चर्चा:दिव्या सत्यराज

Latest comment: ३ वर्षांपूर्वी by अभय नातू

@मार्तंड मल्हार:,

या लेखात दोन मोठ्या त्रुटी दिसत आहेत --

१. हा लेख बहुधा मशीन ट्रान्सलेशन वापरुन भाषांतरित केलेला आहे. त्यामुळे यातील शुद्धलेखन, व्याकरण हलक्या प्रतीचे आहे. मशीन ट्रान्सलेशनद्वारे लेख भाषांतरित केल्यावर त्यांतील भाषा सुधारावी.

२. या व्यक्तीची उल्लेखनीयता स्पष्ट नाही. नताशा कानडे या लेखाबद्दलच्या चर्चेप्रमाणे येथेही योग्य ती माहिती घालावी.

तूर्तास बदल साचा लावत आहे, ज्यायोगे इतर संपादकानाही यात भाषाविषयक (व इतरही) बदल करण्यास संकेत मिळेल.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०१:५६, २४ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

नमस्कार @अभय नातू: , मी या व्यक्तीची माहिती इंग्रजी विकिपीडियावरून घेतली आहे

तुम्हाला हवे असल्यास मी अधिक संशोधन करू शकतो आणि अधिक डेटा जोडू शकतो

धन्यवादमार्तंड मल्हार (चर्चा) २१:५२, २४ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

बदल केल्याबद्दल धन्यवाद. मी एक-दोन ठिकाणी साचे घातले आहेत तेथे माहितीची गरज आहे.
एकूण पाहता दिव्या सत्यराज या अक्षयपात्र फाउंडेशनचे काम करतात हे त्यांचे वैशिष्ट्य वाटते आहे. इतर माहितीमधून त्यांच्याबद्दल ठळक अशी अचीव्हमेंट दिसून येत नाही. त्यांचे पुरस्कारही गैरसरकारी, सीमित किंवा अप्रसिद्ध संस्थांनी दिलेले वाटतात.
त्यांनी काही पुस्तके लिहिली असल्यास त्याची नोंद करावी. हा लेख काढत नाही आहे परंतु विनंतीतील माहिती कृपया जोडावी.
अभय नातू (चर्चा) ०३:५१, २५ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply
"दिव्या सत्यराज" पानाकडे परत चला.