी म्हणून का काय; हॉटेलच्या हाऊस कीपिंग विभागाशी संपर्क साधून व हॉटेल मधील वेळांचे नियोजन करून अतिथीनॆ आपले सूट सदैव स्वच्छ व आल्हाददायक करवून घ्यावेत. " विकिपीडिया ज्ञानकोश आहे का हॉटेलच वेबसाईट आहे ?
  • मी या लेखावर पोहोचलो ते संपादन गाळणी इमाने इतबारे प्राणी वाचक शब्द पकडते म्हणून; हॉटेलची मालमत्ता तसेच परिसर आपल्या प्राण्यामुळे दूषित झाला असेल तर ती स्वछता अतिथींनी केली पाहिजे. , प्राणी भुंकणार नाही, मोठा आवाज करून शेजारील अतिथींना तसेच सार्वजनिक ठिकाणी त्याचा त्रास होणार नाही याची अतिथीने प्रामाणिकपणे काळजी घेतली पाहिजे. '

विकिपीडिया पर आखीर ये हो क्या रहा है :) ?


सदस्य अश्विनी सुर्वे मेहनत खुप करताहेत त्याचे कौतुकच आहे, केवळ जाहीरातीच्या उद्देशातून त्या लेखन करत नसाव्यात असे त्यांचे मागचे लेखन अभ्यासता वाटले होते, काही वेळा एखाद्या विषयाबद्दल पुरेशी ज्ञानकोशीय माहिती मिळत नाही, विकिपीडियास कोणत्याही लेखास २ ज्ञानकोशीय परिच्छेद पुरेसे असावेत पण त्यातील लेखन ज्ञानकोशीयतेच्या पात्रतेस पोहोचले पाहीजे. मेहनत ज्ञानकोशीय परीघात राहील्यास महनतीचे सार्थक होईल. ज्ञानकोशीय नसलेले लेखन आज ना उद्या काळाच्या ओघात वगळले जाईल.

धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०१:३५, १७ एप्रिल २०१५ (IST)Reply

"फोर सीझन्स हॉटेल (मुंबई)" पानाकडे परत चला.