चर्चा:फर्मी राष्ट्रीय प्रयोगशाळा
Untitled
संपादनया लेखाचे नाव फर्मी राष्ट्रीय प्रयोगशाळा असे असावे का?
अभय नातू १५:४२, ३० जुलै २०१० (UTC)
hmm. donno but in english they write Fermi National Accelerator Laboratory (Fermilab) or (FNAL)
अनिकेत जोगळेकर १५:४८, ३० जुलै २०१० (UTC)
shuddhlekhanachya niyaman babteet me confused ahe. yethe uchchar hraswa hoto mhanun hraswa lihawe ka shabdachya shevtee mhanoon deergh? अनिकेत जोगळेकर १५:५४, ३० जुलै २०१० (UTC)
- तुमचे बरोबर आहे (फर्मि असा इंग्लिश उच्चार). सहसा येथे मराठी शुद्धलेखनाचे नियम आपण पाळतो पण नावांबाबत, विशेषतः परभाषेतील नावांबद्दल, अट्टाहास(माझातरी) नाही.
- तरीही फर्मि राष्ट्रीय प्रयोगशाळा असे शीर्षक ठेवीन फर्मिलॅबकडून पुनर्निर्देशन असावे असे माझे मत आहे.
- अभय नातू १६:०८, ३० जुलै २०१० (UTC)
- विशेष नामांबाबत अभय नातूंचा मुद्दा बरोबर अहे की विशेष नामांचे भाषांतर करावे का ? पुढील चर्चेकरिता मी खालील मुद्दे मांडत आहे. कृपया समर्थन वा विरोध नोंदवा माहितगार ०५:३४, ३१ जुलै २०१० (UTC)
- अभारतीय संस्थानामांचे केवळ मराठीकरण(लिपी बदल transliteration) करावे.
- भारतीय व्यक्तिगत मालकीच्या, भागिदारी संस्था, Private Limited Companies [मराठी शब्द सुचवा] आणि Limited Companies मध्ये केवळ Private Limited आणि Limited या शब्दांचेच भाषांतर खासगी मर्यादित आणि मर्यादित असा शब्द वापरून करावे. एंटरप्रायजेस,कंपनी इत्यादी नावात आले तर ते एंटरप्रायजेस,कंपनी असेच ठेवावेत. एंटरप्रायजेस,कंपनी असे शब्द विशेषलामा शिवायच्या लेख मजकुरात आले तरच त्यांचे मराठी भाषांतरीत शब्द वापरावेत.मजकुरात एंटरप्रायजेस,कंपनी चे पर्यायी मराठी शब्द वापरताना [विशिष्ट अर्थ पहा] साचा वापरावा.
- सर्व प्रकारच्या संस्था नामांचे वर्गीकरण करताना शक्य तेवढी भाषांतरीत रूपे वापरावीत
- शासकीय ,निमशासकीय,सहकारी आणि एन.जी.ऑ. संस्थांनामांचे शक्य तेवढे मराठी भाषांतर करावे. हिंदी आणि इंग्रजी नावेसुद्धा लेखा पहिल्या परिच्छेदात आवर्जूनन नमुद करावीत.
- प्रदेश,व्यक्ती नामांचे केवळ मराठीकरण करावे भाषांतर करू नये
in general, मुद्दे चांगले आहेत. पण पहिल्या मुद्द्याविषयी थोडी विस्तृत चर्चा आवश्यक वाटते. खाली एक उदाहरण देत आहे. सर्न (CERN) या नावाने प्रसिद्ध असलेल्या युरोपातील प्रयोगशाळेच्या या नावाचे पूर्ण रूप Conseil Européen pour la Recherche Nucléaire असे आहे. "अभारतीय संस्थानामांचे केवळ मराठीकरण(लिपी बदल transliteration) करावे" हा नियम वापरावयाचा झाल्यास फ्रेंचचे transliteration करावे लागेल. मात्र खुद्द इंग्रज असे करताना दिसत नाहित. CERN ची website द्वैभाषिक असून त्यावर इंग्रजीमध्ये the European Organization for Nuclear Research असे लिहिलेले अहे (council ची organisation झाल्यामुळे सद्ध्याचे फ्रेंच नाव Organization Européen pour la Recherche Nucléaire असे आहे). मात्र सर्न हे लघुरूप जणू विशेष नामाप्रमाणे असल्याने तसेच ठेवले आहे. (http://public.web.cern.ch/public/fr/About/Name-fr.html हा दुवा पाहा). या उदाहरणावरून वाटते की केवळ transliteration योग्य नाही. अनिकेत जोगळेकर ०९:०७, ३१ जुलै २०१० (UTC)
माझ्यामते संस्थानामांचे भाषांतर करावे पण त्यातील विशेष नामांचे (देश, व्यक्ती इ.) यांचे केवळ transliteration करावे. हा नियम वापरण्यास काही counter example येत असल्यास जरूर नमूद करावे. अनिकेत जोगळेकर ०९:१५, ३१ जुलै २०१० (UTC)
एक counter example मलाच आठवले: माझ्या नियमाप्रमाणे University of Washington व Washington University या दोन स्वतंत्र संस्थांच्या भाषांतरात गोंधळ होईल. ह्या आणि अशाच similar cases मध्ये गोंधळ होइल. :(
अनिकेत जोगळेकर ११:४३, ३१ जुलै २०१० (UTC)
विशेषनाम, इ
संपादनविशेषनामांचे भाषांतर करू नये पण नावातील अविशिष्ट संज्ञांचे भाषांतर करावे. Rocky Mountains चे रॉकी पर्वतमाला केल्यास बरोबर पण Rocky Mountain National Park चे रॉकी माउंटन नॅशनल पार्क (किंवा रॉकी माउंटन राष्ट्रीय उद्यान) हेच बरोबर राहील. वरील उदाहरणात Fermi Lab या नावातील Lab ही संज्ञा प्रयोगशाळा या generic उद्देशाने वापरली गेल्याचे गृहीत धरले आहे म्हणून फर्मी राष्ट्रीय प्रयोगशाळा बरोबर राहील. हेच Bell Labs ला लागू होणार नाही. त्याचे भाषांतर बेल लॅब्स असेच करायला हवे.
अभय नातू ०३:४४, १ ऑगस्ट २०१० (UTC) ता.क. Washington University, University of Washington यांचे भाषांतर अनुक्रमे वॉशिंग्टन विद्यापीठ व वॉशिंग्टनचे विद्यापीठ असे होईल? :-) माझ्या मते यांची नावे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी तसेच युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन अशीच असायला हवी. गोंधळात भर म्हणून WUSTL (वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऍट सेंट लुइस)सुद्धा आहे!
- एक अडचण अशी कि National शब्दाचे भाषांतर राष्ट्रीय असे होत असले तरी केवळ फर्मि या शब्दावरून हि भारतीय संस्था आहे का अभारतीय संस्था आहे याचा बोध होत नसताना सर्व सामान्य वाचकास केवळ राष्ट्रीय शब्दावरून भारतीय संस्था आहे असा हगैर समज होऊ नये या संदर्भाने काही किमान काळजी घ्यावयास हवी. ०६:०४, २ ऑगस्ट २०१० (UTC)