चर्चा:पुरस्कार
पुनरावृत्ती
संपादन"शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचा ’शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार’ : निशांत शेख यांना"
याची लेखात पुनरावृत्ती झाल्याचे दिसले. गरज नसेल तर एक वगळण्यात यावे. -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:४६, २८ ऑक्टोबर २०१३ (IST)
- या लेखात एव्हढ्या पुरस्कारांची यादी असावी का? - प्रबोध (चर्चा) ०३:१२, २९ ऑक्टोबर २०१३ (IST)
मोठा लेख
संपादनहा लेख बराच मोठा झाला आहे.त्याने तो उघडण्यासही वेळ लागतो.तो(लेखकास) संपादनासही त्रासदायक ठरतो. यातील उप-मथळ्यांचे वेगळे लेख करावेत म्हणजे सोपे होईल असे वाटते(नकल-डकव करून).त्या मथळ्याखाली{{main|लेखाचे नाव}} असे लावता येईल.त्याने त्या उपलेखास दुवा मिळेल.अर्थात, ही विनंती आहे.मानावयासच हवी असे नाही.--वि. नरसीकर १०:३६, ५ डिसेंबर २०१३ (IST)--वि. नरसीकर
- आता सुमारे ६,८४,०५५ बाइट्स
लेखातून अकारण वगळलेला मजकूर
संपादनव्यक्तिनामाच्या आधी किंवा नंतर पद्म पुरस्काराचा लिखित उल्लेख करता येत नाही. त्या व्यक्तीला असा पुरस्कार मिळाला आहे असा उल्लेख केवळ बोलताना, भाषण करताना किंवा व्यक्तिवृत्त(Biodata) लिहिताना करता येतो. असाच प्रकार विद्यापीठांनी दिलेल्या डी.लिट. या सन्मानार्थ दिलेल्या पदवीचा आहे. ही पदवी मिळवण्यासाठी कोणताही अभ्यास करावा लागत नाही, परीक्षा द्यावी लागत नाही किंवा जगावेगळे असे काही काम करावे लागतेच असे नाही. ही पदवी मिळालेल्या व्यक्तीच्या नावाआधी डॉ.(डॉक्टर) असे लिहिण्याची प्रथा तर सर्वथैव अयोग्य आहे. एखाद्या राजकारणी माणसाला ही मानाची डॉक्टरेट एका विद्यापीठाकडून मिळाली की अन्य विद्यापीठांमध्ये त्याच व्यक्तीला डी.लिट. देण्याची स्पर्धा लागते. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मराठवाडा विद्यापीठ हे या बाबतीत माहीर आहेत. हाच प्रकार परदेशी विद्यापीठे करतात. येडियुरप्पा हे कर्नाटकातले एक उघड उघड साचा:येथील संदर्भहीन चारीत्र्यहनन शब्द वगळला राजकारणी आहेत. त्यांना अमेरिकेतील मिशिगन राज्यातील सॅगिनॉ व्हॅली राज्य विश्वविद्यालयाने डी.लिट. दिली आहे. कां, तर यापूर्वी सॅगिनॉच्या अध्यक्षाला म्हैसूर विश्वविद्यालयाने, प्रा. डी. मदैय्या या उपकुलगुरूंच्या कारकिर्दीत डी.लिट. दिली होती, या परतफेडीच्या भावनेने. सन्माननीय पदव्यांच्या बाबतीत विद्यापीठांचे असे साटेलोटे चालते. त्यामुळे यापुढे कधी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर असे शब्द वाचनात येतील तेव्हा ते लिखाण गैर आहे असे समजावे.... ज (चर्चा) ११:०७, ३० मार्च २०१९ (IST)