चर्चा:गौतमीपुत्र सातकर्णी

(चर्चा:गौतमीपुत्र सातकर्णि या पानावरून पुनर्निर्देशित)

चर्चा:शककर्ता शालिवाहन येथून सदस्य:Khiray यांची स्थानांतरीत जुनी चर्चा

संपादन

माझ्या माहिती प्रमाणे शालिवाहनाची राजधानी (आणि इतर सातवाहन राजांची राजधानी) पॆठण होती. शिवाय शालिवाहनाने दक्शिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वत:ला सार्वभॊम राजा घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तात्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला कि शककर्ता व्हायचं सामर्थ्य असेल तर ह्या हत्तिचे वजन किती हे नक्की सांगता येईल का?ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी उपाय असा काढला कि पॆठणच्या नागघाटावर गोदावरि नदित एक नाव सोडली. मग हत्तिला नावेत चढवले आणि पाणि नांवेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची खूण केलि. त्यानंतर हत्तिला बाहेर काढून त्याजागी माति भरली बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणि चढेपर्यंत. मग त्या मातिचे वजन केले व तो हत्ति वजनासकट परत पाठवला. ह्या त्याच्या बॊद्धिक विजयाने त्यानी सुरु केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात मान्य झाला.

खिरें

  • चर्चा:शककर्ता शालिवाहन येथून सदस्य:Khiray यांची स्थानांतरीत जुनी चर्चा

विक्रमादित्याशि युद्ध

संपादन

शालिवाहनाचे विक्रमादित्याशि युद्द्य होणे कठिण आहे कारण विक्रमादित्याने सुरु केलेला विक्रम संवत शालिवाहन शकाच्या सुमारे १३४ वर्ष आगोदर सुरु होतो. म्हणजे हे दोन्हि राजे समकालीन नाही असे वाटते.


  • चर्चा:शककर्ता शालिवाहन येथून सदस्य:Khiray यांची स्थानांतरीत जुनी चर्चा





लेख माहितीतील त्रुटींबद्दल बद्दल लक्षवेध

संपादन
चर्चा सहभाग विनंतीसाठी साद: @Khiray, Kapil, Priya v p, आणि J:

मराठी संकेतस्थळावर या लेखातील माहिती बद्दल खालील आक्षेप नोंदवले गेल्याची नोंद. नोंद करणार माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:३७, २७ जून २०१४ (IST)Reply


  • या लेखातील काही चुकीचे मुद्दे बघा:

१. शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे

योग्य उत्तर: हा शक कुशाणवंशीय कनिष्काने प्रचलित केला आणि त्याच्या क्षत्रपांनी प्रचलित ठेवला म्हणूनच पुढे याचे नामकरण शक संवत असेच झाले. पुढे कधीतरी ९व्या १० व्या शतकात ह्याला शालिवाहन नाम चिकटले. (हे डॉ. वा. वि.मिराशी, डॉ. शोभना गोखले आणि इअतर्ही कित्येक संशोधकांच्या संशोधनातून व्यक्त केले आहे.)

२. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले

योग्य उत्तरः सातवाहनांची उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रावरील सत्ता संपुष्टात आली होती मात्र पैठण आणि त्या खालचे परिसरात अजूनही ह्यांची राजवट होतीच.

३. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती

मातृसत्ताक ह्याचा अर्थ म्हणजे स्त्री हीच राज्यावर असणे. निव्वळ नावापुढे आईचे नाव लावणे म्हणजे मातृसत्ताक पद्धती नव्हे.

गौतमीपुत्र सातकर्णि, सातवाहन, पैठण

संपादन

सातवाहनांच्या कारकिर्दीपासून दक्षिण भारताच्या एकछत्री इतिहासाचा आरंभ होतो. इ.स.पू. २३० ते इ.स. २३० अशी ४६० वर्षे राज्य करणारे संपूर्ण भारतातील सातवाहन हे एकमेव राजघराणे होय. इतका श्रेष्ठ राजकीय वारसा लाभलेल्या या घराण्याच्या मूलस्थानासंबंधी, त्यांच्या कालखंडासंबंधी व त्यांच्या वंशासंबंधी भारतीय इतिहासकारांमध्ये एकमत नाही. पुराणातील उल्लेखानुसार या घराण्यात एकंदर तीस राजे झाले. इ.स. १५० नंतर त्यांची कारकीर्द प्रामुख्याने आंध्रप्रदेशात होती. म्हणून नंतरच्या पुराणकारांनी त्यांना आंध्रभृत्य किंवा आंध्रजातीय म्हणून उल्लेखिले आहे. त्यामुळे नंतरच्या आद्य व ज्येष्ठ संशोधकांनी त्यांना आंध्रचे ठरविण्याचा कसून प्रयत्न केला. स्मिथ, रॅपसन यासारख्या पाश्चिमात्य विद्वानांनीही याच मताचा पाठपुरावा केला. याउलट नंतरच्या काही विद्वानांनी त्यांना सातपुड्याचे, विदर्भाचे किंवा पुण्याचे ठरविण्याचा प्रयत्न केलेला आहे. सातवाहन घराणे मूळचे कोठले हा वाद दूर ठेवला तरी त्यांचा प्रतिष्ठानशी आरंभापासून संबंध असल्याचे शेकडो पुरावे मिळालेले आहेत. सातवाहन मूळचे पैठणचे असल्याचे लोकपरंपरा मानते. यासंदर्भात पैठण परिसरात शेकडो दंतकथा व लोकगीते प्रचलित आहेत. तसेच उपलब्ध वाड.मयीन परंपराही सातवाहनांना पैठणचे मानते. प्रबंध चिंतामणी या प्रसिद्ध जैन ग्रंथानुसार पैठण नगरीमध्ये एक ब्राह्मण कुमारी आपल्या दोन भावासमवेत राहत होती. ती अतिशय सुंदर होती..... (लेखन चालू)

दुसरी कथा कालकाचार्य कथा म्हणून प्रसिद्ध आहे. त्या कथेनुसार कालकाचार्य नावाचे जैनाचार्य सरस्वती नावाच्या आपल्या बहिणीसह......(लेखन चालू)

दुसर्या एका कालकाचार्य कथेनुसार कालकाचार्य पर्युषणपर्वाच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठानला आले व त्यांनी.......(लेखन चालू)

सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक. यानंतर सिमुक (श्रीमुख) गादीवर आला. जुन्नरजवळच्या.........(लेखन चालू)................नंतर गौतमीपुत्र सातकर्णि गादीवर आला. पुराणातील कथाप्रमाणे हा तेविसावा राजा. त्याने २१ वर्षे राज्य केले. मातृवाची अभिधान धारण करणारा तो पहिला सातकर्णि होय.........(लेखन चालू)

महादेवशास्त्री जोशी यांच्या तीर्थरूप महाराष्ट्र या पुस्तकातील नाथांचे पैठण या प्रकरणातील एक उतारा त्यांच्याच शब्दात जसाच्या तसा येथे उद्धृत करतो कुठूनतरी एक ब्राह्मणकन्या पैठणच्या एका कुंभाराकडे येऊन राहिली. त्याने तिचा प्रतिपाळ केला. शेष नावाच्या नागाचे तिच्यावर प्रेम जडले. त्याच्यापासून तिला जो पुत्र झाला तो शालिवाहन. तोही त्याच कुंभाराच्या घरी वाढला. कुंभार गाडगी मडकी घडवी तेव्हा हा त्या गार्यातली थोडी माती घेऊन हत्ती, घोडे, शिपाई बनवी. त्या मातीच्या चित्रांनी त्याने घरदार भरुन टाकले. जणू भवितव्यतेनेच त्याला हा चाळा लावला होता. अनेक सौंगडी जमवून तो जळीस्थळी खेळे. त्याच्याच कालात तिकडे नर्मदेच्या पलीकडे विक्रमाने आपला शक (संवत) सुरू केला होता. भारतखंडभर तो चालू व्हावा ही त्याची महत्त्वाकांक्षा होती. पण एका ज्योतिषाने त्याला सांगितले की, तुक्षा एक प्रतिस्पर्धी वाढतो आहे. तो दक्षिणेत आपला शक चालू करील. तू एका हत्तीच्या मस्तकावर सुवर्णपत्रिका लावून तो सोड. या हत्तीचे वजन करुन द्यावे नाहीतर युद्धाला सिद्ध व्हावे. अशी राज्याराज्यातून द्वाही फिरव. जो हत्तीला तुळील तो तुक्षा प्रतिस्पर्धी समज. विक्रमादित्याने तसे केले. हत्ती संरक्षकदलासह पैठणापर्यंत आला तोवर काही त्याचे वजन करणारा कोणी चतुरस्त्र भेटला नाही. शालिवाहनाने ते आव्हान स्विकारले. त्याने हत्तीला एका नावेत चढविले. नाव जिथवर पाण्यात बुडाली तिथे एक रेघ ओढली. मग हत्तीला उतरवून त्या रेघेपर्यंत बुडेल इतकी वाळू त्या नावेत भरली. त्या वाळूचे जे वजन तेच हत्तीचे. सर्वांना त्याच्या कल्पकतेचे नवल वाटले. विक्रमादित्याने त्याच्याशी युद्ध पुकारले. शालिवाहनाने कशाच्या बळावर त्याला तोंड द्यायचे? पण शेषनागाने त्याला आयत्यावेळी अमृत आणून दिले. ते त्या मृण्मय सैन्यावर शिंपडताच ते प्राणमय झाले. शालिवाहनाने तो दळभार विक्रमादित्यावर लोटला. त्याला नर्मदापार हूसकून लावले आणि लगेच त्याने आपला शक जाहीर केला. -- संतोष दहिवळ (चर्चा) ००:२२, १ जुलै २०१४ (IST)Reply

"गौतमीपुत्र सातकर्णी" पानाकडे परत चला.