चर्चा:थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम

चूकीच्या नामविश्वात कसे काय?

चूकीच्या नामविश्वात कसे काय? पान वगळण्याचे कारणे काय? संपादन

संपूर्ण संदर्भ असतांना चूकीच्या नामविश्वात असे साचे लावण्यामागे तसेच सदर लेख वगळण्याचे कारणे स्पष्ट करावे. नेमके हेतू काय? लेखाच्या मांडणी मध्ये सुधारणा करण्यात सहकार्य करण्याऐवजी अशी नकारात्मक भूमिका कशी काय? कृपया स्पष्ट करावे. Govr1 (चर्चा) १५:१८, ३१ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply

कृपया साचा पुन्हा एकदा वाचावा.
पुन्हा पुन्हा नकारात्मक भूमिका असल्याचे प्रतिपादन करण्याआधी तुम्ही येथील नियम व संकेत आत्मसात केलेत तर गैरसमज होणार नाहीत.
तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद
अभय नातू (चर्चा) २२:३२, ३१ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply

लावलेला साचा वगळण्यात यावे. शक्यतो त्यात सुधारणा करण्यास सहकार्य करावे. लेख वगळण्याचा साचा पुर्णपणे चूकीचे आहे. Govr1 (चर्चा) १७:०७, १५ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

तुमचे मत ध्यानात घेतले.
सदर लेख आणि इतर काही लेख एका व्यक्तीच्या व्यक्तिगत हितार्थासाठी लिहिले जात असल्याची (पुसट) शंका आहे. याची शहानिशा झाल्यावर योग्य ती संपादने केली जातील. तोपर्यंत लेख काढले जाणार नाहीत.
तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २२:३४, १५ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

सदर लेख वा माझे लिखाण निरपेक्ष व निष्पक्ष असून कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीगत हितासाठी नाही. विविध क्षेत्रातील अभिनव बाबी पुढे यावेत. अभ्यासकाला विकिपीडियाच्या माध्यमातून नवनवीन बाबी उपलब्ध होणे गरजेचे आहे.हा हेतू राहिला आहे. सदर लेख संदर्भपूर्ण असून असंवैधानिक असे त्यात काहीही नाही.त्यामुळे लेख वगळण्याची भाषा पूर्णतः चूकीची आहे. Govr1 (चर्चा) २३:१७, १५ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

लेख वगळण्यात आलेला नाही तर त्यावर साचा लावलेला आहे. याामागचे कारण स्पष्टपणे लिहिले आहेच. तुम्ही प्रतिपादन करीत आहात हे खरे असले तर प्रश्नच येत नाही परंतु याची शहानिशा होणे गरजेचे आहे. संपादकांनी गूढनाव घेतल्याने ही शहानिशा अधिक कठीण होते. अर्थात गूढनाव वापरणे बिलकुल वर्ज्य नाही हे लगेचच नोंदवितो.
धन्यवादत
अभय नातू (चर्चा) १०:०२, १७ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

संदर्भ असूनही आपण असे मत मांडणे व अशी पूर्वग्रहदूषित भूमिका घेणे पुर्णतः चुकीचे आहे. विकिपिडीयावर हजारो यापूर्वीचे लेख आहेत. त्याला असे नकारात्मक साचे लावा. मग मी संपादन करीत असलेल्या लेखावर आहे. विकिपिडीयाला संदर्भ हवाय, ते तिथे जोडले गेलेले आहे. याची नोंद घ्यावी. माहिती असंवैधानिक किंवा चुकिची नाही. दिशाभूल करणारी नाही किंवा आपत्तीजनक नाही. मग पुन्हा पुन्हा माझ्या संपादन लेखाला हटवण्याची भाषा का वापरता? तुमचा हेतू काय आहे? सदर लेखाला नकारात्मक साचे लावू नये. लेखाचे महत्त्व समजून घ्यायला हवे. Govr1 (चर्चा) १७:३४, १७ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

पुन्हा एकदा तुम्ही पूर्वग्रहदूषणाचा आरोप करीत आहात. वरील चर्चा पुन्हा एकदा नीट वाचा. न कळल्यास विचारा. संदर्भ नसणे हा मुद्दा नसताना ते लिहून दिशाभूल करू नका.
आणि इतर लेखांत त्रुटी आढळल्यास त्या दूर करा. येथे नसते सल्ले (त्या लेखांना आधी साचे लावा, इत्यादि) देऊ नका. नेमके हेच (त्रुटी दूर करणे) करण्यासाठी अनेक लोक अहोरात्र झटत आहेत. त्यांना सहकार्य करा. अनाहूत सल्ले दिल्याने त्यांचे काम कमी होणारा नाही हे नक्की.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ११:१३, १९ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply


लेख कायम करणे व वगळण्याचा साचा काढणे संपादन

सदर लेखाला संदर्भ जोडले गेले आहे. दिलेले संदर्भ योग्य व पुरेसे असून लेख शेतकरी चळवळीशी निगडीत आहे. अभिनव संकल्पना व मोहीम असल्याने सदर लेख अभ्यासकासाठी अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. लेखातील मजकूर व आशय असंवैधानिक किंवा आपत्तीजनक अशाप्रकारे मुळीच नाही. विशेष म्हणजे विविध संकल्पना व विषयाचा परिचय/माहीती विकिपीडियावर असणे आवश्यक आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम' हे लेख कायम करण्यात यावे. धन्यवाद Govr1 (चर्चा) ०९:१७, १८ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

वरील चर्चेत संदर्भ नसणे हा मुद्दा नाही. चर्चा नसत्या दिशेला भरकटविण्याचा उद्योग असल्यास तो बंद करावा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ११:१३, १९ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

मग तुमचा हेतू काय आहे. Govr1 (चर्चा) १८:५३, १९ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

वर स्पष्टपणे लिहिलेले आहे. पुन्हा एकदा वाचावे. येथे हमरीतुमरीवर येण्यात तुमचा हेतू काय आहे हे कळण्यास मार्ग नाही आणि सध्या फारशी उत्सुकताही नाही.
अभय नातू (चर्चा) २२:३७, १९ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

तुम्ही चुकीचा लावलेला साचा काढावे. बस्स एवढेच सांगणे आहे. हमरीतुमरी येणे हा आमचा स्वभावधर्म देखील नाही. विविधतेचे आदर आणि पालन करणारी आमची संस्कृती आहे.तुमचा हेतू लक्षात आला आहे.चर्चा तुर्तास येथे थांबवावी. Govr1 (चर्चा) ०९:५१, २० नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

हे आम्ही कोण? आणि साचा चुकीचा हे तुमचे म्हणणे आहे. याला पुरावा? तुमची संस्कृती काय आणि स्वभावधर्म काय हे तुमच्या येथील वागणुकीवरुन उघडच आहे.
चर्चा थांबवणे पूर्णपणे तुमच्या हातात आहे.
अभय नातू (चर्चा) १०:०१, २० नोव्हेंबर २०२१ (IST)Reply
"थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम" पानाकडे परत चला.