चर्चा:चैत्र पौर्णिमा (बौद्ध सण)

हा लेख वेगळा असू नये तर चैत्री पौर्णमा लेखातील एक विभाग असावा.

अभय नातू (चर्चा) ०८:२२, १२ एप्रिल २०१७ (IST)Reply

पौर्णिमांचे एकत्रिकरण नसावे संपादन

@अभय नातू: सर, विविध पौर्णिमांचे हिंदू व बौद्ध या दोन्ही धर्मात विशेष महत्त्व आहे. परंतु बौद्ध धर्म हा एक स्वतंत्र्य धर्म असून त्यातील चैत्र व इतर सर्व पौर्णिमांचे महत्त्व किंवा इतिहास/शिकवण हिंदू धर्माहून पुर्णपणे भिन्न आहे. त्यामुळे बौद्ध धर्मांसंबंधीच्या पौर्णिमांसाठी स्वतंत्र्य लेख असणेच अधिक महत्त्वाचे वाटते. म्हणून कृपया तुम्ही बौद्ध पौर्णिमांवर एकत्रिकरणाचे साचे लावू नका ही विनंती. --संदेश हिवाळेचर्चा २१:२४, २७ एप्रिल २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २१:२४, २७ एप्रिल २०१७ (IST)Reply

एकत्रीकरण असावे संपादन

@संदेश हिवाळे:,

बौद्ध धर्म स्वतंत्र आहे कि नाही, त्यातील शिकवण भिन्न आहे कि नाही हा मुद्दा येथे गौण आहे. हे लेख कालमापनातील एक quantum (दिवस) याबद्दल आहे. या दिवशी कायकाय विशेष आहे हे यात नमूद केले जाते. अशा एखाद्या दिवशी मुस्लिम, जैन, ख्रिश्चन किंवा इतर धर्मीय सण असला तर तोही येथेच एकत्रित केला जावा.

अर्थात यांना अपवाद असू शकतात पण ते अपवादच असावेत. सरसकट वेगळे लेख असू नयेत.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:४८, २७ एप्रिल २०१७ (IST)Reply

ता.क. एकत्रीकरण करताना प्रत्येक धर्मातील महत्व घालवणे किंवा एकत्र करणे अपेक्षित नाही. प्रत्येक धर्मासाठी वेगळा विभाग असावा, उदा -
==धार्मिक महत्व==
===हिंदू===
===जैन===
===इस्लाम===
वरील विधानाशी सहमत.

--वि. नरसीकर (चर्चा) २१:३५, २७ एप्रिल २०१७ (IST)Reply

ठिक आहे, मी एकत्रिकरण करतो. --संदेश हिवाळेचर्चा १२:२६, २८ एप्रिल २०१७ (IST)Reply

"चैत्र पौर्णिमा (बौद्ध सण)" पानाकडे परत चला.