चर्चा:नारायण विष्णु धर्माधिकारी
लेखातील एक वाक्य आहे: ’या कामासाठी त्यांनी ६४ वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली’. ६४ वर्षांपूर्वी असे लिहिण्यापेक्षा नक्की वर्ष लिहिता येईल का? अजून पाच वर्षांनी जर कोणी हा लेख वाचला तर ’६४ वर्षांपूर्वी’ ही माहिती चुकीची असेल. संभाजीराजे १२:१६, ९ डिसेंबर २००९ (UTC)
योग्य प्रतिरियेबद्दल धन्यवाद. दुरुस्ती केली आहे. Girish2k १३:३९, ९ डिसेंबर २००९ (UTC)
रेवदंड्यातील श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीचा पत्ता मिळाल्यास तिथे पोचणे शक्य होईल. --महेंद्र परांजपे
शीर्षक स्थानांतरण विनंती
संपादनवि.पि. नियमाप्रमाणे नारायण विष्णु धर्माधिकारी या पानाकडे पुनःनिर्देशित करा.
- उपरोक्त सही केलेला संदेश सदस्य:Bodkhe यांचा असावा
ओळीत पडताळण्या जोगे संदर्भ हवेत
संपादन@ज आणि Alibaug: @Girish2k आणि Vinod rakte: @SB Dev आणि Aditya warkhede: @संभाजीराजे आणि Bodkhe: @Mahendraparanjpe:
आपणा सर्वांच्या या लेखातील योगदानाबद्दल आभार. वस्तुत: विकिपीडियात संदर्भ हे ओळीत नमूद केले जाणेच अभिप्रेत असते. हा लेख आणि लेखाचा इतिहास अभ्यासता संदर्भ हे ओळीत नमूद केले जाणे आणि लेख मजकुर वगळण्यापुर्वी चर्चा पानावर चर्चा केली जाण्याची निकड प्रथमदर्शनी प्रकर्षाने जाणवते आहे.
पुढील संपादनांपुर्वी उपरोक्त बाबीत सहकार्यासाठी विनंती, आभार आणि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:४५, २२ डिसेंबर २०१५ (IST)
धर्माधिकारी हे धंदेवाईक संत होते हे पटवून देणारे अॅड. डी.के. खानविलकर यांचे २६ मार्च २०१३ चे मूळ पत्र
संपादननाना धर्माधिकारींचे स्मारक कशासाठी ?
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मी व्यवसायाने वकील असून ९० वर्षांचा आहे. मी अलिबागमध्ये रहात आहे. मी आमदार ते मंत्री अशी महत्त्वाची पदे सांभाळली आहेत.
हे पत्र तुम्हाला कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे बद्दल लिहीत आहे. त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण किताब मिळाला. त्यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले. रेवदंडा शाळेत ते माझ्याबरोबर होते. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हस्तसामुद्रिक (हात पाहून भविष्य सांगणे) हा होता. वडील वारल्यानंतर तो व्यवसाय त्यांनी सुरू ठेवला. त्या व्यवसायामुळे त्यांच्याकडे बरेच लोक येऊ लागले. सुरुवातीला ते हात पाहून भविष्य सांगत. नंतर हात न बघता डोळे बंद करून आपण जणू काही ईश्वरासोबत बोलत आहोत असे त्यांच्याकडे निवेदन घेऊन येणार्या माणसाची समजूत होत असे. त्यांच्या या तंत्रामुळे त्यांच्या भक्तसंख्येत भरपूर वाढ झाली. हळूहळू राजकीय नेतेही त्यांच्याकडे येऊ लागले आणि त्यांच्या सभेत लाखाने लोक जमू लागले. धर्माधिकारी हे जणू काही ईश्वराचे अवतार आहेत अशी लोकांची समजूत झाली.
रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी नाना धर्माधिकारी यांचे स्मारक करणेबाबत माझ्याशी कधीही चर्चा केली नव्हती. भूमिपूजेच्या कार्यक्रमाची पत्रिका जेव्हा माझ्याकडे आली त्यावेळी मला स्मारकाबद्दल कळाले. भूमिपूजनानंतर शरद पवार यांना मी एक पत्र लिहिले नानांना पद्मविभूषण किताब द्यावा असा एक प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याबाबत दिल्लीहून अलिबाग येथे इंटिलिजन्स ब्युरोकडे तपासायला आला. त्याचा अहवाल दिल्लीला नकारात्मक केल्याचे मला कळले. म्हणून मी शरदरावांना पत्र लिहून असे कळवले की दिल्लीत पोहचलेल्या अहवालाची माहिती त्यांनी द्यावी आणि माझी माहिती खरी असल्यास नानांच्या स्मारकाचे काम करू नये.. त्याची एक प्रत सुनील तटकरे यांनाही पाठवली. वास्तविक शरदरावांना लिहिलेल्या पत्राची निदान पोच तरी मला दरवेळी येते. यावेळी आली नाही. त्या पत्राची कॉपी सुनील तटकरेंनाही पाठवली होती. त्यांच्याकडूनही मला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. नंतर मी अजित पवारांना पत्र लिहिले त्या पत्रात नानांनी त्यांचे लाखाने भक्तगण कसे जमवले याची माहिती दिली.
धर्माधिकारी यांचे कुटुंब वास्तविक मध्यमवर्गीय कुटुंबासारखे होतं. नानांने त्यांचे उद्योग सुरू केल्यानंतर त्यांच्याकडे अमाप संपत्ती आली. रेवदंडाच्या घराचे नूतनीकरण आणि चौल, एरोंडा आणि देवघर येथे त्यांच्या भक्तांनी सर्व सोयीयुक्त असे बंगले बांधून दिले. शिवाय नानांचे पुणे येथे एक फार्म हाऊस होते. तेथेच नानांचा मृत्यू झाला. त्यांच्या भक्तगणांनी त्यांना शेतजमिनी, नारळ, सुपारीच्या आणि आंब्याच्या बागाही घेऊन दिल्या. शालीमार पेन्टची एजन्सी मिळवून दिली. शिवाय अमूल प्रॉडक्ट आणि कोडॅकची एजन्सीही त्यांना मिळाली. नागाव येथे त्यांनी एक पेट्रोल पंपही सुरू केला. या सर्व इस्टेटीचे मूल्य करोडो रुपयांत होईल इतकी संपत्ती त्यांना मिळाली. या वाढत्या इस्टेटीची माहिती मिळवा असे मी सुनील तटकरे यांना अनेकवेळा सांगूनही त्यांनी ती कधी मिळवली नाही. खानविलकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र :
अॅड. डी. के. खानविलकर हे नव्वद वर्षांचे एक प्रतिष्ठित वकील आहेत. १२ वर्षं अलिबागचे नगराध्यक्ष, १९६२ ते १९६७ या कालावधित आमदार, यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात अलिबागचे पहिले मंत्री. अॅड. डी. के. खानविलकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे उपाध्यक्षही होते. मात्र नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मारकाच्या संदर्भातली राष्ट्रवादीची भूमिका चुकीची असल्याचा आरोप करत त्यांनी पक्ष सोडला. या स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांना त्यांनी पाठवलेल्या पत्राचा हा स्वैरानुवाद.
तटकरे यांनी त्यांच्या स्मारकाकरता ते अर्थमंत्री असताना २० कोटींची तरतूद केली. तूर्त १६.१३ कोटी रुपयांचे एस्टिमेट तयार झाले आहे. ३० एकरच्या जमिनीवर उभे रहाणार्या या स्मारकावर एक चारमजली इमारत, मोठा बगीचा, पोहण्याचा तलाव आणि येणार्या पर्यटकांची सोय करण्याकरता गेस्ट हाऊसही होणार आहे. महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ, पैशाअभावी रायगड जिल्ह्यात अर्धवट राहिलेली कामे, मांडवी बंदरातला दगडी बंधारा, पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष याचा विचार न करता ज्या नानांच्या भक्तगणांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नानांना उपरोप करून दिली. त्या भक्तांनीच स्मारक करावे असेही सुचवले. माझा विरोध स्मारकाला नाही. त्या स्मारकाचा खर्च सरकारने करण्याबाबत आहे.
धर्माधिकारींच्या संपत्तीची यादी…
– रेवदंडाच्या घराचे नूतनीकरण. चौल, एरोंडा आणि देवघर येथे सर्व सोयीयुक्त असे चार बंगले बांधले आहेत.
– अलिबाग तालुक्यात त्यांच्या मालकीच्या शेतजमिनी, नारळ, सुपारीच्या आणि आंब्याच्या बागा आहेत. या संदर्भातील एकूण ३० सातबाराचे उतारे अॅड. खानविलकर यांच्याकडे आहेत.
– रेवदंडा येथील नानासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी एक चार चाकी वाहनही आहे.
– शालीमार पेन्ट्स, अमूल प्रॉडक्ट आणि कोडॅकची एजन्सीदेखील त्यांच्याकडे आहे.
– नानासाहेबांच्या पत्नी शारदा यांच्या नावे अलिबाग येथे महागड्या खेळण्यांचे आणि भेटवस्तूंचे दुकानही आहे.
– नागाव येथे नानासाहेबांच्या पत्नी शारदा यांच्या नावे एक पेट्रोल पंपसुद्धा आहे.
लोकांचा पैसा खर्च करून स्मारक उभे करावे एवढे नाना मोठे नाहीत. नानांचे चिरंजीव आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हे स्मारक रद्द करावे आणि स्मारकासाठी होणारा (२० कोटी रुपये) खर्च इतर लोकोपयोगी कामाकरता करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांना केली आहे. आपण ती सूचना मान्य करून स्मारकाची योजना रद्द करावी असेही त्यांनी लिहिले आहे.
आपण हे स्मारक त्वरित रद्द करावे. अन्यथा अंधश्रद्धा पसरवणारे स्मारक उभे राहील बाकी काही नाही.
आपला
-अॅड. डी. के. खानविलकर
'ज' माहितीस दुजोरा लागतो
संपादन'ज' आपण उधृत केलेले पत्र हा माहितीचा प्रथमस्रोत झाला की ज्यास किमानपक्षी दुजोऱ्याची आवश्यकता असावी; आपण दिलेल्या पत्रोल्लेखातील माहितीस सुद्धा संदर्भांची आणि दुजोऱ्यांची आवश्यकता असते विशेषत: माहिती नकारात्मक स्वरुपाची अथवा बदनामीकारक ठरण्याची शक्यता असल्यास संदर्भ आणि दुजोऱ्यांची विशेषत्वाने आवश्यकता असते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:४७, २२ डिसेंबर २०१५ (IST)
डी.के ऊर्फ दत्तात्रेय कृष्णाजी खानविलकर हे १९६७ साली अलिबाग विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे निवडणुकीला उभे होते. त्यांना शेकापच्या दत्तात्रेय नारायण म्हणजे दत्ता पाटलांनी २८८७ मतांनी हरवले. १९६२ च्या निवडणुकीत उलट झाले. द.कृ. खानविलकरांनी दत्ता पाटलांना ५२६८ मतांनी हरवले आणि ते आमदार आणि मंत्री झाले. असा माणूस वृत्तपत्रांतून खोटे आरोप असलेले पत्र प्रसिद्ध करेल? २०१३ साली नानासाहेबांवर आरोप करणारे हे पत्र वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते, मात्र त्या वृत्तपत्राचे कात्रण मिळणे आता फार कठीण आहे. .... ज (चर्चा) २२:२४, २६ ऑक्टोबर २०१७ (IST)
खानविलकरांच्या बायकोच्या मालकीचे दोन पेट्रोल पंप अलिबाग परिसरात आहेत. त्यांची नावे :
- SHREE SHARADA AUTOMOBILES
HPC Dealer, GUT NO. 43/44/45 Alibaug Revdanda Road Vill-bagmala, P. O. Chaul, Vashi
- HP Petrol Pump (Shree Sharda Automobiles)
Nr. Mahalaxmi Temple. Saag Mala / Paalav. Chaul., Pazar
पेट्रोल पंपाचा टेलिफोन नंबर 02141-240111 हा DHARMADHIKARI R DATTATRAY या नावावर आहे.