चर्चा:थोरले बाजीराव पेशवे

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू

इतरत्र सापडलेला मजकूर या लेखात समाविष्ट करावा.

अभय नातू (चर्चा) २१:४२, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply


Rannmard Bajirao Peshwa
Bajirao Peshwa Statue, Pune

पेशवाईचा इतिहास व काळ

संपादन

पेशवाईचा काळ म्हणजे एका अर्थाने शिवशाहीचा उत्तरार्थ. ई. स. १७१३ मध्ये पहिला पेशवा म्हणून बाळाजी विश्वनाथ बनला. हे भट घराणे मूळचे कुलाबा जिल्ह्यातील श्रीवर्धनचे. बाळाजीपंतांच्या वडिलांचे नाव विसाजीपंत होते. या विसाजीपंताना पाच मुले होती. कृष्णाजी, जनार्दन, रुद्राजी, बाळाजी आणि विठ्ठल यामधील बाळाजी म्हणजे बाळाजी विश्वनाथ. ई. स. १६८० नंतर जवळ-जवळ पंचवीस वर्ष महाराष्ट्र परचक्र यादवीने पोखरला होता.या काळात बाळाजी विश्वनाथ श्रीवर्धन सोडून चिपळूनला आले होते. पुठे चीपळूनहून वेळास या गावी नाना फडणीसांच्या पुर्वजाकडे भानू परिवाराकडे आले. हि सर्व मंडळी साताऱ्यासं आली. या संक्रमण काळात शाहूमहाराजाचे आसन आणि राज्यव्यवस्था स्थिर करण्यात बाळाजी विश्वनाथानी महत्त्वाची कामगिरी केली. बाळाजी विश्वनाथांच्या पूर्वीचे शाहूमहाराजांचे पेशवे बहिरोपंत पिंगळे होते. ई. स. १७१३ मध्ये ते एका मोहिमेत कान्होजी आंग्र्याकडून कैद झाले. तेव्हा पेशवा पद विशेष कर्तबगार व्यक्तीकडे असावे, असे शाहूमहाराजाना वाटले. अशा पद्धतीने सातारकर छत्रपंतीचे पेशवा पद ई. स. १७१३ मध्ये भट घराण्याकडे आले. बाळाजी विश्वनाथांच्या पत्नीचे नाव राधाबाई होते. अंताजी मल्हार बर्वे यांची ती मुलगी होती. बाळाजी विश्वानाथांपासून राधाबाई चार मुले झाली. बाजीराव (विश्वासराव), चिमाजी अप्पा (अंताजी) अनुबाई आणि भिऊबाई. हाच बाजीराव म्हणून ओळखू लागला. ई. स. १७२० मध्ये बाळाजी विश्वनाथ मृत्यू पावल्यानंतर ‘पेशवाईची वस्त्रे कुणाला द्यायची’, हा प्रश्न शाहूमहाराजांसमोर होता. बाजीरावाची कर्तबगारी पाहून अंत:स्थ काही लोकांचा विरोध पत्करून २० एप्रिल १७२० मध्ये, म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर पंधराच दिवसांनी शाहूमहाराजांनी बाजीरावला दुसरा पेशवा म्हणून गादीवर बसविले. शाहुमहाराजांच्या रोजनिशीत या घटनेची नोंद पुढील शब्दात व्यक्त केलेली आहे – “पेशजी बाळाजी विश्वनाथ मुख्य प्रधान होते. ते मृत्यू पावले. सबब त्यांचे पुत्र बाजीराव बल्लाळ यांस पेशवाईचा धंदा सांगितला.......१३०० सालीना होन, शिवाय संरजामी महाल वगैरे” वय आणि अनुभव पाहता, त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी फार मोठी आणि अवघड होती. पण बाळाजी विश्वनाथांचे कर्तुत्व आणि शाहुमहाराजांची कृपा या दोन शक्ती पाठीशी असल्यामुळे त्याने हि जबाबदारी आव्हानपूर्वक स्वीकारली.

बाजीराव : व्यक्तिमत्त्व आणि कर्तुत्व

संपादन

राधाबाई पोटी ई.स. १७०० मध्ये बाजीरावाचा जन्म झाला. “बाजीरावांचे पाळण्यातले नाव विश्वनाथ ठेवले होते.” बाजीरावाच्या पूर्वजांचा विचार करता ‘विश्वनाथ’ हे नाव आजोबांच्या नावावरून ठेवले होते. पेशवे घराण्यात अशी पद्धत होती. चिमाजी अप्पाचे ‘अंताजी’ हे नाव राधाबीच्या वडिलांच्या नावावरून म्हणजे चिमाजी आप्प्च्या आजोबांच्या नावावरून ठेवले होते. बाजीरावाची आई राधाबाई बाजीरावास ‘बाजिराऊ’, ‘राऊ’ म्हणत असे. बाजीरावची मुले ‘बाबासाहेब’ म्हणत असत. तर इतर ‘रावसाहेब’ या नावाने ओळखत असत. बाजीराव अशा अनेक नावांनी कुटुंबात परिचित होता. बाजीरावाचे व्यक्तीमत्त्व विशेष होते. भक्कम पिळदार शरीरयष्टी, शुभ्रगौरवर्ण, चेहऱ्यावर तेज, उमेद व्यक्तीमत्त्व, वागण्यातील उमदा स्वभाव, न्यायनिष्ठूर वृत्ती, अशा व्यक्तीमत्त्वामुळे “उत्तर हिंदुस्थानात त्यांना पाहण्यासाठी रस्त्यावर स्री-पुरुषांची गर्दी जमे.” यावरून बाजीरावाच्या व्यक्तीमत्त्वाची कल्पना येते. बाजीरावाच्या व्यक्तिविशेषाबद्दल ‘दुसरा पेशवा’ या नाटकासंदर्भात डॉ. अ. ना. देशपांडे म्हणतात, “बाजीरावची मस्तानीबद्दलची रसिक व उत्कट आसक्ती, अपंग पत्नीबद्दलचे प्रेम व अनुकंपा, बंधूबद्द्लचा प्रेमादरभा, शाहुराजाविषयी निष्ठा, आत्मविश्वास, शौर्य, स्वत:च्या दुर्गुणांची जाणीव या त्यांच्या सर्व व्यक्तिविशेषांचे मोठे ठसठशीत व प्रत्ययकारी दर्शन नाटककाराने घडविले आहे.” कुटुंबामध्येसुद्धा बाजीराव आदराने वागत असे. डॉ.भीमराव कुलकर्णी ‘दुसरा पेशवा’ या नाटकासंदर्भात म्हणतात, ‘दुसरा पेशवा’ हे नाटक पहिल्या बाजीरावाचे व्यक्तीमत्त्व साकार करण्याच्या हेतूने लिहिले आहे. बाजीरावांना उत्तम विविधभिरुची होती. बाजीराव विद्वानांचे चाहते होते. या अष्टपैलू व्यक्तीमहत्वामुळे बाजीराव महाराष्ट्र भर सर्वपरिचित होते. बाजीरावाच्या व्यक्तीमत्त्वासारखेच कर्तुत्वदेखील बिनतोड होते. कर्तुत्वात त्यांनी कधीही हलगर्जीपणा केला नाही. बाजीरावाच्या कर्तुत्वासंदर्भात कै. इतिहास संशोधक वी. का. राजवाडे म्हणतात, “मराठ्यांच्या इतिहासात शिवाजीच्या पराक्रमाच्या खालोखाल, कदाचित कित्येक बाबतींत शिवाजीच्या पराक्रमाच्या तोडीची अद्भूत बाजीराव बल्लाळाच्या हातून घडलेली आहेत.”छत्रपती शाहूमहाराजांनीसुद्धा बाजीरावाच्या कर्तुत्वासंदर्भात प्रशंसा करताना म्हटले आहे, “आजकाल ईश्वर इच्छेने राजश्री प्रधानपंताच्या सर्व गोष्टी सर्वोत्कर्ष आहेत. याची कीर्ती भूमंडली बहुत दिवस राहील. यशास व कीर्तीस गारस्त्यात व स्वामीसेवसी व कितेक विसी किमपि अंतर नाही ऐसे आहे.” बाजीरावाच्या कर्तुत्वासंदर्भात कै. त्र्यं. शं. शेवलकर म्हणतात, “त्यांचे यश त्याला बुद्धीमुळे आलेले नसून धाडस, चपळाई, शौर्य व सततोद्योग यांमुळे प्राप्त झाले होते. त्याला गर्व नव्हता. त्यांच्या जवळ छक्केपंजे नव्हते. अशिक्षित व आडदांड मराठ्यांशीही तो बरोबरीच्या नात्याने वागे. ब्राह्मणांच्या कर्मठपणाने त्याला बिलकुल पछाडलेले नव्हते. सांस्कृतिक ठशामुळे त्याचे पाय कोठेही ओढले जात नव्हते.

"थोरले बाजीराव पेशवे" पानाकडे परत चला.