चर्चा:कुऱ्हाड
येथे इंग्लिश आंतरविकि दुवा [en:Axe] असा दिलेला आहे. हा दुवा औजार म्हणून बरोबर आहे पण शस्त्र म्हणून Axe साठी परशू हा शब्द अधिक चपखल वाटतो.
अभय नातू १९:३१, १३ फेब्रुवारी २०११ (UTC)
ता.क. [en:Battle axe] हा लेख सापडला. परशू म्हणजे Battle Axe होईल.
अभय नातू १९:३३, १३ फेब्रुवारी २०११ (UTC)
कुऱ्हाड हा प्रामाणित की कुर्हाड?
संपादनकुऱ्हाड हा प्रामाणित की कुर्हाड? नेहमी लेखनात कुऱ्हाड हा आढळत नसुन कुर्हाड आढळतो, मग कोणता वापर योग्य हे जाणकारांनी ठरवावे...
Dr.sachin23 १८:५४, १० मे २०११ (UTC)
कुऱ्हाड प्रमाणित वाटते.
संपादन- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ यांनी शालेय अभ्यासक्रमासाठी निर्माण केलेल्या सर्व पाठ्यपुस्तकात ज्या ज्या ठिकाणी कुऱ्हाडीचा उल्लेख आलेला आहे त्या सर्व ठिकाणी हा शब्द कुऱ्हाड असाच मुद्रित केलेला आहे. कुर्हाड असा नाही.
- आदरणीय पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी संपादित केलेल्या 'भारतीय संस्कृतिकोश' खंड २ मध्ये पान नं ४३४ वर कुऱ्हाड असेच लिहिलेले आहे. कुर्हाड असे नाही. संतोष दहिवळ १९:२८, १० मे २०११ (UTC)
कुर्हाड, कुऱ्हाड
संपादनचावडीवरील अॅ, ऍ, इ. बद्दलची ताजी चर्चा वाचावी.
र्ह, ऱ्ह या दोन्ही जोडाक्षरांनी एकच ध्वनी अभिप्रेत असला तरी दोन्ही अक्षरे सगळ्याच संगणकांवर, फाँटांत किंवा ऑपरेटिंग सिस्टममध्ये नीट दिसतीलच असे नाही, तरी मला दिसते हेच बरोबर हा खाक्या सोडून प्रमाणित अक्षर वापरावे. सध्या येथे र्ह हे प्रमाणित मानले गेलेले आहे. ते प्रमाणित का नसावे याबद्दल मते मांडावीत.
जुन्या पुस्तकांच्या मुद्रणाचा आधार येथे नेहमी लागू होईलच असे नाही कारण ही पुस्तके छापली गेली तेव्हा मुद्रणप्रक्रिया आत्ताइतकी प्रगत नव्हती व त्यामुळे प्रकाशक, लेखक, मुद्रकांनी तडजोड करुन खिळे वापरल्याची अनेक उदाहरणे आहेत.
हा विषय धसाला लागेपर्यंत कोणतेही बदल करू नयेत, विशेषतः लेखांचे स्थानांतर करू नये, ही विनंती.
अभय नातू २०:०१, १० मे २०११ (UTC)