@अभय होतू:,

हे पहा - मंदिर

अभय नातू (चर्चा) २३:५३, २९ डिसेंबर २०१७ (IST)Reply

@अभय नातू:, मी मंदिर हा लेख आधी पाहिला होता, देउळ देखील शोधला. पण सापडला नाही. म्हणून देउळ पान तयार करुन मंदिर ला पुनर्निर्देशन करावे असे ठरवले. देउळ पान तयार केले अन पुनर्निर्देशन करत होतोच ... तेवढयात आपला संदेश प्राप्त झाला. बऱ्याचदा इंटर्नेटचा वेग कमी अस्ल्याने संपादनास थोडा वेळ लागू शकतो, याची कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद. --अभय होतू (चर्चा) ००:०२, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply

@अभय होतू:,
आपण करीत असलेले बरोबरच आहे. तुम्हाला लगेच संदेश पाठविण्याचा हेतू तुम्ही वेळ खर्च करुन देउळ हा लेखलिहिल्यावर मंदिर लेख पाहिले असता तो वेळ वाया जाऊ नये असाच होता.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ००:०९, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply
@अभय नातू:,

देउळ हा लेख लिहिण्यापुर्वी मंदिर लेख शोधणे हा कॉमन सेन्स आहे हो.... इतके तर कळतेच की सर्वसामान्यांस .... :):):)

(कृपया हलकेच घ्यावे)--अभय होतू (चर्चा) ११:१६, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply

@अभय होतू:
:-)
अभय नातू (चर्चा) ११:२४, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply

@V.narsikar:,

मंदिर आणि देउळ हे समानार्थी आहेत काय?

काही वेळेस आपण (धार्मिक वगळता) इतर ठिकाणीदेखील मंदिर हा शब्द वापरतो.

उदा. आरोग्य मंदिर, ध्यान मंदिर, विद्येचे मंदिर... या ठिकाणी देउळ असा शब्द वापरत नाहीत. --अभय होतू (चर्चा) ००:२७, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply


@अभय होतू: देऊळ व राऊळ या शब्दांचा बराच जवळचा व समानार्थी संबंध आहे. देऊळ अथवा राऊळ हा ज्ञानेश्वरकालीन मराठी शब्द आहे, क्वचित तो त्यापूर्वीचाही असू शकतो. पूर्वीपासून मराठीत हाच प्रचलित होता. मंदिर हा शब्द हिंदीतून आला आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.अर्थात त्यास संदर्भ देता येत नाहीत.आपण दिलेल्या उदाहरणांत, मंदिर या शब्दाची योजना 'देवतुल्य स्थान'/'पवित्र स्थान' या अर्थाने वापरल्या गेली आहे.मंदिर हा शब्द त्यामानाने आधूनिक/अर्वाचिन आहे. मी तितका अक्षरतज्ञ वा भाषातज्ञ नाही. पण मला जे वाटले ते नमूद करीत आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:४४, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply

मध्ये दोन शब्द घालतो, क्षमस्व.
देउळ सारखा असणारा देवळ हा शब्द अनेकदा ख्रिस्ती चर्च किंवा ज्यू सिनॅगॉग च्या इमारतीसाठी वापरला जातो.
@:, तुमचे मत?
अभय नातू (चर्चा) ०९:५८, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply
@V.narsikar: @अभय नातू:,
मंदिर या लेखात पहिले वाक्य असे आहे: हिंदू धर्माच्या प्रार्थनास्थळास मंदिर असे म्हणतात.
मी असे ऐकले आहे की जैन धर्माच्या प्रार्थनास्थळासदेखील मंदिर असे म्हणतात.

--अभय होतू (चर्चा) ११:२१, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply

>>देउळ सारखा असणारा देवळ हा शब्द अनेकदा ख्रिस्ती चर्च किंवा ज्यू सिनॅगॉग च्या इमारतीसाठी वापरला जातो.<< होय. तो अपभ्रंश आहे. 'मंदिरात जातो' यात मुळ शब्द मंदिर आहे. तसे ख्रिस्ती भाषांतर हे 'देवळात जातो' याचा मुळ शब्द 'देवळ' असा वापरला आहे. अर्थातच तो कोणी वापरला म्हणून अधिकृत होत नाही.ही भाषांतर त्रुटी आहे असे मी समजतो.
मुळात 'प्रार्थनास्थळ' हा सध्या प्रचलनात आलेला राजकीय व धर्मनिरपेक्ष शब्द आहे. तो अनेक माध्यमांमध्ये वापरला जातो.तसेच अनेक राजकीय नेत्यांच्या भाषणातदेखील.

>>मी असे ऐकले आहे की जैन धर्माच्या प्रार्थनास्थळासदेखील मंदिर असे म्हणतात.<< तपास करतो. मी असे ऐकले नाही. --वि. नरसीकर , (चर्चा) ११:३८, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply

@V.narsikar: @अभय नातू:,

विकिपीडियावर हा लेख पहा: दिलवाडा मंदिर

 --अभय होतू (चर्चा) ११:४४, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply
"देऊळ" पानाकडे परत चला.