उपनिषदे पानावरील मजकुर स्थानांतरण

संपादन

वेदांच्या अखेरच्या रचनेतील ग्रंथ. शब्दश: गुरुंजवळ बसून मिळवलेली विद्या. उप=जवळ, निष=बसणे. श्रीमद्भगवद्गीता हे एक उपनिषद आहे.उपनिषदेही ब्राह्मण ग्रंथातच येतात. उपनिषदालाच वेदान्त असेही म्हटल्या जाते. वैदिक ज्ञानाचे अंतिम निष्कर्ष व ध्येय यात सांगण्यात आले आहे. वेबरच्या मतानुसार २३५ उपनिषदे आहेत. मुक्तिकोपनिषदात १०८ उपनिषदांची संख्या दिलेली आहे. यामधे ईश केन कठ प्रश्न मुण्डक मांडुक्य तैतरीय ऐतरेय छांदोग्य बृहदारण्यक कौषीतकी श्वेताश्वर ही उपनिषदे प्रसिद्ध आहेत.

एकशे आठ?

संपादन

खालील मजकूराची शहानिशा करुन योग्य तो मजकूर लेखात समाविष्ट करावा.

अभय नातू (चर्चा) ०६:०५, २५ मार्च २०१७ (IST)Reply


एकशें आठ उपनिषदे-

ऋग्वेदाच्या २१ शाखा,

यजुर्वेदाच्या १०९

सामवेदाच्या १०००

आणि

अथर्ववेदाच्या ५० अशा एकूण ११८० शाखागणिक असलेल्या उपनिषदांपैकीं प्रमुख उपनिषदें १०८ आहेत तीं :-

१ ईशावास्य, २ केन, ३ कठ, ४ प्रश्न, ५ मुण्ड, ६ माण्डुक्य, ७ तैत्तिरीय, ८ ऐतरेय, ९ छांदोग्य, १० बृहदारण्य,

११ ब्रम्ह, १२ कैवल्य, १३ जाबाल, १४ श्वेताश्वेतर, १५ हंस, १६ आरुणि, १७ गर्म, १८ नारायण, १९ परम, (हंस) २० (अमृत) बिंदु,

२१ (अमृत) नाद, २२ (अथर्व) शिरस्. २३ (अथर्व) शिखा, २४ मैत्रायिणी, २५ कौषीतकी, २६ बृहज्जाबाल, २७ नृसिंहतापिनी, २८ कालाग्निरुद्र, २९ मैत्रेयी, ३० सुबाल,

३१ क्षुरि (का) ३२ मन्त्रिका, ३३ सर्वसार, ३४ निरालंब, ३५ शुक (रहस्य), ३६ वज्रसूचिका, ३७ तेजो - (बिन्दु), ३८ नाद - (बिन्दु ३९ ध्यान-बिन्दु, ४० ब्रह्मविद्या,

४१ योगतत्व, ४२ आत्मबोधक, ४३ (नारद)- परिव्राज्जक, ४४ त्रिशिखि - (ब्राह्मण) ४५ सीता, ४६ (योग) चूडा - (मणि), ४७ निर्वाण, ४८ मण्डल- (ब्राह्मण) ४९ दक्षिणा - (मूर्ती) ५० शरम,

५१ स्कंद, ५२ महानारायण, ५३ अद्वय - (तारक) ५४ राम - (रहस्य) ५५ रामतपन, ५६ वासुदेव, ५७ मुद्र्ल, ५८ शाण्डिल्य, ५९ पिङगल, ६० भिक्षुक,

६१ महा, ६२ शारीरक, ६३ (योग)- शिखा, ६४ तुर्यातीत, ६५ संन्यास, ६६ (परमहंस)- परिव्राजक, ६७ अक्षमालिका, ६८ अव्यक्त, ६९ एकाक्षर, ७० (अन्न)- पूर्णा,

७१ सूर्य, ७२ अक्षिक, ७३ अध्यात्म, ७४ कुण्डिका, ७५ सावित्री, ७६ आत्म, ७७ पाशुपत, ७८ परव्रह्म, ७९ अवधूतक, ८० त्रिपूर तापन,

८१ देवी, ८२ त्रिपुर, ८३ कठ (रुद्र) ८४ भावना, ८५ रुद्र - (ह्रदय) ८६ (योग)- कुण्डली, ८७ भस्म - (जाबाल), ८८ रुद्राक्ष, ८९ गण - (पति) ९० (श्री जाबाल)- दर्शन,

९१ तारसार, ९२ महावाक्य, ९३ पञ्चब्रह्म, ९४ प्राण - (अग्निहोत्र), ९५ गोपाल (पूर्वतापिनी-उत्तरतापिनी), ९६ कृष्ण, ९७ याज्ञवल्क्य, ९८ वराह, ९९ शाठयानीय, १०० हयग्रीव, १०१ दत्तात्रेय, १०२ गुरुड, १०३ कलि (संतराण), १०४ जाबालि, १०५ सौभाग्यलक्ष्मी, १०६ सरस्वती (रहस्या), १०७ बव्ह्रच आणि १०८ मुक्तिकोपनिषद. " अष्टोत्तरशतस्यादौ प्रामाण्यं मुख्यमीरितम. " (रा. गी. १८-३)

या १०८ उपनिषदांव्यतिरिक्त अडया (मद्रास) वाचनालय संस्थेमार्फत आणखी ७१ उपनिषदें प्रसिद्ध झालीं आहेत. यांत दशोपनिषदें

"उपनिषद" पानाकडे परत चला.