चर्चा:अजिंठा-वेरूळची लेणी/जुनी चर्चा
काही दुवे
संपादन- India: Ajanta and Ellora Caves या पानावरही काही छायाचित्रे आणि माहिती आहे, जी आपण या लेखात समाविष्ट करू शकतो.
- वेरुळचे कैलास मंदिर
--परीक्षित 14:43, 15 फेब्रुवारी 2006 (UTC)
"संकेतस्थळे" हा शब्द "website" ह्या इंग्रजी शब्दाचा मराठी समानार्थी शब्द म्हणून कोणीतरी रचला आहे की काय?
"अमरकोषा"तल्या "कान्तार्थिनी तु या याति संकेतं साभिसारिका"मधल्या "संकेता"ची किंवा आपल्या मायबोलीतल्या "रानात सांग कानात आपुले नाते। मी भल्या पहाटे येते॥"मधल्या "राना"ची "संकेतस्थळ" हा शब्द आठवण करून देतो! तेव्हा माझ्याप्रमाणेच बहुतेक वाचकांना "संकेतस्थळे" हा शब्द विकिपीडिआ साहाय्याच्या संदर्भात गूढ रहाणार आहे अशी माझी बरीच खात्री आहे. वरच्या भावगीतातल्या "राना"सारखी "संकेतस्थळे" शोधून काढायला विकिपीडिआ साहाय्य करते की काय असाही विचार काही वाचकांच्या मनात उद्भवण्याची शक्यता आहे! तो घोटाळा टाळलेला बरा!!! (शेवटची दोन वाक्ये केवळ गमतीखातर लिहिली आहेत!)--Cgj 23:01, 15 मार्च 2006 (UTC)
आपल्याला "त्या" संकेतस्थळांची आठवण झाली हे वाचून गंमत वाटली ... मुळ भावगीतं ऐकलेली नसल्याने गोंधळ मात्र झाला नव्हता ;) असो .... संकेतस्थळ हा website ला मराठी पर्याय कोणी सुचवला याची मला कल्पना नाही, पण मराठी "संकेतस्थळांवर" (:)) हा शब्द प्रचलीत आहे. ऊदा. www.manogat.com, http://www.maayboli.com etc.
असे काही मराठी प्रतिशब्द सुचवणे व प्रचलीत करण्यात "मराठी ब्लोगविश्वाचाही http://marathiblogs.net/ मोठा सहभाग आहे.
असेच इतर काही मराठी प्रतिशब्द:
ब्लॉग - अनुदिनी click - टिचकी मारा यावरूनही आपणास अशीच काही विनोदी आठवण झाल्यास नक्की कळवा :)
--परीक्षित 00:04, 16 मार्च 2006 (UTC)
ह्या लेखातल्या चित्रातला वल्लभ आधल्या दिवशी ठरल्याप्रमाणे आपल्या प्रेयसीला "राना"त "संकेतस्थळी" (म्हणजे websiteवर एखाद्या "गप्पांच्या खोली"त --chatroomमधे-- नव्हे हं) "भल्या पहाटे" भेटल्यानंतर तिच्या उजव्या गालावर एक टिचकी मारून तिने आधल्या दिवशी सुचवल्याप्रमाणे तिच्या कानात त्याचे-तिचे "नाते" सांगत आहे का?
(आणि मग
"तू मारलिस गालावर टिचकी। त्यामुळे लागली मला उचकी।
उचकी सांगतेय करतोय आत्ता मत्पूर्ववल्लभ आठव माझा नक्की॥"
असे नवे भावगीत तिला स्फुरले होते का?)
--Cgj 05:09, 16 मार्च 2006 (UTC)
अजिंठा - इतिहास
संपादन"अजिंठा - इतिहास" ह्या सदरात "प्राचीन भारतात धर्मशाळा आणि लेणी ह्या वास्तू मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात आल्या होत्या" असे जे एक विधान आहे त्यातला लेण्यांचा उल्लेख अचूक आहे का? लेणी विश्रांतीसाठी उभारण्यात आली असण्याची शक्यता कमी भासते. लेणी विश्रांतीसाठी उभारण्यात आली होती ह्या हेतूविषयी काही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध असण्याची शक्यताही थोडी कमी भासते. "धर्मशाळा" ह्या नावाने ओळखल्या जाणार्या साध्यासिध्या अवशिष्ट पुरातन वास्तू अर्थात उघडपणे विश्रांतीसाठी उभारण्यात आलेल्या होत्या. देवळांचा उपयोग काही माणसे काही काळ विश्रांतीसाठी करतात, पण म्हणून कोणतीही देवळे विश्रांतीसाठी उभारण्यात आली होती किंवा येतात असे म्हणणे चुकीचे आहे.
- I agree and I suggest to verify the same from some authentic source.
- With regards,
- Harshalhayat 06:14, 27 मार्च 2006 (UTC)
हे पान रद्द करावे
संपादनअजिंठा-वेरूळची लेणी अशा नावाचा कोणताही प्रकार मुक्त विश्वकोषाच्या दृष्टीने निरर्थक आहे. सबब अजिंठा या नावे वेगळे पान आणि वेरुळ यानावे वेगळे पान तयार करून इथला संबंधित मजकूर त्या त्या पानावर स्थलांतरित करावा. त्यानंतर हे पानच रद्द करावे. मुंबई-पुणे किंवा इंग्लंड-अमेरिका असे पान कधी कुठल्या विश्वकोषात (विकीपिडीयावर तरी) पाहिले आहे काय? मग हा अजिंठा वेरुळची लेणी प्रकार कुठून उपजला? आणि कहर म्हणजे हा २००६ मध्ये मुख्यपृष्ठाचा लेख होता म्हणे, --मनोज २१:०६, १० मार्च २०१० (UTC)
हे पान रद्द करावे
संपादनरावसाहेब,
आपण हा लेख नीट वाचलात का? असा काय कहर वाटला?
अभय नातू ०४:४३, ११ मार्च २०१० (UTC)
ता.क. आपला माणूस म्हणून पूर्ण आदर ठेवून सांगतो, विचारल्याशिवाय आगाऊ सूचना/सल्ले या पानावर देण्याची गरज नाही. कुणीही न विचारता काहीही शिकवणे/सल्ले देणे मला निखालस अप्रिय आहे. धन्यवाद.... :-) :-D :-P
वरील (तिरक्या अक्षरातील) टाचण मी एका सदस्याच्याच पानावरुन घेतले आहे. हे माझे वैयक्तिक मत नाही. ...
साहेब,
लेख वाचल्यानंतरच वरचे मत व्यक्त केले आहे. केवळ या दोन लेण्या एकाच पानावर बसवणे, विकिपिडीयाचे विश्वकोषाचे स्वरूप पाहता योग्य नाही. (केवळ टूर ऑपरेटर पर्यटकांसाठी ते एकत्र करत असतील तर ते त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने योग्य असेल, त्याचा येथे विचार करण्याची गरज नाही.) एकतर औरंगाबाद परिसरातल्या लेण्या असा उल्लेख करून त्याच भागातल्या आणखीही लेण्यांचा ( जसे औरंगाबादची लेणी इ.) समावेश या पानावर करायला हवा, ते इतिहास आणि पुरातत्वाच्या दृष्टीने योग्य आणि विकीपिडीयाच्या विश्वकोषाच्या स्वरूपाला धरून असे ठरेल. किंवा मग सरळ अजिंठा आणि वेरूळ अशी दोन वेगळी पाने करावीत, या सूचनेत गैर ते काय.
केवळ दोन सदस्यांतल्या आदानप्रदानापर्यंत आपली पोहोच आहे यासाठी तिथले वाक्य संदर्भाशिवाय उधृत करण्याचा, आणि त्यावर तोंडे वेडीवाकडी करत हसण्याची चिन्हे जोडण्याचा तिरकेपणा योग्य म्हणावा काय?- मनोज १०:३८, ११ मार्च २०१० (UTC)
- या सूचनेत गैर ते काय
- मग हा अजिंठा वेरुळची लेणी प्रकार कुठून उपजला? आणि कहर म्हणजे हा २००६ मध्ये मुख्यपृष्ठाचा लेख होता म्हणे
- ही आढ्य भाषा. तुम्हाला हीच गोष्ट सरळ शब्दात ही सांगता आली असती. जर तुम्ही आढ्यता दाखवलीत, तर सव्वापट खोचकपणा दाखवण्यासाठी येथे तुमच्याहून थोर शहाणे (त्यात मी स्वतःला धरत नाही) बसलेले आहेत.
- केवळ दोन सदस्यांतल्या आदानप्रदानापर्यंत आपली पोहोच आहे यासाठी तिथले वाक्य संदर्भाशिवाय उधृत करण्याचा, आणि त्यावर तोंडे वेडीवाकडी करत हसण्याची चिन्हे जोडण्याचा तिरकेपणा योग्य म्हणावा काय?
- १. विकिपीडियावरील सगळे लेखन मुक्त असते. त्यावर कोणालाही टिप्पणी करण्याचा अधिकार असतो.
- २. तुम्ही येथे केलेल्या (तुमच्याच निकषाने -- आगाऊ) सूचना आणि माहितगार यांच्या मदतीपर संदेशाला तुम्ही दिलेले उद्धट उत्तर पाहून मजा वाटली आणि हसूही आले. ते मी व्यक्त केले. यावर तुमची हरकत असू नये.
- मी केलेल्या टिप्पणीने तुम्हाला राग आला असला तर क्षमा असावी पण विकिपीडियावर लिहिताना किंवा वाचताना हे जरुर लक्षात घ्यावे की येथील बहुतांश लेखक मराठी भाषेतून काहीतरी उत्तम तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी एकमेकांना मदत (न मागता सुद्धा) करणे ही येथील रीतच आहे. जर हे तुम्हाला अप्रिय असेल तर तुमचे येथे सारखेच वाद होतील.
- असो. झालेगेले सोडून द्या (मी तरी देतो) आणि जोमाने येथे भर घाला. चूक आढळल्यास जरुर लक्षात आणून द्या पण थोड्या मऊ शब्दात. येथे सगळेच घरचे खाउन लश्करच्या भाकरी भाजत आहेत, तरी ते लक्षात घेउन मगच संवाद साधा.
- क.लो.अ.
- अभय नातू १६:०८, ११ मार्च २०१० (UTC)
वाद आणि टाळी दोन्ही बाजूंनी वाजते
अभय नातू हे नाव येथे धारण करणारे महोदय,
माझ्या या पानावरच्या पहिल्या सूचनेत एखादे वाक्य, महोदय, आपण म्हणता तसे आढ्य वाटल्यास, तसे वाटण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, तसेच ते येथे थेटपणे व्यक्त करण्याचा आपला अधिकारही मी नाकारत नाही. पण मला माझ्या त्या विधानात आढ्यता वाटत नाही. भाषेच्या छटा काही मैलागणिक बदलतात हे सार्वकालिक सत्य माझ्या विधानांना आढ्य म्हणताना आपण लक्षात घेतलेले दिसत नाही असे माझे मत झाले आहे. मी या चर्चा पानांवर लिहीलेल्या सर्व शब्दांच्या (उपजला, कहर, आगाऊ इ.) आणि शब्दसमुहांच्या सर्व अर्थच्छटा आणि उपयोग नीट समजून घेतले तर, माझ्या लिखाणात आढ्यता काहीच नाही.
मात्र महोदय, आपण काय केलेत?
लेख नीट वाचलात का? असा प्रश्न विचारून मी लेख न वाचताच मत मांडत असल्याची अप्रत्यक्ष टिका केलीत. त्यानंतर, माझ्या चर्चा पानावरचे वाक्य इथे तिरके करून संदर्भाशिवायच जोडलेत. त्याची गरज नव्हतीच, शिवाय हे करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही मलाच ठणकावलेत. तोंडे वेडीवाकडी करत हसण्याची चिह्ने जोडून हसत असल्याचे दर्शवित आपण माझ्या सूचनेचा उपहास केलात. हे सारे करताना आपल्याला काय म्हणायचे आहे ते थेट आणि संयत शब्दात आपण सांगितले नाहीतच. उलट प्रश्न करून मलाच जाब विचारल्याचा आभास निर्माण केलात. माझ्या भाषेविषयी लिहीताना आढ्य, उद्धट, खोचक अशी अत्यंत बोचणारी विशेषणे आपण वापरता आहात, माझ्या विधानांची तुम्हाला मजा वाटते, हसू येते असे तर आपण लिहून आणि चिन्हीत करूनही दाखवता आहात. आढ्यता दाखवलीत तर.. असे म्हणणारा वाक्यांश तर जणूकाही दम भरणाराच आहे. आणि हे सगळे स्वतःच सुरु करून, स्वतःचे मनोरंजन पूर्ण झाल्यानंतर क्षमा शब्द उच्चारून मिटवण्याची भाषाही करता आहात.
शाळा कॉलेजात रिकाम्या तासाला वेळ जात नसला की धष्टपुष्ट मुले एखाद्या नव्या मुलाशी अशीच वागतात. त्याला खेळवतात. मग मन भरले की काहीतरी सांत्वनाचे बोलून सोडून देतात. (म्हणजे मग ते भित्रंही खुष होतं. मास्तरांकडे तक्रार करत नाही.) त्याला इंग्रजीत बुलिईंग म्हणतात. आपण इथले, मराठी विकीपिडीयाचे सध्या अधिकारी आहात असे काही पानांवर आपल्या नावापुढे दिसले.
आपणही मराठी विकिपिडीयावर प्राप्त अधिकाराचा वापर करीत तसेच बुलिईंग करीत आहात की काय?
विकीपिडीयावर मोबदला मिळत नाही, हे ध्वनित करतानाही मराठी बोलीतली विनामोबदला कामाविषयी तुच्छता व्यक्त करणारी एक जुनी म्हण आपण वापरलीत. असे करून, येथे ज्ञानार्जन आणि ज्ञानसंपादनाच्या नोबल कॉज मध्ये गुंतलेल्या जगभरच्या विकिपिडीया कार्यकर्त्यांचा आपण उपाहास करीत आहात. आपण हेतुतः हे केले, असे माझ्यासारख्या सामान्य विकिपिडीया प्रेमीने का मानू नये?
चुकलो तर कोणीतरी सुधारून द्या, पण विकीपिडीया हा अनेक अडचणींना तोंड देत, हल्ले पचवत, शांतपणे, गंभीरपणे ज्ञान अर्जन आणि ज्ञान संपादन करण्यात गुंतलेल्या जगभरातल्या निःस्वार्थ सदस्य- कार्यकर्त्यांचा महासागर आहे असे मी मानतो. ही केवळ उपहास करण्याची, शेलकी विशेषणे वापरत मजा घेण्याची जागा नव्हे - अधिकारी विनामोबदला काम करीत असले तरीही. भारतीय सिव्हिलायझेशनमध्ये प्राचीन काळी वर्णित ऋषिसमुहासमान मला बहुसंख्य विकी-कार्यकर्त्यांची मनःस्थिती भासते. साहजिकच इथले अधिकारी इथल्या सामान्य कार्यकर्त्यापेक्षाही अधिक पक्व, अधिक समंजस, जबाबदार, न्याय्य असायला हवेत. त्यांना विश्वकोषाची, त्याच्या स्वरूपाची, त्यातल्या लेखविषयाच्या स्वरूपाची माहिती हवी. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञानाविषयी, त्याबाबतच्या चर्चेविषयी किमान गांभीर्य असलेले असावेत ही माझीतरी अपेक्षा आहे.
आपली विधाने त्याउलट सामान्य सदस्य-कार्यकर्त्याचा उपहास करणारी, उलट जाब विचारणारी, बोचरी विशेषणे वापरणारी, अप्रत्यक्ष का होईना दम भरणारी, मजा घेणारी आणि सर्वात महत्वाचे, इथल्या कार्याविषयीच अप्रत्यक्षपणे तुच्छता व्यक्त करणारी आहेत, असा माझा अनुभव आहे.
इथली सारी चर्चा, माझ्या या उत्तरासकट मी इंग्रजीत भाषांतर करून उपलब्ध करून देण्याच्या विचारातच नाही, त्यावर कामही सुरु आहे. सुदैवाने मला मराठी ते इंग्रजी भाषांतरही उत्तम येते. ते इंग्रजी विकीपिडीयातील धुरीणांना गरज भासल्यास उपयोगी पडू शकेल. अत्यंत अल्पावधीतच आपल्याकडून मला हा विषण्ण करणारा अनुभव आला आहे. त्यामुळे आपल्याविषयी, एका ठराविक गटापलिकडे, इतर सदस्यांचा अनुभव कसा आहे हेही मी तपासत राहणार आहे. मराठी विकीपिडीयावर काही विशीष्टांचे वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे का, याकडे तर माझे बारीक लक्ष असेल. ते अंतिमतः मराठी विकिपिडियाच्या हिताचेच असेल. धन्यवाद. - मनोज २३:४९, ११ मार्च २०१० (UTC)
ता. क. यातला मजकूर तुमच्या सवयीला अंमळ कठोर वाटेल पण तुमच्या गोग्गोड पलिकडे अशीही मराठी असते बरं, अगदी प्रमाण मराठी.
- मनोजराव,
२००६ मध्ये ज्यावेळी मराठी विकिपीडियावर सात-आठ हजार लेख आणि हाता-पायाच्या बोटावर मोजण्या इतकेच दर्जेदार लेख होते त्यावेळी हा आणि असेच आणखी काही लेख मासिक सदर म्हणुन ठेवले होते. तुम्हाला आता काही चुकीचे वाटले तर बिनधास्त जाउन बदल करा. आणि माझ्या आनुभवानुसार येथील लोकांशी बोलताना कठोर भाषा न वापरताही कामे केली जाऊ शकतात, त्यामुळे त्याचाही विचार करा. - कोल्हापुरी ०४:५५, १२ मार्च २०१० (UTC)
- अभय नातू हे नाव येथे धारण करणारे महोदय,
- मनोज, हेच का तुमचे नाव? असेल किंवा नसेल. नुसतेच अभय नातू, इतके म्हणणे बरोबर की वरील फालतू संबोधन? आँ?
- मी या चर्चा पानांवर लिहीलेल्या सर्व शब्दांच्या (उपजला, कहर, आगाऊ इ.) आणि शब्दसमुहांच्या सर्व अर्थच्छटा आणि उपयोग नीट समजून घेतले तर, माझ्या लिखाणात आढ्यता काहीच नाही.
- हे सगळे तुमचेच शब्द आहेत. वापरुन झाल्यावर सावरु नका. केले ते केले. आता कशाला त्याचे समर्थन करता?
- आढ्यता दाखवलीत तर.. असे म्हणणारा वाक्यांश तर जणूकाही दम भरणाराच आहे.
- माझ्या शब्दांचे आपणच पृथक्करण करून तेच माझ्या मनात आहे हे आता तुम्ही मला सांगणार?
- आणि हे सगळे स्वतःच सुरु करून, स्वतःचे मनोरंजन पूर्ण झाल्यानंतर क्षमा शब्द उच्चारून मिटवण्याची भाषाही करता आहात.
- पाहिजे तर तसे समजा नाहीतर सोडून द्या. बुलिइंग म्हणता, मनोजराव, सरळ बोलणे सोडून कोणी कहर, इ. शब्द वापरले? तुमचे बुलिइंग तुमच्याच अंगावर उलटल्यावर हा सगळा कांगावा कि काय?
- विकीपिडीयावर मोबदला मिळत नाही, हे ध्वनित करतानाही मराठी बोलीतली विनामोबदला कामाविषयी तुच्छता व्यक्त करणारी एक जुनी म्हण आपण वापरलीत. असे करून, येथे ज्ञानार्जन आणि ज्ञानसंपादनाच्या नोबल कॉज मध्ये गुंतलेल्या जगभरच्या विकिपिडीया कार्यकर्त्यांचा आपण उपाहास करीत आहात. आपण हेतुतः हे केले, असे माझ्यासारख्या सामान्य विकिपिडीया प्रेमीने का मानू नये?
- आता पुन्हा तुमच्या मनातील शब्द माझ्या तोंडात कोंबता? येथे विनामोबदला काम करणार्यांचे कौतुक कोणी व किती केले आहे याची एकदा खातरजमा करावी. प्रसंगी झालेले वाद सोडवण्यात आणि मने जुळवण्यात कोणी भाग घेतला हे ही जाणून घ्यावे. प्रसंगी उपटसुंभाशी दोन हात (अर्थात आत्तापर्यंत तरी शाब्दिक) करण्यात कोणी मागेपुढे पाहिले नाही हे सुद्धा पहा. तुमचे येथील काम मला फारसे दिसले नाही. इतर विकिपीडियावर काय केले हे माहिती नाही व जाणून घेण्याची फारशी इच्छाही नाही पण अचानक एके दिवशी येउन नुसती टीका केलीत याची मला गंमत वाटली. माहितगार हे येथील प्रबंधक आहेत. त्यांचे येथील योगदान बहुमोल आहे. त्यांनी तुम्हाला मदत करण्याचे धाडस केले असता उद्धटपणे उत्तरे दिलीत, यात तुमची किती समंजसता, जबाबदारी, न्याय्य वागणूक दिसली? मला म्हणता तोंडे वाकडीतिकडी वगैरे केली, पण अहो काका, तुमचे वागणे पाहिलेत का? आंतरजालावर इमोटिकॉन्स वापरणे व त्यांचा अर्थ हे तुम्हाल समजवून द्यावे लागू नये.
- भारतीय सिव्हिलायझेशनमध्ये प्राचीन काळी वर्णित ऋषिसमुहासमान मला बहुसंख्य विकी-कार्यकर्त्यांची मनःस्थिती भासते. साहजिकच इथले अधिकारी इथल्या सामान्य कार्यकर्त्यापेक्षाही अधिक पक्व, अधिक समंजस, जबाबदार, न्याय्य असायला हवेत. त्यांना विश्वकोषाची, त्याच्या स्वरूपाची, त्यातल्या लेखविषयाच्या स्वरूपाची माहिती हवी. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञानाविषयी, त्याबाबतच्या चर्चेविषयी किमान गांभीर्य असलेले असावेत ही माझीतरी अपेक्षा आहे.
- वा! जड जड शब्द वापरलेत पण अर्थ काय? वर म्हणल्याप्रमाणे जरा मागे जाउन माझी व इतर प्रबंधकाची वागणूक पहा व नंतर अशा प्रकारची पॅसिव्ह-ऍग्रेसिव्ह भाषा करा.
- आपली विधाने त्याउलट सामान्य सदस्य-कार्यकर्त्याचा उपहास करणारी, उलट जाब विचारणारी, बोचरी विशेषणे वापरणारी, अप्रत्यक्ष का होईना दम भरणारी, मजा घेणारी आणि सर्वात महत्वाचे, इथल्या कार्याविषयीच अप्रत्यक्षपणे तुच्छता व्यक्त करणारी आहेत, असा माझा अनुभव आहे.
- तुमचा येथील अनुभव फारसा नाही इतकेच म्हणतो.
- इथली सारी चर्चा, माझ्या या उत्तरासकट मी इंग्रजीत भाषांतर करून उपलब्ध करून देण्याच्या विचारातच नाही, त्यावर कामही सुरु आहे. सुदैवाने मला मराठी ते इंग्रजी भाषांतरही उत्तम येते. ते इंग्रजी विकीपिडीयातील धुरीणांना गरज भासल्यास उपयोगी पडू शकेल.
- अगदी जरुर करा. इंग्लिशवर माझेही प्रभुत्व आहे. गरज पडल्यास माझे समर्थन करण्यास माझ्याकडे भरपूर साठा आहे. तुम्ही ती जबाबदारी घेतलीत तर तुमची २-३ वर्षे (होय, वर्षे) अगदी सहज निघून जातील.
- आपल्याविषयी, एका ठराविक गटापलिकडे, इतर सदस्यांचा अनुभव कसा आहे हेही मी तपासत राहणार आहे.
- अगदी खुशाल करा. फक्त आपल्याला सोयीस्कर इतकेच अनुभव घेऊ नका.
- मराठी विकीपिडीयावर काही विशीष्टांचे वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे का, याकडे तर माझे बारीक लक्ष असेल.
- हे सगळे वितंडवाद करण्याऐवजी थोडे विधायक काम केलेत तर तेच मराठी विकिपीडियाच्या हिताचे असेल.
- असो. क.लो.अ.
- नसला तरी फारसे बिघडत नाही.
- अभय नातू ०६:३८, १२ मार्च २०१० (UTC)
वापरकर्ते (यूजर) अभय नातू , आपल्या अधिकाराची, अनुभवाची वस्त्रे लेवून हा वाद सुरुच ठेवण्यातच आपल्याला रस दिसतो. ठीक आहे.
(१) आपल्या दोघांचीही उर्जा यात व्यर्थ जाईल पण या वादातली अखेरची पोस्ट माझी असेल तोपर्यंत हे सुरु राहील. असे का, त्याचे कारण : वादातली पहिली पोस्ट तुमची होती. (इथे तुम्ही म्हणू शकता की पहिली पोस्ट वास्तविक माझी म्हणजे मनोजचीच होती. पण ती पोस्ट मी आपल्याला उद्देशून केलेली नव्हती, आपल्या चर्चा पानावरही ती नाही नव्हती. आपण माझ्या मात्र माझ्या वैयक्तिक पानावरचे संदर्भ तिरके देत पहिली पोस्ट लिहीली आणि हा वाद सुरु झाला. त्यामुळे वाद सुरु करण्याचे श्रेय आपल्याकडेच जाते. म्हणून तो संपेल तर माझ्याच पोस्टने संपेल, असा आग्रह धरण्यात मलातरी चूक वाटत नाही. वास्तविक इथे वर कोल्हापुरींनी येथे वर जसे छानसे उत्तर दिले आहे, तसे काही पहिल्यांदाच मिळते तर हा वादच उत्पन्न होता ना. असो.
(२) माझे वय माहिती असण्याचे कारण नाही तरीही आपण मला उद्देशून काका म्हणालात, बरे वाटले. अनेकदा बोलीभाषेत काकाचा वापर थेरडा, म्हातारा यांना पर्यायवाचक म्हणून केला जाताना मी पाहिले आहे. पण आपण त्या उदेदशाने म्हटलेले नाही, हे (तरी) मी बरोब्बर ओळखले (आहे काय?). मला काका म्हणता म्हणजे आपण त्यामानाने फारच ज्युनिअर दिसता. तरीही मोठ्यांच्या वाक्यांना वाक्ये देत वाद वाढविण्याचे आपले कौशल्य वादातीत आहे. अरेरे मला मात्र काकांसोबत हा आनंद घेताच आला नाही. काय करणार, मोठ्यांसोबत वाद घालू नये असलेच काही गंजलेले संस्कार नको त्या वयात झाले. असो. कधी, मी तुझा काका आहे, असे चूकूनही एकेरीवर येणे झालेच वाईट वाटून घेऊ नये, कारण आपणच मला पहिल्यांदा काका म्हणाला आहात.
(३) आपले नवे विश्लेषण लेखीपणा आणि सभ्यता सोडून बोलिभाषेकडे आणि तू-तू-मै-मै छापाकडे येत चालल्याचे माझे मत आहे. चर्चापानावर बोलिभाषा वापरण्याचा विकीपीडियात प्रघात आहे का, हे आपण इथले अनुभवी असल्याने आधीच सांगावे. म्हणजे मग महाराष्ट्रातल्या सर्व बोलीभाषाही त्यांचे (होलिकोत्सवातलेही) सौंदर्य घेऊन उतरवता येतील. हे कृपया लवकरात लवकर कळवावे म्हणजे पुढे त्यानुसार मांडणी (का उधळण) करता येईल. बाकी मुद्दे आपल्या उत्तरानंतर. धन्यवाद.
- मनोज ०९:०२, १२ मार्च २०१० (UTC)
- आपल्या दोघांचीही उर्जा यात व्यर्थ जाईल पण या वादातली अखेरची पोस्ट माझी असेल तोपर्यंत हे सुरु राहील.
- ठीक. मला अधूनमधून वेळ मिळतो. येथे उत्तर देत जाईन. तुमची खोडी काढायला हा चांगला मार्ग तुम्हीच दाखवून दिलात. :-D <-- वेडीवाकडी तोंडे
- उर्जा व्यर्थ जाईल असे कळून सुद्धा घालवता. छान.
- इथे वर कोल्हापुरींनी येथे वर जसे छानसे उत्तर दिले आहे
- माहितगारांनी सुद्धा असेच काहीसे करण्याचे प्रतत्न केले होते. तुम्ही पूर्वग्रहदूषित नजरेने त्यांना धुडकावुन लावलेत आणि त्यांना नको म्हणलेली हरकत स्वतःच केलीत. हा प्रकार (दांभिकपणा म्हणा हवे तर) मी उद्धृत केला. तुम्हाला राग आला आणि ही तू-तू-मैं-मैं सुरू झाली. पण ठीक, तुमचा वेळ कसा घालवावा ते तुम्हीच ठरवणार.
- मला उद्देशून काका म्हणालात, बरे वाटले
- अहो आजोबा सुद्धा म्हणतो पाहिजे असल्यास. बाकीची वाक्ये वैतागवाचक आहेत असे समजून सोडून देतो.
- चर्चापानावर बोलिभाषा वापरण्याचा विकीपीडियात प्रघात आहे का, हे आपण इथले अनुभवी असल्याने आधीच सांगावे. म्हणजे मग महाराष्ट्रातल्या सर्व बोलीभाषाही त्यांचे...
- पाहिजे ते लिहा, कोणती ही आडकाठी नाही. अर्वाच्य भाषा वापरलीत तर इतर सदस्य किंवा प्रबंधक ती काढतीलच. आत्ता
- (होलिकोत्सवातलेही) सौंदर्य घेऊन उतरवता येतील. हे कृपया लवकरात लवकर कळवावे म्हणजे पुढे त्यानुसार मांडणी (का उधळण) करता येईल.
- आत्तापर्यंत तोडलेले तारे कमी पडले का? आत्ताच होळी झाली, शब्दकोशाची पारायणे झालेली दिसत आहेत. :-)
- अभय नातू १६:२०, १२ मार्च २०१० (UTC)
- ता.क. :-) :-P असे (तोंडे वेडीवाकडी केल्याचे) लिहिल्याने तुमचा पारा चढतो का?
> उर्जा व्यर्थ जाईल असे कळून सुद्धा घालवता. छान.
- हो माझ्या कोड्याचं उत्तर मला मिळालय. आता हा वाद सुरु राहील तो अधिकारपदातून आलेला अहंकार उतरवण्यासाठी. हे कुणीतरी केलेच पाहिजे. धाकटे चुकत असतील तर काका-आजोबांचे ते कर्तव्यच ठरते नाही का. मराठी विकीपिडीयावरून नव्यांना पळवून लावून मोजक्याच यूजरनेमकडे सगळ्या किल्ल्या ठेवण्याचा प्रयत्न करणारांशी दोन शाब्दिक हात करणे क्रमप्राप्तच दिसते आहे. लोकशाहीचा आव आणत, विरोध आणि वेगळे मत शिल्लक ठेवायचेच नाही, हा खेळ जुनाच आहे. त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न चालले आहेत का ?
होळीनंतर नाथषष्ठीही आलीय. शंभराहून अधिक वेळा गोदास्नानाचं पुण्य कुणी देणारच असेल तर ते घेण्याशिवाय काय पर्याय आहे. - मनोज १८:४१, १२ मार्च २०१० (UTC)
- आता हा वाद सुरु राहील तो अधिकारपदातून आलेला अहंकार उतरवण्यासाठी
- अहंकार कोणाला व कशासाठी आहे हे स्पष्टच झालेले आहे. माझ्या अधिकारांचा काडीमात्र उपयोग न करता हे चाललेले आहे.
- मराठी विकीपिडीयावरून नव्यांना पळवून लावून मोजक्याच यूजरनेमकडे सगळ्या किल्ल्या ठेवण्याचा प्रयत्न करणारांशी ..
- होतात कोठे हो इतकी वर्षे? आता येउन आपली ठोकशाही बसवण्याची करतूत तुमची चाललेली आहे.
- लोकशाहीचा आव आणत, विरोध आणि वेगळे मत शिल्लक ठेवायचेच नाही, हा खेळ जुनाच आहे
- आरशात पहा राव. गेल्या ४-५ वर्षांचा माझा येथील इतिहास पहा आणि मग बोला. यात अनुभवाचे वजन टाकण्याच हेतू नाही तर तुमचा पोरकटपणा दाखवून देण्याचा आहे. एक १०-२० हजार संपादने करा म्हणजे अंदाज येईल विकिपीडिया कशाशी खातात ते.
- अभय नातू २०:२१, १२ मार्च २०१० (UTC)
थांबवा आता तरी आपली चर्चा न होता भांडण होतेय.
संपादनविकिपिडियाच्या दृष्टिने भांडण करण्या ऐवजी या वेळेचा व शक्तीचा वापर करून इतर् नवीन लेख तयार झाले असते. मला आपली चर्चा काय झाली हे माहित नाही पण.....माणसे जोडायला वेळ लागतो.तोडायला क्षण ही पुरेसा.मराठी विकिपिडियावर जर असे झाले तर...........................................................................
रकटे वादाचं सोडा हो,मला काका आजोबा म्हणत नातू खेळतोय. आता शब्दाला शब्द वाढवला त्यानं तरी आपलाच नातू, सांगणार कुणाला ? आपणच नीट (म्हणजे व्यवस्थित) करायला हवे, नाही का ? तेंव्हा मूळ मुद्दा आहे, तो हे अजिंठा आणि वेरूळचं पान नीट (म्हणजे व्यवस्थित) वेगळं कसं करता येईल. कारण स्थानांतरीत करायचं म्हटलं तर ते कुठल्यातरी एकाच नावानं होईल. दुसरं पान नव क्रिएट करता येईल. पण हाच मजकूर कुणीही (समजा मी) तिथं चिकटवायला गेलो तर तो माझ्या नावानं चिकटेल, आणि मूळ भर घालणाराचं श्रेय हिरावल्यासारखं होईल... पान स्प्लिट करून स्थानांतरित करण्यासारखी काही आयडिया इथं अस्तित्वात आहे का, ते बघा ना जरा. - मनोज १९:२९, १२ मार्च २०१० (UTC)
- मला काका आजोबा म्हणत नातू खेळतोय
- तुला काय मग आजी अन आत्या म्हणू का? आत्तापर्यंत तुला आदरार्थी मानवाचक संबोधले तर तू एकेरीवर उतरतोस काय?
- हे अजिंठा आणि वेरूळचं पान नीट (म्हणजे व्यवस्थित) वेगळं कसं करता येईल
- मग हे आधीच असे विचारायला काय झाले? वाकड्यात तू शिरलास लेका आणि सोंग आणतो साधू असल्याचा? ऐक तर मग मला काय वाटते ते --
- १. हे पान पूर्वीचे मुखपृष्ठ सदर असल्याने त्याला इतर अनेक ठिकाणांहून दुवे आहेत, तरी हे पान पूर्णपणे घालवू नये.
- २. या पानावरच्या माहितीत भर घालून दोन्ही लेण्यांचे वेगळे लेख तयार करावे -- अजिंठा-वेरूळची लेणी आणि वेरुळ लेणी.
- ३. या पानावरील माहिती न काढता प्रत्येक लेण्याच्या उपशीर्षका खाली {{मुख्यलेख|अजिंठा लेणी}}, {{मुख्यलेख|वेरुळ लेणी}} असे घालावे. पाहिजे तर या लेखाच्या सुरुवातीसच ही लेणी एकत्र नसून दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत असे स्पष्ट करणारा मजकूर घालावा.
- ४. तुमचे (व इतरांचे) मत काय आहे हे येथे नमूद करावे.
- ५. इतर काही शंका असल्यास मांडावी.
- आता हे सगळे लिहिले, तरी वैयक्तिक शिव्या देणार असाल तर मग चालूच देत.
- अभय नातू २०:३२, १२ मार्च २०१० (UTC)
श्रीमान,
आपली चर्चेची पातळी घसरते आहे, पुढील मुद्द्यांचां शांतपणे विचार करावा, प्रत्युत्तराची घाई करू नये, इतकेच सुचवतो
१) या वादाची सुरवात आपण माझ्या इतर पानावरचा कोट इथे संदर्भाशिवाय वापरून, त्यापुढे हसण्याची इमोटिकॉन देऊन केलीत. माझ्या हाती फक्त आपल्या विधानांला, ते कसेही असले तरी, उत्तरे देणे आहे, ते मी करतो आहे. त्यानंतर आतापर्यंत माझ्या भाषेला आढ्यपासून दांभिकपर्यंत काय काय म्हणालात. हे सगळे मी किंवा कुणीही गप्प बसून पाहावे अशी आपली अपेक्षा आहे की काय? स्वतःला माझ्याजागी ठेवून आपले हे सगळे पान पुन्हा वाचा.
२) मी जो उल्लेख इतर विकिकराशी बोलताना केला तो आपण आजोबा मानायची तयारी दाखवली,त्या अनुषंगाने आजोबा- नातू या नात्यासाऱखा केला. या गोड नात्यात नातू हा एकेरीच असतो. मी आतापर्यंत तरी विकिपीडियावर कुणालाही नावाने एकेरी संबोधले नाही. शिव्यांचे तर नावही नाही. आपण माझ्याबाबत एकेरीवर आला आहात. मला न रुचणारी (लेका, सोंग इ) भाषा करीत आहात.
३) अजिंठा आणि वेरूळचं पान नीट (म्हणजे व्यवस्थित) वेगळं कसं करता येईल , हेही मी अन्य विकीबांधवाला विचारले, आपल्याला नाही. आपण का प्रत्येक गोष्ट स्वतःलाच विचारली जातेय असा समज करून घेता आहात. एकीकडे वाद सुरु असताना मी मदतीची अपेक्षा आपल्याकडून ठेवीत नाही (वाद आपण संपवलात तर पुढे पाहू)
४) आपण जी संपादने केलीत, इथे माझ्याआधी जी वर्षे घालवलीत, इतरांना जी मदत केलीत त्या सिनीऑरिटीचा असा दबावासारखा उल्लेख (करून पहा कळेल, कुठे होता इतकी वर्ष ) का करता? ही नव्या सदस्यांवरची प्रेशर टाकण्याची आपली पद्धत असा अर्थ त्यातून निघत नाही का? तुमचे कार्य गौरवास्पद असेल तर इतर सगळे निश्चित त्याचे कौतूक करतील, केलेही असेल.(कधीकाळी मला वाटलेच तर मीही त्यात सामील होईन)
५) माझे सोडा पण ज्या पद्धतीची भाषा आपण वापरली, जशी उत्तरे दिली ते एखाद्या नवख्या सदस्यासोबत घडले तर तो विकीपीडियावर राहील का. मग हेच पळवून लावणे इथे अपेक्षित आहे का असा प्रश्न माझ्यासारख्याला पडला तर ते चूक आहे का?
पुन्हा सांगतो, वादाची सुरवात आपल्याच इथल्या पहिल्या पोस्टमध्ये आहे.त्यामुळे वाद संपवणेही आपल्याच हातात आहे. वाद संपवण्यासाठी पुढाकार घेण्याची इच्छा असली तर ती लपवण्याचीही काही गरज नाही. संघर्षासाठी पुढाकार घेणे चुकीचे आहे. शांततेसाठी पुढाकार घेणे नेहमीच बरोबर असते.
अब मर्जी आपकी. - मनोज २२:००, १२ मार्च २०१० (UTC)
- श्रीमान, आपली चर्चेची पातळी घसरते आहे, पुढील मुद्द्यांचां शांतपणे विचार करावा, प्रत्युत्तराची घाई करू नये, इतकेच सुचवतो
- मान्य. रागाच्या भरात उत्तरे दिली की ती अशीच येतात.
- गोड नात्यात नातू हा एकेरीच असतो.
- आता हे तुम्ही प्रामाणिकपणे लिहिले असे समजून तुमचा गोडपणा मानून घेतो.
- अजिंठा आणि वेरूळचं पान नीट (म्हणजे व्यवस्थित) वेगळं कसं करता येईल , हेही मी अन्य विकीबांधवाला विचारले, आपल्याला नाही. आपण का प्रत्येक गोष्ट स्वतःलाच विचारली जातेय असा समज करून घेता आहात.
- मी काय लिहावे आणि काय लिहू नये हे तुम्ही ठरवू नका. मला वाटले उत्तर द्यावेसे तर मी देईन. वाचू नका फारतर. उत्तर फक्त तुम्हाला आहे हे तरी कशाला मानता? लिहिलेले कोणत्याही सदस्याला वाचता (किंवा दुर्लक्ष करता) येते.
- एकीकडे वाद सुरु असताना मी मदतीची अपेक्षा आपल्याकडून ठेवीत नाही
- कितीही वाद सुरू असला तरी मी मदत केली असता विकिपीडियाची गुणवत्ता वाढेल या हेतूने मी नोंदी करतो. कोणाच्या वैयक्तिक हेव्यादाव्यासाठी नाही. नोंदींमध्ये शक्य तितकी वस्तुनिष्ठता असावी यासाठी मी प्रयत्न करतो. तुम्ही बरोबर मुद्दा मांडलात तर त्याचे समर्थन करेन, चुकीचा मांडलात तर खोडून काढेन. पण हे करताना आगाऊपणा किंवा हमरीतुमरी येणार नाही ही काळजी नक्कीच घेऊन. तुम्ही (व इतरही सदस्य) असेच समजत असतील ही आशा आहे. तुमचे-माझे पटत नसले तरी तुम्हाला मदत करण्यास मी कमी करणार नाही.
- ही नव्या सदस्यांवरची प्रेशर टाकण्याची आपली पद्धत असा अर्थ त्यातून निघत नाही का
- असे नाही, कारण तुम्ही हा विषय काढेपर्यंत मी माझ्या कामाचा उल्लेख केलेला नव्हता.
- माझे सोडा पण ज्या पद्धतीची भाषा आपण वापरली...
- का हो? तुमचे का सोडा? आपण ज्या प्रकारचा ऍटिट्युड दाखवून ही चर्चा सुरू केलीत, ते एकदा वस्तुनिष्ठपणे पहा, मग कळेल की ही चर्चा कशी रसातळाला (degenerate) गेली.
- की तुमचा तो सोडा आणि आमचे ते पाणी? :-) <-- आता हा हसरा चेहरा दर्शवितो की मी गंमत करीत आहे....अरसिकेषु....:-D
- पुन्हा सांगतो, वादाची सुरवात आपल्याच इथल्या पहिल्या पोस्टमध्ये आहे.त्यामुळे वाद संपवणेही आपल्याच हातात आहे.
- तुम्ही सांगून काय होते हो. सुरुवात मी केली हे तुमचे मत आहे. माझे मत आहे तुम्ही आगाऊपणा केलात. पण ते माझे मत आहे. तुम्ही कितीही आक्रोश केलात तरी तुमचे हे म्हणणे मला अजिबात पटणार नाही, तरी वारंवार तुम्ही चुकलात, तुम्ही बंद करा असे म्हणून उपयोग नाही.
- वाद संपवण्यासाठी पुढाकार घेण्याची इच्छा असली तर ती लपवण्याचीही काही गरज नाही.
- वाद संपवण्याची माझी नेहमीच इच्छा असते, पण वाद संपवण्यासाठी ५-६ फटकार्यांपूर्वी घेतलेला मी पुढाकार तुम्ही धुडकावलात, त्याला बुलिइंग म्हणलेत, तर मग आता बोलायचे काय?
- संघर्षासाठी पुढाकार घेणे चुकीचे आहे. शांततेसाठी पुढाकार घेणे नेहमीच बरोबर असते.
- कधीकधी आगळीक करणार्याशी संघर्ष करण्यात पुढाकार घेणे हेच बरोबर असते. शांततेसाठी पुढाकार तुम्ही घ्या हे नेहमीच असते, मग तो विकिपीडिया असो किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण असो.
- आता पहा, एखादी गोष्ट दोन प्रकारे सांगता येते --
- १. तुमच्या लिहिण्यातून हे कोणत्या गाढवाने असे पान केले? भरीसभर ते मुखपृष्ट सदर करून मिरवलेही. असा सूर होता. तो खटकला. त्यातून मी तुम्हाला चारोळी मारली. तर ती तुम्हाला झोंबली असे वाटते. आता यावरुन तुमचा आग्रह असला की मीच वाद सुरू केला तर याउप्पर मला सबब नाही.
- २. हे पान अअअ आणि बबब असे दोन पानांत विभागता येईल का? कारण .... असेही सांगता आले असते आणि मी आनंदाने वर सांगितलेलाच उपाय सांगितला असता. पण असे असते तर आमचा मराठी बाणा कसा दिसला असता!?
- तुमचा शेवटचा शब्द घालण्याचा हठाग्रह दिसतो आहे. असा शब्द reconciliatory असला तरच तो शेवटचा शब्द ठरतो हे ध्यानात घ्या. भडकावणारी विधाने ही कधीच शेवटचा शब्द असू शकत नाहीत.
- अभय नातू २२:३७, १२ मार्च २०१० (UTC)
- ता.क. ...सांगता आले असते आणि मी आनंदाने वर सांगितलेलाच... -- आता यात मी म्हणजे कोणताही सदस्य असे म्हणायचे आहे. नाही तर म्हणाल तुम्ही कोण मोठे उत्तर देणारे? वस्तुतः गेले काही आठवडे मला येथे फारसे काही करण्यास वेळच नाही मिळालेला. काल/आज मिळाला म्हणून थोडेसे काम करुयात म्हणले तर हे प्रकरण उपटले. तुम्ही हेच २ आठवड्यांपूर्वी लिहिले असते तर माझे लक्षही गेले नसते व सगळ्यांचाच वेळ वाचला असता. अर्थात इतरांची करमणूक झाली ती झाली नसती, तरी इतर विकिपीडिया सदस्यहो, या तमाशाबद्दल प्रत्येकी चार आणे वसूल केले जातील, तयार ठेवा :-D
श्रीमान,
तुमच्या लिहिण्यातून हे कोणत्या गाढवाने असे पान केले? भरीसभर ते मुखपृष्ट सदर करून मिरवलेही. असा सूर होता.
- हा तुमचा अर्थ आहे, मी तसे म्हटलेले नाही. मला प्रामाणिक विकीपिडीयन्सविषयी काय वाटते ते वर दिलेले पुन्हा कोट करतो -प्राचीन काळी वर्णित ऋषिसमुहासमान मला बहुसंख्य विकी-कार्यकर्त्यांची मनःस्थिती भासते. .
हे पान अअअ आणि बबब असे दोन पानांत विभागता येईल का? कारण .... असेही सांगता आले असते
- मग पहिल्याच पोस्ट मध्ये काय लिहीलेय ते वाचा की राव, पुन्हा कोट करतो- सबब अजिंठा या नावे वेगळे पान आणि वेरुळ यानावे वेगळे पान तयार करून इथला संबंधित मजकूर त्या त्या पानावर स्थलांतरित करावा. याचा अर्थ काय होतो?
पाच नंबरचा मुद्दा आपल्याला नीट कळेल असा लिहीतो
५) ज्या पद्धतीची भाषा आपण वापरली, जशी उत्तरे दिली ते एखाद्या नवख्या सदस्यासोबत घडले तर तो विकीपीडियावर राहील का? माझे सोडा, मी तुमच्या किंवा कोणाच्याच असल्या बुलिइंगला, वर्चस्व अबाधित राखण्यासाठी एकेरी पर्यंत घसरण्याच्या प्रयत्नांना जुमानत नाही.
स्पष्ट बोलतो माफ करा, पण माझ्याहातून काहीतरी वेडवाकडे लिहीले जावे आणि कारवाईला पुरावा मिळावा यासाठीच तर हे सुरु आहे, अशी मला दाट शंका आहे. काय होईल, फारतर या ना त्या निमित्ताने कुणीतरी बंदी घालेल. त्यात नुकसान कुणाचे आहे? माझ्यासारख्याचे नाही, इथल्या अधिकारीवर्गाचेही नाही. झालेच तर विकिपीडिया सुरु करण्यामागच्या उदात्त हेतूचे आहे. होऊ देत. पण नवख्यांना पळवून लावणेच इथे अपेक्षित आहे का?
तुम्ही केलेल्या पानात एक त्रुटी काय दाखवली, केवढा भडका. मी मांडला तो मुद्दा ज्ञानाशी संबंधित, विश्वकोषाला साजेलशी पाने तयार व्हावीत यासाठीचा आहे. माझा हठाग्रह शेवटच्या शब्दाविषयी नाही तर विकीपिडीयातले वेरूळ - अजिंठा लेणी हे एकत्र पान मला वाटते दुरुस्त करण्याची गरज आहे त्याविषयी आहे. त्याविषयी, मीच अन्य विकीकराला पु्न्हा विचारेपर्यंत एक चकार शब्द तरी लिहीलात का? सुरवातीला एकदा विचारलत आपण हा लेख नीट वाचलात का? असा काय कहर वाटला? यातला पहिला प्रश्न लेख न वाचताच मी लिहीतोय अशी शंका घेणारा आणि दुसरा एका शब्दाला चिकटून राहिलेला प्रतिप्रश्न होता. पण मुळात असं एकत्र पान योग्य नाही हे मी का म्हणतोय याविषयी या लांबचलांब चर्चेत कधी उत्सुकता दाखवलीत? आपण करतो त्या कामावर कुणीच शंका घेऊ नये यासाठी ही सगळी व्यूहरचना आहे का? आणि वर अधिकारीपदाचा, अनुभवाचा दबाव. व्वा ! - मनोज ०९:५२, १३ मार्च २०१० (UTC)