चर्चा:चैत्यभूमी

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे

लेखात चित्रांची संख्या जास्तच झाली नाही का? स्थळाची वैशिष्ठ्ये दर्शविणारी नेमकी चित्रे असावीत. अन्यथा परिसराची चित्रे वेगळ्या उद्देशाने टाकली जावू शकतात. या निमित्ताने एखाद्या लेखात किती चित्रे असावीत याचा काही नियम/संकेत आहे का याची जाणकारांनी माहिती द्यावी.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:१८, २१ मार्च २०१८ (IST)Reply

लेखात दोनच प्रकारची चित्रे आहेत, एक चैत्यभूमीची व दुसरी तेथील दुकानांची. ‘स्थळाची वैशिष्ठ्ये दर्शविणारी नेमकी चित्रे असावीत.’ ही सर्व चित्रे लेखात आहेत. ‘अन्यथा परिसराची चित्रे वेगळ्या उद्देशाने टाकली जावू शकतात.’ हे कळाले नाही.--संदेश हिवाळेचर्चा १०:२७, २१ मार्च २०१८ (IST)Reply

दुकानांची चित्रे आवश्यक आहेत का? कोणत्याही पर्यटन स्थळाच्या आसपास दुकाने असणारच.असे प्रत्येक स्थळाच्या लेखात विक्रेत्यासह फोटो जाहिरात म्हणून टाकले जावू लागले तर योग्य आहे का? अशी प्रथा पडू शकते हे मला सुचवायचे आहे.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:४३, २१ मार्च २०१८ (IST)Reply

धन्यवाद. दुकानांची फोटो काढली आहेत.--संदेश हिवाळेचर्चा २२:१२, २१ मार्च २०१८ (IST)Reply
"चैत्यभूमी" पानाकडे परत चला.