विकिकरण साचा आणि पृष्ठाची वर्गवारी बाबत

संपादन

नमस्कार..

१) मी माझे हे पहिलेच विकिपीडिया पृष्ठ बनवले असून प्रचालकांनी यावर विकिकरण साचा लावला आहे. त्यानंतर मी या साच्याचा मदत विभागात जाऊन माझ्या लेखात आवश्यक ते बदल केले आहेत. तरी आपणांस विनंती आहे, हा साचा काढण्यासाठी अजून काय करणे गरजेचे आहे याची माहिती दिली तर मी अजून जे बदल असेल ते करू शकतो.

२) या पृष्ठास आयुर्वेद आणि वैद्यकीय पेशामधील व्यक्ती या प्रकारात वर्ग करण्यात यावे हि विंनती.

धन्यवाद. कल्पेशशिंदे (चर्चा) २१:२३, २ ऑगस्ट २०२४ (IST)Reply

नमस्कार,
मराठी विकिपीडियावरील तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद.
प्रस्तुत लेखाबद्दल अनेक गोष्टी बदलता येतील. त्यातील काही --
  1. उल्लेखनीयता -- या व्यक्तीची उल्लेखनीयता स्पष्ट नाही. आयुर्वेदाचार्य किंवा डॉक्टर असणे ही पुरेशी नाही. तरीसुद्धा त्यांचे सामाजिक कार्य आणि पुरस्कार लक्षात घेता आणि अधिक महत्वाेच म्हणजे मराठी विकिपीडियाचे आत्तापर्यंतचे धोरण सर्वसमावेशक असल्याने हा लेख असण्यावर इतरांकडून आक्षेप येऊ नये.
  2. बदलांनतरही लेख जाहिरातीसमान वाटतो, विशेषतः सामाजिक कार्य या विभागात. जुजबी, वाचकाला उपयोगी अशीच माहिती असावी.
  3. अनुल्लेखनीय गोष्टी टाळाव्यात, उदा. - प्रवीण बढे यांच्या सामाजिक कार्याची दाखल घेऊन जोश टॉक्स या प्रसिद्ध मीडियाने... यात दोन्ही पक्षांची उल्लेखनीयता एकमेकांनीच उचलून धरल्याची दिसते. जॉश टॉक्स हे प्रसिद्ध असल्याचा संदर्भ नाही. नक्कीच प्रसिद्ध असल्यास (उदा. महाराष्ट्र टाइम्स, बीबीसी,...) त्यांना प्रसिद्ध हे विशेषण लावण्याची गरज पडत नाही!
  4. फक्त महत्वाची माहिती घालावी, उदा. त्यांच्या शिक्षणाची प्रत्येक पायरीचे वर्णन नसले तरी चालेल. अर्थात, उल्लेखनीय व्यक्ती (सचिन तेंडुलकर, बराक ओबामा) यांच्याबद्दल हे लागू होत नाही कारण वस्तुविषयाशी संबंध आल्याने अशा संस्थांचे महत्व वाढते.
असो, हे काही मुद्दे. हे बदल कराल ही विनंती आणि इतर ही लेख लिहाल ही आशा.
अभय नातू (चर्चा) २३:४८, २ ऑगस्ट २०२४ (IST)Reply
आपण केलेल्या अमूल्य मार्गदर्शनासाठी धन्यवाद.. नवीन सदस्याला एवढी विस्तृत माहिती आपण दिली त्यामुळे मराठी विकिपीडियावर अजून लेख लिहायला आणि संपादन करण्यास मला पुढे मदत होईल.
आपण सुचविल्याप्रमाणे मी सदरील लेखात शक्य ते बदल केले आहेत. अनावश्यक मजकूर वगळला गेला असून व्याकरण, शुद्धलेखन ई. दुरुस्त्या केल्या आहेत. माझी आपणांस विनंती आहे कि आपल्या वेळेनुसार आपण हा लेख एकदा तपासून या लेखास लावलेला विकिकरण हा साचा काढणे शक्य असल्यास मदत करावी हि विनंती.
सदरील लेख हा आयुर्वेद आणि वैद्यकीय पेशामधील व्यक्ती या दोन प्रकारात समाविष्ट करता येईल का? आपल्या मराठी विकिपीडिया नियमांनुसार आपण तपासून योग्य ती वर्गवारी करावी अशी आपणांस विनंती आहे.
धन्यवाद. कल्पेशशिंदे (चर्चा) १९:१६, ३ ऑगस्ट २०२४ (IST)Reply
"प्रवीण बढे" पानाकडे परत चला.