चर्चा:दिनकर बळवंत देवधर

Latest comment: ८ वर्षांपूर्वी by अभय नातू

खालील वैयक्तिक उद्गारांचे योग्य संपादन करून लेखात समाविष्ट करावे.

अभय नातू (चर्चा) ००:०८, २९ फेब्रुवारी २०१६ (IST)Reply


आपल्या वडिलांबद्दल डॉ. सुमन देवधर आठवले यांच्या आणि इतर मान्यवरांच्या काही आठवणी

‘१९३९-४० च्या मोसमात पूना क्‍लबच्या मैदानावर महाराष्ट्राने संयुक्त प्रांत संघाला हरवून विजेतेपद मिळविले होते. त्या वेळचे विजयी कर्णधार प्रा. दि.ब. देवधर यांना ‘क्रिकेटमहर्षी’ हे बिरूद मिळण्याच्या वाटचालीतील हा पहिला टप्पा होता.

प्रा. देवधर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने ३९-४० व ४०-४१ असे सलग दोन मोसम रणजी करंडक जिंकला. या आठवणींविषयी त्या म्हणाल्या, ‘‘रणजी विजेते म्हणून महाराष्ट्राची पुढील मोसमात मुंबईविरुद्ध पूना क्‍लबच्या मैदानावरच लढत झाली. आपली पहिली बॅटिंग होती. देवधरांनी द्विशतक (२४६) काढले. आपण मोठी धावसंख्या (६७५) उभारली. मुंबईकडूनही विजय मर्चंट (१०९), खंडू रांगणेकर (२०२) चांगले खेळले. आपण थोडक्‍यात आघाडी (२५ धावा) घेतली. त्या सामन्याची फार उत्सुकता होती. त्या मोसमात दुसऱ्यांदा रणजी विजेते झाल्यानंतर संघाचा सत्कार नूमवि हायस्कूलमध्ये करायचे ठरले. प्रमुख पाहुणे कुणाला बोलवायचे यावरून बरीच चर्चा झाली असावी. तेव्हा न. चिं. केळकर यांचे नाव नक्की झाले. वास्तविक त्यांचा क्रिकेटशी फारसा संबंध असल्याचे फार कुणाला ठाऊक नव्हते आणि त्यांच्या नावावर अनेकांना आश्‍चर्य वाटले, प्रत्यक्षात त्यांनी छान भाषण केले.’’

प्रा. वसंत नाईक यांनी लिहिलेल्या पुस्तकातील एका अध्यायात म्हटले आहे, ‘महाराष्ट्राने पहिल्यांदा रणजी करंडक जिंकला तेव्हा दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला होता. सगळीकडे तणावपूर्ण वातावरण होते. अशा वेळी रणजी संघाच्या पराक्रमामुळे जनतेला दिलासा मिळाला.’

एका स्मरणिकेत चित्रकार डी. डी. रेगे यांनी लिहिले आहे की, ‘१९२६ मध्ये गिलीगनच्या एमसीसी संघाविरुद्ध मुंबईच्या युरोपियन जिमखान्यावर देवधरांनी मी मी म्हणणाऱ्या ब्रिटिश गोलंदाजांचे चेंडू बेदरकारपणे झोडपून १४६ धावांचा प्रचंड मेरू उभारला. मला तेव्हा वृत्तपत्रीय कात्रणे जमविण्याचा छंद होता. इंग्रजी वृत्तपत्रातील त्या वेळचे त्यांचे भरदार मिशा, सणसणीत शरीरयष्टी, पाणीदार डोळ्यांचे छायाचित्र मी जपून ठेवले होते. कालांतराने मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सहवासात आलो. हे कात्रण पाहून त्यांचे उद्गार असे होते- शाब्बास बहाद्दर’! अरे ही सुद्धा एक मोठी देशसेवाच आहे. देवधर हे हातांत बॅटचे शस्त्र धरून ब्रिटिशांनी युद्ध खेळले. ही लहानसहान गोष्ट नव्हे. देवधर हेही एक स्वातंत्र्य क्रीडावीर आहेत.’

विजय मर्चंट यांनी प्रा. ना. सी. फडके यांची प्रतिक्रिया दिली आहे. ‘देवधर यांना भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी संधी मिळाली नाही. यात त्यांचे नव्हे तर भारताचे नुकसान झाले,’ अशी प्रतिक्रिया आहे.

"दिनकर बळवंत देवधर" पानाकडे परत चला.