ग्रामगीता ग्रामगीता

Untitled संपादन

खालील विषय चिंतनीय आहे हेतू पुरस्कर विरोध नाही हे वाचकांनी लक्षत घ्यवे नंदकिशोर म कुबडे (चर्चा) २०:४७, ४ ऑगस्ट २०१४ (IST)वंदनीय महाराजांनी केलेल्या

सत्कार्याचाआढावा घेणे किवा त्यांच्या साहित्या बद्द्ल बोलणे तितक सोप नाही परंतु ग्रामगीता
ह्या ग्रंथावर विचार करतांना मला अनेक शंका निर्माण व्हायच्या अजून समाधान झालेले नाही
उदांः हिंदूंनी मशिदी पडल्या ,शास्त्राचा विरोधाभास ,गुरु पूजक असून गुरु ,मूर्ती ,तीर्थ ,याबद्दल
अप शब्दात वर्णन करणे इत्यदी तत्व लिहिल्याने काही भाविकांनी नाराजी दाखविली आहे
त्याबद्दल आपण काय? सांगाल मी ग्रामगीता वाचली 
वंदनीय महाराजांनी एकात्मतेचा संदेश देतांना वेदिक आर्य संस्कृतीचा चुराडा केला आहे

{महाराजांनी सामाजिक ,ग्रामविकासा करिता केलेले महान कार्य वंदनीय आहे} परंतु त्यच बरोबर

ज्ञान,भक्ती,पूजापाठ,ईश्वर इत्यादींचा अभाव निर्माण करून नास्तिकतेला मोकळी वाट करून दिली .

धर्माची परिभाषा बदलली ,ईश्वराचे स्वरूप ,भक्तीचा मार्ग,बदलून स्वमत निर्णय घेतला आणि गुरु

शास्त्र संमत ठरविला सुरवातीला सांगतात कि१} आपणची मन्दिर मूर्ती पुजारी |आपणची पुष्पे
होऊनी पूजा करी ||आपणची देव रुपे अंतरी |पावे भक्ता |१ |३ |ईश्वर जर सर्वव्यपी आहे तर
मंदिरात का नाही २ }भलेही तो देव न माने|परी सर्व सुख देऊ जाणे |मानवाशी मानवाने| पूरक
व्हावे म्हणूनिया |१ |१०७ |जो देवालाच मानत नाही तो इतरांना काय सुख देणार ?	|
उपरोक्त सही नसलेले लेखन बहुधा सदस्य:नंदकिशोर म कुबडे यांनी केले असावे.


@नंदकिशोर म कुबडे: प्रथमत: मराठी विकिपीडियावर आपण मनमोकळेपणाने संपादन करण्याचा विचार केलात या बद्दल धन्यवाद. अर्थात त्याच वेळी विकिपीडिया संकेतस्थळ मुक्त असलेतरीही येथील सर्व लेखनास ज्ञानकोशीय परिघाच्या मर्यादा पडतात. विकिपीडियातील संपादक लेखांच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे इतरांच्या प्रकाशित आणि समसमीक्षीत माहितीची विचारांची सापेक्ष संदर्भासहीत दखल घेत असतात.
विकिपीडियावरच्या चर्चा पानांचा उद्देश लेखाच्या आणि लेखातील मजकुराच्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेच्या संदर्भाने तसेच लेख विकासाच्या संदर्भाने वस्तुत: मर्यादीत असतो. विकिपीडिया चर्चा पाने हि एखाद्या गोष्टीच्या योग्यायोग्यतेबद्दल व्यक्तीगत मतांची चर्चा करण्याचे संकेतस्थळ नव्हे, अशा जनमतासंबंधीत चर्चा आपण सर्वसाधारणपणे इतर मराठी संकेतस्थळांवर करू शकतो.
आपण अधिक माहिती विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे येथे घेऊ शकाल.
आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय वाचन आणि लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:४०, २ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

श्रीमान नंदकिशोर कुबडे, यांनी मांडलेल्या शंका बाबत. संपादन

संत हे नित्य निरंतर समाज, धर्म यांना विचार देण्याचे काम करतात, वं. तुकडोजी महाराजांनी मोडकळीस आलेली समाज व्यवस्था, गांवाचा विकास या बाबत चिंतन करुन ग्रामगीता या ग्रंथातून उपाय सुचविलेले आहेत व आदर्श सहजिवन कसे असावे, समाजात वावरतांनी काय करावे यावर भाष्य केलेले आहे. वं. तुकडोजी महाराजांनी जरी हिंदू असले तरीही त्यांचे विचार हे अखिल मानव जातीच्या हिताचे असेच आहेत, त्यांच्या या कार्याकरीता व स्वातंत्र्यलढ्यातील योगदानामुळे त्यांना राष्ट्रसंत असे संबोधतात. आपण मांडलेल्या शंकावरुन आपणास असलेल्या शंका स्पष्ट होत नाहीत, विस्ताराने व संदर्भासह कळविल्यास वं. तुकडोजी महाराजांच्या त्या लिखानाचा संदर्भ, विचार इत्यादी बाबत मला माहिती असल्यास सांगू शकेन, असे वाटते. किंवा आपणास असलेल्या शंका आपण पत्राने श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम, जिल्हा अमरावती यांना लिहील्यास त्याविषयी अधिक संदर्भ मिळू शकतील. आपला आवडीचा विषय आध्यात्म असेल तर वं. तुकडोजी महाराजांचा हिंदी पुस्तक लहरकी बरखा वाचावे, ग्रामगीता हा समाजसुधारणा व ग्रामविकासास समर्पित ग्रंथ आहे. धन्यवाद.

उपरोक्त सही न केलेले लेखन प्रथमदर्शनी बहुधा सदस्य:Bodkhe यांनी केले असावे.
आपण दोघे परस्पर सहमतीने आपापसातील चर्चेसाठी इतर मराठी संकेतस्थळांपैकी (जसे की मायबोली/मिसळपाव/मनोगत/ ऐसी अक्षरे इत्यादी किंवा इतर) एखादी चर्चा फोरम निवडून हि चर्चा इतरत्र करू शकल्यास बरे पडेल असे वाटते.
मनमोकळ्या सहभागांसाठी धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:०७, ४ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

प्रताधिकार (कॉपीराईट) संपादन

@Bodkhe: ज्या अर्थी तुकडोजी महाराजांचा देहांत १९६८ साली झाला त्या अर्थी त्यांचे लेखन इ.स. १ जानेवारी २०२९ पर्यंत त्यांचे लेखन तांत्रीक दृष्ट्या प्रताधिकारीत राहते. त्यामुळे त्यांच्या कविता आणि लेखन जसास तसे कॉपीपेस्ट करणे उचीत ठरत नाही. तुकडोजी महाराजांच्या लेखनाच समीक्षणही झालेल आहे तेव्हा अशा समीक्षणांची ज्ञानकोशीय दखल घेताना आवश्यक तेवढ्या काव्यपंक्तीं लेखात जोडता येऊ शकतील. लेखातील पोस्टाचा स्टॅंपही आपण चढवला असणार नाही पण तो १ जानेवारी २०५४ पर्यंत भारत सरकारच्या नावे कॉपीराईटेड असणार आहे.

आपण या बाबींची दखल घेऊन सवडीनुसार लेखात योग्य त्या सुधारणा करण्यास आपले अमुल्य सहकार्य देऊ करावे हि नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:१४, ४ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

प्रताधिकार (कॉपीराईट) संपादन

धन्यवाद ! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य हे जर प्रताधिकार (कॉपीराईट) असेल तर निश्चितचं त्याचा प्रताधिकार (कॉपीराईट)हा श्रीगुरुदेव सेवामंडळ, गुरुकुंज यांचे कडे असेल. प्रयत्न केल्यास राष्ट्रसंताचे साहित्य / निवडक साहित्य वि.पि. प्रसिद्ध करण्याबाबत परवाणगी मिळू शकेल. आश्रम मी राहतो तेथुन 50 की.मी. वरच आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य वि.पी. प्रसिद्ध करणे करिता Letter Head वर विनंती दिल्यास सदर परवाणगीसाठी मी स्वतः विश्वस्ताना भेटून विनंती करण्यास तयार आहे. किंवा आपले याबाबत मत सांगावे.


मलावाचवा .ब्लोग संपादन

या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.

[[१]]मलावाचवा .ब्लोग नंदकिशोर म कुबडे लोणी टा अमरावती आपण माझ्या करिता आणि इतर इच्छुकांना सुलभ ग्रामगीता होईल.खूप खूप धन्यवाद

"तुकडोजी महाराज" पानाकडे परत चला.