चर्चा:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे

हा महत्वाचा लेख आहे. या यादीचे नीट वर्गीकरण केल्यास वाचक व अभ्यासक यांना जास्त उपयुक्त ठरेल असे वाटते. वर्गीकरण कसे असावे यावर चर्चा करून ठरवता येईल.
उदा. चरित्रपर ( जीवनप्रवास,व्यक्तिमत्वाचा पैलू इ.) ; बाबासाहेब आणि अन्य व्यक्ती (बाबासाहेब आणि गांधी, बाबासाहेब आणि सावरकर इ.) ; राजकीय व सामाजिक; धर्मविषयक इ.
तसेच प्रकाशन वर्षानुसार उतरता क्रम असावा. जेणेकरून प्रताधिकारमुक्त झालेली पुस्तके शोधता येतील आणि ती विकीस्रोतवर संदर्भ ग्रंथ म्हणून आणता येतील. बाबासाहेबांनी लिहिलेले सर्व साहित्य गेल्याच वर्षी पूर्णपणे प्रताधिकारमुक्त झालेलेच आहे. त्यातील मराठी साहित्य शोधून नोंदवूया. विकीस्रोतवर त्यांचे एकही पुस्तक नाही.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:१५, १९ मार्च २०१८ (IST)Reply


मी 'अ ते ज्ञ' या क्रमाणे पुस्तकांची नावे लिहिली आहेत. चरित्रपर, बाबासाहेब आणि अन्य व्यक्ती, राजकीय व सामाजिक; धर्मविषयक हे वर्गीकरण बनवले जाऊ शकते. आपणही यासाठी सहकार्य करावे, ही विनंती. पण प्रकाशन वर्षानुसार उतरता क्रमाने पुस्तके लिहिणे हे अवघड काम वाटते, कारण यातील बहुतांश पुस्तकांचे नाव व लेखक ऐवढीच माहिती उपलब्ध आहे. बहुतेकांचे प्रकाशित होण्याचा काळ उपलब्ध नाही.--संदेश हिवाळेचर्चा १५:२७, १९ मार्च २०१८ (IST)Reply
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके" पानाकडे परत चला.