चर्चा:चमच्या (पक्षी)

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू

हा लेख चमच्या नावाने देखील स्वतंत्रपणे दिसतो.. एकत्रीकरण व्हावे. प्रसाद साळवे (चर्चा) १२:३७, १७ एप्रिल २०१७ (IST)Reply

चमच्या लेखातील मजकूर खाली आहे. त्यातील योग्य मजकूर या लेखात समाविष्ट करावा
अभय नातू (चर्चा) १७:३५, १८ एप्रिल २०१७ (IST)Reply

Eurasian Spoonbill

चमचा हा एक पक्षी आहे. ह्याला मराठीत चमच्या, चाटू, किंवा दर्वीमुख हीही नावे आहेत. याची अन्य भाषांतील नावे अशी :

  • इंग्लिश : Eurasian spoonbill
  • गुजराथी : चमचो
  • तेलुगू : गंट मुक्कु कोंग, चमचा मुक्कु कोंग
  • नेपाळी : चम्चाठुँडे साँवरी
  • French : Spatule blanche
  • शास्त्रीय नाव : Platalea leucorodia
  • संस्कृत : खजाक, दर्विदा, श्वेत आटि
  • हिंदी : चमचवाला, चमचा, चमचा बाझ,चमजा, दाबिल, दाबिल, वगैरे

चमचा हा हिमशुभ्र रंगाचा जलचर पक्षी आहे. तो बदकापेक्षा मोठा असून त्याची मान लांब व पाय काळे व लांब असतात. त्याची चोच पळीच्या आकाराची लांब व काळी-पिवळी असते. त्याच्या गळ्यावर पिवळसर उडी रंगाचा डागासारखा ठिपका असतो. या चोचीच्या आकारावरून त्याला चमाचा हे नाव पडले.

वितरण

संपादन

हा पक्षी भारतात आणि श्रीलंकेमध्ये निवासी आणि भटका असून .मुंबईचा हिवाळी पाहुणा आहे. हा पक्षी भारतात पिले जन्माला घालतो.

निवासस्थाने

संपादन

दलदली, सरोवरे आणि चिखलाणी.

संदर्भ

संपादन
  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली
"चमच्या (पक्षी)" पानाकडे परत चला.