अभ्यवेक्षण कि सेंसॉरशीप संपादन

परिभाषा कोशातील परिभाषिक शब्दांचा शोध मनोगत कृपेने आंतरजालावर आता थोडा सुसह्य झाला आहे, त्याचा उपयोग करून मी मराठी विकिपीडियावर आणि विकिक्वोटवर सेन्सॉरशिप एवजी अगदीच अप्रचलित परिनिरीक्षण शब्द वापरला. खरे तर अभ्यवेक्षण हा शब्द मलाही भाषेत वापरण्याच्या दृष्टीने क्लिष्ट वाटतो आहे. गूगलवर शोध घेतलातर लोकसत्तातील एका अपवादात्मक बातमीशिवाय इतर कुठेही वापरलेला आढळत नाही.
कोणते वापरावे ?माहितगार ०८:१३, २८ जून २०१० (UTC)

अभ्यवेक्षण हाच शब्द ठेवावा. रुळण्यास वेळ लागेल पण तो मराठी आहे हे ही नसे थोडके. असे अनेक शब्द योजवयास हवे. हळूहळू ते रुळतील. सेन्सॉरशिप हा शब्द अनेक वेळा कानावर पडल्याने तो सोपा वाटतो हे एक कारण आहे. अभ्यवेक्षण ची पण कालांतराने सवय पडेल. वि. नरसीकर (चर्चा) ०८:४२, २८ जून २०१० (UTC)

  • वरील मताशी सहमत, मराठी शब्दही रुळतील, सवय होईल. Gypsypkd ११:४१, २८ जून २०१० (UTC)
अभ्यवेक्षण अशा क्लिष्ट, भारदस्त शब्दाऐवजी दुसरा मराठी शब्द योजता येणार नाही का?
मुस्कटदाबी, काटछाट, मल्लीनाथी हे काही शब्द वानगीदाखल.
अभय नातू १५:२८, २८ जून २०१० (UTC)

परिनिरीक्षण संपादन

चित्रपट-नाटकांच्या सेन्सॉरसाठी परिनिरीक्षण(करणे) आणि सेन्सॉरबोर्डासाठी परिनिरीक्षण मंडळ हे दोन्ही शब्द नेहमीच्या वाचनातले आहेत. गूगलवर शोध घेऊन खात्री करून घेतली आहे. सेन्सॉरशिपकरिता परिनिरीक्षण हे नाम वापरायला काहीही हरकत नाही. अभक्ष्यवेक्षण हा शब्द कधीही रूढ होणार नाही. --J १८:०९, २८ जून २०१० (UTC)

हो असे दिसते खरे, पण परिनिरीक्षण हा पारिभाषिकशब्द तयार करताना Peer review या अर्थाने आधी हिंदी संघशासकीय कामात आला आणि तो महाराष्ट्रीयनांनी उचलला असे दिसते या अभ्यवेक्षणची व्यूत्पत्ती माहित नाही पण अर्थछटेत सूक्ष्मभेद असावा असे वाटते. censor या शब्दाची Etymology From Latin cēnsor < censere (“‘to tax, assess, value, judge, consider, etc.’”).

तरीसुद्धा परिनिरीक्षण हा रूळण्यासारखावाटत असल्यामुळे परिनिरीक्षण शब्द निवडावा असे माझेही मत होत आहे.any openions ? माहितगार १५:५६, ३० जून २०१० (UTC)

  हे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.
जर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.
"परिनिरीक्षण" पानाकडे परत चला.