चर्चा:तुंबी
चर्चा:तुंबा येथील मजकूर
संपादनक्षमा असावी, माझ्या मते लेखाचे शीर्षक तुंबा चुकीचे असावे. कारण जवळजवळ जानेवारी२०११ पासून आज पर्यंत बर्याच वेळा गुगल सर्च करुनही तुंबा साठी विकिपीडिया वगळता मराठी भाषेत "तुंबा या नावाच्या वनस्पतीचा " एकही उल्लेख आढळला नाही. तुंबा साठी निकाल सापडलेच तर ते गमतीदार असतात. उदा.
- मराठी लोकांचे हींदी- "हमारी पंचाईत होगी इधर कितना पाणी तुंबा है ...किंवा
- तुंबा भरोनी आण पाणी ॥३३॥ पितांबर बोले गुरुराया । ओढयास पाणी अल्प सदया । पाण्यांत तुंबा बुडावया ...
- आपसिंग तुंबा ठाकरे ...
- पतीने कुऱ्हाडीचा तुंबा व वरवंटा पत्नीच्या डोक्यात घालून ... वैगेरे वैगेरे ...
परंतू लेखाचा संपादन इतिहास आणि त्यातील योगदान करणारे सदस्य पहाता, माझ्यासारख्या नविन व अनुभवहीन सदस्याने "लेख शीर्षक चुकीचे असावे" असे सांगने वेडेपणाचे ठरेल. या भीतीने बर्याचदा चर्चा पानावर येवूनही चर्चा करु शकलो नाही.(कृपया गैरसमज करुन घेवू नये)Namskar १०:४९, ९ जुलै २०११ (UTC)
तुंबीची माहिती
संपादनइथे पहा, http://www.flickr.com/photos/dinesh_valke/4802512490/
मलाही अनेक कोश पाहून तुंबीची माहिती मिळाली नव्हती, शेवटी गूगलच्या मदतीने मिळाली. माहिती खरी आहे, पण या वनस्पतीला तुंबी म्हणतात हे पारखून पहाता आले नाही. प्रयत्न चालू आहेत. कदाचित तुंबा हा शब्द योग्य नसेल. जर खरोखरच नसेल तर तुंबा हे पान तुंबीशी सम्मीलित करावे. ...J १०:५८, ९ जुलै २०११ (UTC)
तुंबा, तुंबी, कुंबा, गुम्मा
संपादनएका मराठी शब्दकोशात तुंबा आणि तुंबी या दोन्ही शब्दांचे अर्थ कडू पांढरा भोपळा किंवा त्याच्यापासून केलेले भांडे असा दिला आहे. वर आलेल्या “बा भरोनी आण पाणी ॥३३॥ पितांबर बोले गुरुराया । ओढयास पाणी अल्प सदया । पाण्यांत तुंबा बुडावया” या ओळीत तुंबाचा अर्थ, भोपळ्यापासून बनवलेले पात्र असा असला पाहिजे. यावरून,
- तुंबा=तुंबी=कडू पांढरा भोपळा किंवा त्यापासून बनवलेले पात्र.(वनस्पती नाही)
- तुंबिनी म्हणजे त्याच कडू भोपळ्याचा वेल.
- तुब=तुंब=तुंबा=ज्यात अवजाराचा दांडा घालतात तो बैलगाडीच्या चाकाचा मधला भाग.(वनस्पती नाही)
- तुंब=तुंबा=नदीचा बंधारा.(वनस्पती नाही)
- तुंबड्या=दुध्या भोपळा.
- तुबक=तोड्याची बंदूक.(वनस्पती नाही)
- तुंबडी=वाळलेल्या भोपळ्यापासून केलेल भिक्षापात्र; शरीरातून रक्त काढण्याचे साधन; तंगी, टंचाई.(वनस्पती नाही)
- स्वतःची तुंबडी भरणे=स्वतःला पाहिजे तितके पदरात पाडून घेणे.(वनस्पती नाही)
- तुंबडी लावणे=पिच्छा पुरवणे, द्रव्याचे शोषण करणे.(वनस्पती नाही)
- तुंबड्या लावणे=रक्त शोषून घेण्याची साधने जोडणे.(वनस्पती नाही)
- तुंबिया=मुलांचा अलंकार.(वनस्पती नाही)
- तुंबळ=जोराचे, भयंकर घोर.(वनस्पती नाही)(
- तुंबणे=साचणे, जमून राहणे.(वनस्पती नाही)
- तुंबडा=तुंबारा=पाणी वाहून जाऊ नये म्हणून मोरीच्या छिद्रात घालायचा बोळा; साचणे, तुंबणे इत्यादी क्रिया; फार साचलेले पाणी, रक्त वगैरे.(वनस्पती नाही)
आयुर्वेदीय ग्रंथांत दिलेले अर्थ :
- द्रोणपुष्पी=शेतात उगवणारे एक छोटे झुडूप. कडू आणि तिखट चवीचे वात-कफ-अग्निमांद्य-कावीळ-स्त्रीरोग-श्वासरोग-मूत्ररोग-कृमी आदी रोगांवर उपयोगी; पथ्यकर, पित्तकर वगैरे. मराठीत कुंबा, हिंदीत गुम्मा.
दुसर्या काही आयुर्वेदीय ग्रंथांत...
- द्रोणपुष्पीदल=द्रोणपुष्पीपत्र, वगैरे.
- द्रोणपुष्पी=द्रोणीपुष्पी=द्रोणा=द्रोणपर्णी=द्रोणपुष्पिका=इंदीवरा नावाची वेल=मराठीत बहुफूल, हिंदीत गोमा, मधुपाटी; गुजराथीत कुलन्नुफूल; बंगालीत दारुणफूला, आणि शेवटी, तामीळमध्ये तुंबेकीरी. या तुंबेकीरीपासून मराठीत तुंबी किंबा तुंबा हे शब्द आले असणे शक्य आहे. आयुर्वेदीय ग्रंथांत वनस्पतींची चित्रे नसतात, फक्त झाडाचे सहजासहजी स्पष्टपणे आकलन न होणारे वर्णन असते. पण त्या वर्णनावरून द्रोणपुष्पी(पी दीर्घ!) म्हणजे तुंबा किंवा तुंबी असावे असे वाटते....J १८:१५, ९ जुलै २०११ (UTC)
नमस्कार,
सर्वप्रथम आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद, येथे मी पुन्हा माझी भुमीका मांडू ईच्छीतो,
*मराठी भाषेत, तुंबा हे नाव असणारी वनस्पती
आपण वर दिलेल्या संकेतस्थळावरही तुंबा नावाचा तीळमात्रही उल्लेख आढळत नाही. तेथे (मराठी भाषा: तुंबी किंवा तांब ), (संस्कृत भाषा: द्रोणपुष्पी ) (शास्त्रीय नाव :Leucas aspera ) असे आहे. Leucas indica ही Leucas aspera ची Similar Species आहे म्हणजेच द्रोणपुष्पी किंवा तुंबी किंवा तांब नाही. http://zipcodezoo.com/Plants/L/Leucas_aspera/ एकंदरीत लेख नाव "तुंबा" शास्त्रीय नाव "Leucas indica" आणि "द्रोणपुष्पी" अशी विसंगती आढळते. Namskar ०६:२६, १० जुलै २०११ (UTC)
शंका समजली नाही
संपादनवर लिहिलेला मजकूर समजण्यात माझा काहीसा घोटाळा होतो आहे. >Leucas indica ही Leucas aspera ची Similar Species आहे. < म्हणजे same Species नाही. बहुधा बरोबर. [| झिपकोडझू] तसेच म्हणते. पण त्याचवेळी, Leucas aspera चे नाव द्रोणपुष्पी किंवा गुम्मा असे देते.
फ़ॉरमॅकॉग्नॉसी रिव्ह्यू [रिव्ह्यू] हे संकेतस्थळ Leucas aspera ला तुंबै, तुंबा, तुण्णी, द्रोणपुष्पी, चित्रपत्रिका, चित्रक्षुप ही नावे देते. म्हणजे यांतही तुंबा-तुंबै आहेत.
केरळ आयुर्वेदिक्स [| केरळआयुर्वेदिक्स]वर Leuca indica म्हणजे तुंबा असे दिले आहे.
आयुर्वेदिक ग्रंथात(राजनिघंटु:) तुंबेकीरी (वर चुकून तुंबेकेरी लिहिले गेले होते!) म्हणजे दोणपुष्पी असे दिल्याचे मी वर लिहिलेच आहे.
यावरून माझे निष्कर्ष : Leucas indica आणि Leucas aspera या वनस्पतींत फारसा फरक नसावा. तुंबा, तुंबी, तुंबै, तुबेकीरी, कुंबा, गोमा, गुम्मा ही द्रोणपुष्पीचीच देशी नावे असावीत.
हे निष्कर्ष सर्वांना पटायलाच पाहिजेत असे नाही. पण जर पटत नसतील तर कां यावर साधकबाधक चर्चा व्हावी....J ०९:०९, १० जुलै २०११ (UTC)
मुख्य मुद्दा
संपादन- मुख्य मुद्दा Leucas aspera च्या तुंबा या मराठी नावाबद्दल आणि मराठी विकिपीडिया वर असलेल्या लेख शीर्षक | तुंबी मध्ये विलीनीकरणा बाबत आहे.Namskar १५:४६, १० जुलै २०११ (UTC)
पुन्हा विरोधाभास
संपादनआपण वर लिहिले होतेत की "मराठी भाषेत "तुंबा या नावाच्या वनस्पतीचा एकही उल्लेख आढळला नाही" खरे असावे. पण जर एखाद्या वनस्पतीला मराठीत नाव नसेल तर ते इतर भारतीय भाषेतून घ्यायला काय हरकत आहे? त्यामुळे द्रोणपुष्पीला तुंबा म्हणायला कुणाचाही विरोध असू नये. मराठीत छोट्या झुडुपाचे नाव अनेकदा स्त्रीलिंगी असते. जाई, जुई, चमेली, केळ/केळी, ज्वारी, नागली, पपई, घाणेरी, टणटणी वगैरे. या संकेतानुसार द्रोणपुष्पी स्त्रीलिंगी, म्हणून तुंबा या फुलाची जी वनस्पती, ती तुंबी, असे असू शकते. फक्त प्रश्न एवढाच आहे की दिनेश वाळके सोडले तर या वनस्पतीला तुंबी म्हणणारे अजून कुणीच सापडलेले नाही. वाळक्यांनी काही अधिकृत माहितीशिवाय तुंबी म्हटले असण्याची शक्यता कमीच. तरीही तोपर्यंत दोन्ही पाने ठेवावीत आणि योग्य वेळी विलीनीकरण करावे.....J १६:३९, १० जुलै २०११ (UTC)
साशंकता का?
संपादन"मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे." साशंकता का असावी? कुणी सांगू शकेल?...J १७:१३, १० जुलै २०११ (UTC)
साशंकता का?
संपादनडॉ. सचिन यांनी येथे पानाकाढा साचा लावल्याचे दिसत आहे. कदाचित ते उत्तर देऊ शकतील.
अभय नातू १९:०१, १० जुलै २०११ (UTC)