इतरत्र सापडलेला मजकूर योग्य संपादने करुन येथे समाविष्ट करावा -- अभय नातू (चर्चा) ०१:५०, ८ मे २०१८ (IST)Reply


निसर्गात आपल्याला पाहवयास मिळणारा वृक्ष म्हणजे उबंर होय. या झाडाला हिंदू धर्मात पवित्र मानतात.

वर्णन : उबंराचे घड मोठे असते. झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते.या झाडाला फांद्या फुटतात. याची पाने हिरवी असतात. या पानाचा आकार लांबट असतो.पानावर शिरा असतात.हे झाड साधरणपणे ४० ते ४५ या झाडाला खोडाजवळ झुपक्यांनीगोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, पिकल्यावर लाल रंगाची होतात.


वैशिष्ट्ये : या झाडाखाली सद्गुरु दत्ताचे स्थान असते अशी श्रद्धा आहे.; म्हणून याला औदुंबर असे म्हणतात. जमिनीतील पाण्याचा साठा दर्शविणारे झाड आहे. उबंराचे फुल कधीच दिसत नाही.

धार्मिक महत्त्व : उबंराच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. उबंराच्या झाडाची पूजा करतात.

औषधी उपयोग : उबंराची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते.उबंराच्या पानांवरील बारीक फोडाचा उपयोग वांतीवर होतो. याची फळे व सालीचा रस अंगाला चोळून अंघोळ केल्यास कुष्ठरोग कमी होतो. गोवर, चमकी, अतिसार, उन्हाळी मधुमेह इत्यादी रोगांवर उबंराची फळे व पाने उपयोगी पडतात.


"उंबर" पानाकडे परत चला.