चर्चा:नत्रवायू

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य संपादने करुन या लेखात समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) ०७:५८, ५ एप्रिल २०१८ (IST)Reply


पृथ्वीच्या वातावरणातील ७८% एवढी मुबलक जागा व्यापणारा नायट्रोजन हा एक उदासीन वायू आहे. सजीवांना या असेन्द्रिय वायूचा प्रत्यक्ष वापर फारसा होत नाही. नायट्रोजनचा रेणू (N2) हा तीन इलेक्ट्रॉनिक बंधांनी घट्ट जखडलेला असतो. त्यामुळे त्याचे बंध तोडण्यासाठी बऱ्यापकी ऊर्जा खर्च करावी लागते. वनस्पती व प्राण्यांमध्ये हा नायट्रोजन त्याच्या संयुगरूपाने ‘स्थिर’ केला जातो व तो हवेतील वायूप्रमाणे निष्क्रिय ठरत नसून क्रियाशील बनतो. या क्रियाशील नायट्रोजनची (Nr) कमतरता असेल तर, वनस्पतीची वाढ खुंटते आणि पिकांपासून पुरेसे उत्पादन मिळत नाही. तेव्हा, नायट्रोजन वातावरणात निष्क्रिय असला तरी तो जीवसृष्टीसाठी एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शरीराचा ३ % भाग नायट्रोजनचा बनलेला असतो. ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन यानंतर ते शरीरातले चौथ्या क्रमांकाचे मूलद्रव्य होय. शरीरपेशीतील केंद्रकात असलेली केंद्रीय आम्ले व प्रथिने तयार करणारी अमिनो आम्ले नायट्रोजनची बनलेली असतात. अन्नधान्याचे उत्पादन तर नायट्रोजनवरच अवलंबून असते. वीज चमकणे, वणवे पेटणे यांसारख्या नैसर्गिक घटनांमुळे उच्च तापमान निर्माण होते व त्यामुळे वातावरणातील नायट्रोजनचे बंध तुटतात. त्याचे क्रियाशील स्वरूपात रूपांतर होते. वनस्पतीच्या मुळांच्या गाठीत वास्तव्य करणारे काही सूक्ष्म जीवाणूदेखील वातावरणातील निष्क्रिय नायट्रोजन वायूचे त्याच्या संयुगात रूपांतर करतात. समुद्रात वाढणारी हिरवे निळे शैवाल (खरे तर जीवाणू – सायनोबॅक्टेरिया) हेही नायट्रोजन स्थिरीकरण करण्यात अग्रेसर असतात.

नायट्रोजन वायू उदासीन समजला गेला तरी त्याची आॅक्सिजनशी (नायट्रस आॅक्साईड, नायट्रोजन पेराॅक्साईड, नायट्रिक आॅक्साईड अशी) संयुगे बनतात. नायट्रोजनचा हायड्रोजनबरोबर संयोग होऊन अमोनिया बनतो.


"नत्रवायू" पानाकडे परत चला.