नकल-डकव अहवाल संपादन

  • स्त्रोताचा दुवा
  • स्त्रोताचा दिनांक 27 जुन 2018, काही तासांपुर्वी सामना मध्ये आलेली बातमी.
  • इंग्रजीमध्ये ज्याला क्लोज पेराफ़्रेजींग म्हणतात, त्यास्वरुपात नकल-डकव झालेली आहे.
  • ही धोरण आल्यापासून ज यांनी केलेली चौथी-पाचवी नकल-डकव आहे. त्यामुळे @Tiven2240:@अभय नातू: प्रचालकांनी आवश्यक कारवाई ती करावी. WikiSuresh (चर्चा) ०३:३२, २८ जून २०१८ (IST)Reply

मजकूर संपादन

@Sureshkhole:,

हे नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद. लेखातील थेट नक्कल असलेली वाक्ये काढली आहेत. इतर वाक्यांमध्ये नक्कल न करता असलेली सत्ये लिहीली असल्याचे दिसते. एखादी गोष्ट सत्य असली तर एकाने लिहिल्यास ते सत्य दुसऱ्याने लिहू नये असे होत नाही. सूर्यमालेत नऊ ग्रह आहेत ही गोष्ट कितीही फिरवून लिहिली तरी दोन लिखाणांत साम्य असणे साहजिक आहे कारण शेवटी असे लिखाण सत्यपरिस्थितीचेच वर्णन करते.

कायदेशीरदृष्ट्या क्लोझ पॅराफ्रेझिंग म्हणजे नेमके काय हे वकीलच सांगू शकेल.

@:,

तुमच्या वाचनात येणाऱ्या गोष्टींबद्दल तुम्ही लेख लिहिता हे चांगले आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत थेट नकल-डकव करू नये अशी नम्र सूचना.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०७:४२, २८ जून २०१८ (IST)Reply

"अशोक ढवण" पानाकडे परत चला.