ज यांचा उत्पात संपादन

  • @:@Tiven2240:@अभय नातू: मी ज यांचा उत्पात अनेकदा नोंदवलेला आहे, प्रचालकांनाही तो अनेकदा दिसलेला आहे.
  • आता सहज अलिकडचे बदल पहात असताना मला आणखीन एकदा एक बाब खटकली की, परत एकदा @आर्या जोशी: यांची संपादने ज्या पानावर चालू असतात त्यावरच ज मुद्दाम संपादने करतात आणि त्यामध्ये आर्या यांनी लिहिलेला मजकूर ज अचानक काढून टाकतात.
  • हे या आधीही मी नोंदवलेले आहे, या इतिहासात इथेही हे पहाता येईल.
  • एकतर स्वत: कधीच कश्यालाच पुरावे द्यायचे नाहीत, आणि दुसऱ्यांनी दिलेले पुरावे, संदर्भ असे उडवत रहायचे. असा नेहमीचा उद्योग ज यांनी थांबवावा आणि प्रचालकांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी मागणी करित आहे. आपल्याला हवे असल्यास मी नोंदवलेल्या ज यांच्या उत्पातांची यादीच मी सादर करीन. अनेकदा आर्या यांनी तक्रार करुनही ह्यावर काहीही उपाय न झाल्याने अनास्थेपोटी त्यांनी त्या विषयी बोलणे सोडले आहे असे मला कळाले त्यावरुन मी स्वत:च ही तक्रार नोंदवत आहे.
  • एकतर स्त्री सदस्यांची आणि त्यातही सक्रिय स्त्री सदस्यांची विकिवर वानवा असताना, ज सारख्यांच्या उत्पातामुळे जर आर्या जोशींसारख्या सदस्य आपण गमावल्या तर त्या सारखी नामुष्कीची वेळ नाही, सगळ्या विकिवर लिंगभाव भेदभाव विरुध्द धोरणे ठरवली जात असताना, मराठीवर मुद्दाम पुजा जाधव, आर्या जोशी यांना लक्ष करण्याची कारस्थाने मराठी विकिवर होत आहेत ही खुप शरमेची बाब आहे. WikiSuresh (चर्चा) १९:१९, २४ जून २०१८ (IST)Reply

@Sureshkhole: @अभय नातू: धन्यवाद सुरेश.मला नेहमी हा त्रास होतो.अजही संपादन मतभेद पाहिल्यावर ज यांनी मजकूर काढून टाकल्याचे दिसले.मी ससंदर्भ लिहीण्याचा प्रयत्न करीत असताना नेहमी असा त्रास होतो.नवरात्र लेखातही असाच प्रकार मी अनुभवला आहे.योग्य तो विचार व्हावा व नोंद घ्यावी.सहकार्याच्या अफेक्षेत.आर्या जोशी (चर्चा) २०:३८, २४ जून २०१८ (IST)Reply


पुरावे/संदर्भ उडवण्याचे काम कुणीही हेतुपुरस्सर करत नसते. ते उडवले गेलेच तर ते अनवधानाने झालेले असते. माझ्या संगणकावर मजकूर काॅपी करून ठेवायची सोय नाही, हे मी या पूर्वीच लिहिले आहे, असती तर असे झाले नसते. ... (चर्चा) २१:०५, २४ जून २०१८ (IST)Reply

  • या ठिकाणी आपण ज यांनी केलेल्या उत्पात, नकल डकाव, इ. मुळे प्रचालकीय कारवाईत काढून टाकलेल्या पानांची यादी पाहू शकता. WikiSuresh (चर्चा) २२:२८, २४ जून २०१८ (IST)Reply
  • @: आपण स्वत:च आपल्यावर झालेल्या कारवाईमध्ये काढून टाकली गेलेली पाने पहावीत, ज्यातीन अनेक पाने,
    • नकल-डकव मुळे प्रताधिकार भंग केला गेला आहे म्हणून.
    • उत्पाती संपादने, ज्यात अविश्वकोशीय मजकूर नकल-डकव किंवा लिहीला गेला आहे म्हणून.

काढून टाकली गेली आहेत, शिवाय मी अनेक लेखांमध्ये प्रताधिकार भंग हा साचा लावलेला आहे आणि त्यावर कारवाई होणे बाकी आहे. आता मला सांगा इतक्या ठिकाणी,

  • अनावश्यक मजकूराचा हट्ट धरणे, म्हणजे गुंडाची टोपण नावे वगैरे.
  • एवढ्या मोठ्या प्रमाणावर मजकूर दुसरीकडून आणून विकीवर डकवणे. (मजकूराच्या आकारमाना वरुन हे स्पष्ट दिसते की, आपल्याकडे सगळी व्यवस्था असलेला संगणक आहे, इतकेच नव्हे तर आपण मुद्दामच मजकूर हटवला आहे, इतकेच नव्हे तर मुद्दाम हटवला आहे. )
  • उदा, प्रसाद साळवेंच्या उत्पाती उद्योगात सामील होऊन मी सुधारलेले संदर्भ मुद्दाम उलटवले आहेत, शिवाय हे दोनदा केलेले आहे. तेव्हा हे नजर चुकीने झाले हे जर तुम्ही म्हणत असाल तर, आपण अशी नजर चुक न होण्यासाठी विकीवर संपादनेच करु नयेत असा माझा सल्ला आहे.
  • स्वत: कसे एका हाताने लिहितो, संगणकावर मजकूर ठेवायची सोय नाही आणि इतर बाबीं बोलुन सहानभुती गोळा करायचा केविलवाणा प्रयत्न करणे. आणि सहानभुतीमागे उपरोक्त उल्लेखीत सगळ्या चुका माफ़ व्हाव्यात अशी आशा बाळगणे.

मी मुद्दामच सगळे एकाच ठिकाणी नोंदवत आहे, जेणेकरुन आपण किती खोटे बोलत आहात हे सर्वांच्या लक्षात यावे आणि आपण केलेल्या चुकांची आपल्याला योग्य ती शिक्षा व्हावी.WikiSuresh (चर्चा) १३:३५, २५ जून २०१८ (IST)Reply

इतर संपादकांचे बदल संपादन

  1. @आर्या जोशी:, मराठी विकिपीडिया व इतर विकिप्रकल्पांवर एकाच लेखावर अनेक संपादक काम करतात. असे करणे अपेक्षितच आहे.
  2. जर एखाद्या लेखावर काम करीत असताना इतर कोणी मोठे बदल करू नये असे वाटत असल्यास {{कामचालू}} साचा लावावा. तो येथे दिसत नाही आहे.
  3. @:, असे करताना एकमेकांचे बदल आपल्याकडून घालवले जात नाहीत याची अधिकाधिक काळजी घेणे तितकेच अपेक्षित आहे.
  1. जर यासाठी तांत्रिक अडचणी असतील तर त्यासाठी येथे मदत मागितली तर ती देण्यास इतर सदस्य तयार आहेत.
  1. @Sureshkhole:, कृपया व्यक्तिगत ताशेरे ओढू नयेत.

हे संकेत पाळले तर एकमेकांची अडचण न होता एकमेकांच्या प्रयत्नाने आपण सगळेच करीत असलेल्या कामाला चार हात अधिक लागतील हे नक्की.

धन्यवाद. अभय नातू (चर्चा) ०७:०३, २६ जून २०१८ (IST)Reply

@अभय नातू: धन्यवाद! लेख आपण सर्वजण मिळूनच करायचे आहेत फक्त ते करताना एकमेकांना त्रास होणार नाही आणि एकमेकांच्या संपादनांचा आदर राखला जाईल असे सर्वानीच पाहू. आर्या जोशी (चर्चा) १०:४९, २६ जून २०१८ (IST)Reply

@अभय नातू: माझ्या संपादनांमध्ये केलेली लुडबुड आणि खोडसाळपणे उलटवणे हे मी नोंदवत आहे आणि ते नोंदवणे व्यक्तीगत आरोप कसे असेल, शिवाय मी‌ अनेक सदस्यांच्या प्रताधिकार भंग उकरुन काढल्याने त्यांनी माझ्यावर रोष धरलेला आहे हे उघड आहे. त्यातले ज एक आहेत त्यामुळे त्यांनी माझी संपादने उलटवली आहेत हे परत एकदा मी नोंदवत आहे. WikiSuresh (चर्चा) १०:१९, २७ जून २०१८ (IST)Reply

@Sureshkhole:,
स्वत: कसे एका हाताने लिहितो, संगणकावर मजकूर ठेवायची सोय नाही आणि इतर बाबीं बोलुन सहानभुती गोळा करायचा केविलवाणा प्रयत्न करणे. आणि सहानभुतीमागे उपरोक्त उल्लेखीत सगळ्या चुका माफ़ व्हाव्यात अशी आशा बाळगणे.
हा मजकूर.
रागाच्या किंवा उद्वेगाच्या भरात एखादे वेळेस अप्रिय गोष्टी लिहिल्या जातात हे मान्य परंतु असे लिहू नये याची आठवण करुन देत आहे.
अभय नातू (चर्चा) १०:२६, २७ जून २०१८ (IST)Reply

@अभय नातू: अगदी खरे आहे मलाही वाद घालणे आणि त्यात वेळ वाया घालवणे ह्यात रस नसतो, त्यातही इतरांच्या पापांची यादी करण्यात तर बिलकूलच नाही, त्यामुळे रागाच्या भरात मी जर काही बोलून गेलो असेल तर परत असे होणार नाही. परंतु ज यांवर कारवाई अजुनही झालेली नाही जिथे त्यांनी केलेला उत्पात अनेकदा नोंदवून आणि सिद्ध करुन झालेला आहे. शिवाय मीच नाही तर इतरही सदस्य त्यांच्या संपादनामुळे त्रस्त आहेत. असे असता माझा राग आणि सर्व उपद्व्याप त्यांच्यावर जरब बसेल अशी कारवाई अपेक्षित ठेऊन होता. ही माझी बाजू आहे बाकी काय लिहावे. WikiSuresh (चर्चा) १०:४५, २७ जून २०१८ (IST)Reply

"तुळशी वृंदावन" पानाकडे परत चला.