चर्चा:दीर्घिकांचे संरचनाधारित वर्गीकरण

Latest comment: ८ वर्षांपूर्वी by प्रथमेश ताम्हाणे

मराठीत कड व कडा (दोन्ही स्त्रीलिंगी, दोघांचे अनेकवचन कडा), कडा(पुंल्लिंगी, अनेकवचन कडे), कडी (स्त्रीलिंगी, अनेकवचन कड्या) असे शब्द आहेत. शिवाय कडे हा नपुंसकलिंगी शब्द आहे. त्याचे अनेकवचन 'कडी' असे व्हावे. जुन्या शुद्धलेखनाच्या नियमांप्रमाणे हे शब्द कडें आणि कडीं असे अन्त्याक्षरांवर अनुस्वार देऊन लिहीत, त्यामुळे ह्यांची पुंल्लिंगी अनेकचनी कडे आणि स्त्रीलिंगी एकवचनी कडी यांच्याशी गल्लत होत नसे. नवीन शुद्धलेखनाच्या नियमांनी तथाकथित अनुच्चारित अनुस्वार देण्याला बंदी झाल्याने कडे आणि कडी ही एकवचने आहेत की अनेकवचने हे समजत नाही.

प्रस्तुत लेखात कडे हा नपुंसकलिंगी शब्द Ring आणि Rings या दोन्ही अर्थांनी वापरला आहे, त्यांतला अनेकवचनी शब्द 'कडी' असा करावा, असे वाटते.

मी असा बदल फक्त भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिकेच्या चित्राखालच्या मजकुरात केला आहे. ... (चर्चा) १३:०३, २१ मार्च २०१६ (IST)Reply

@: कोणता शब्द योग्य आहे याबद्दल मला खात्री नव्हती. त्यामुळे मी गोंधळात मी एकच शब्द वापरला. या माहितीबद्दल धन्यवाद. मी लेखात अपेक्षित बदल करत आहे. -- प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) २३:५९, २३ मार्च २०१६ (IST)Reply

Lenticular या शब्दाला मसूराकार हा शब्द वापरला आहे. शब्द अधिकृत आहे, त्यामुळे चुकीचा नाही, पण त्याने अर्थ स्पष्ट होत नाही. Lntil म्हणजे डाळ. डाळ म्हटले की तूर-हरभरा-मसूर असल्या द्विदल डाळी कांडून एक-दल केलेली डाळ आपल्या नजरेसमोर येते. त्यामुळे मसूराकार=मसुराच्या एक-दलीय डाळीचा आकार, असे वाटते. Lenticular शब्दात अभिप्रेत असलेली डाळ ही अख्खी (फुगीर) डाळ आहे, कांडून एकदलीय केलेली नाही..

याकरिता मसूराकारऐवजी बहिर्गॊल भिंगाकार म्हटले तर संकल्पना जास्त स्पष्ट हॊईल. ... (चर्चा) १५:१७, २१ मार्च २०१६ (IST)Reply

@: बहिर्गोल भिंगाकार दीर्घिका हा शब्द योग्य आहे आणि सुरूवातीला मला आठवला होता. पण दोन शब्दांपेक्षा एक छोटा शब्द वापरणे चांगले वाटले. शिवाय पारिभाषिक शब्दकोशामध्ये lenticular साठी मसूराकार हा शब्द दिला होता, त्यामुळे मी तो वापरला. आणि माझ्या मनात एकदल-द्विदल वगैरे विचार आला नाही. मला तो शब्द योग्य वाटला. आपण सहमत नसल्यास नाव बदलावे. मी मसूराकार दीर्घिका या लेखाचे भाषांतर करत आहे. त्यामध्ये इतर नावे टाकता येतील. -- प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) २३:५९, २३ मार्च २०१६ (IST)Reply
"दीर्घिकांचे संरचनाधारित वर्गीकरण" पानाकडे परत चला.