चरणजीत सिंह चन्नी
चरंजीत सिंह छन्नी (पंजाबी: ਚਰਨਜੀਤ ਸਿੰਘ ਚੰਨੀ; जन्म: १२ मार्च १९६३)[१] हे एक भारतीय राजनेते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य व पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत.[२] सप्टेंबर २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान ते मुख्यमंत्रीपदावर होते. २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणूकीमध्ये चरणजीत सिंह छन्नी व नवज्योतसिंग सिद्धू ह्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. १५ वर्षे विधानसभा सदस्य राहिल्यानंतर छन्नी देखील चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघामधून पराभूत झाले.
चरणजीत सिंह छन्नी | |
कार्यकाळ २० सप्टेंबर २०२१ – १६ मार्च २०२२ | |
मागील | अमरिंदर सिंह |
---|---|
पुढील | भगवंत मान |
पंजाब विधानसभा सदस्य
| |
कार्यकाळ ३० जानेवारी २००७ – १६ मार्च २०२२ | |
मतदारसंघ | चमकौर साहिब |
जन्म | १२ मार्च, १९६३ रूपनगर जिल्हा, पंजाब |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
ते ह्यापूर्वी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या मंत्रिमंडळात तंत्रशिक्षण प्रशिक्षण मंत्री होते व पंजाबमधील विधान सभेत विरोधी पक्ष नेते होते.[३]
सुरुवातीचे वयक्तिक आणि शैक्षणिक जीवन
संपादनछन्नी यांचा जन्म पंजाब मधील मक्राऊना कालन येथे झाला. [४]त्यांनी कायद्याची पदवी पंजाब विद्यापीठ मधून घेतली आणि एम.बी.ए. हे पी.टी.यू. जालंधर मधून केले.[५]ते दलित रामदासिया सिख समाजाचे होते.[६] [७][८][९][१०]सध्या ते पंजाब मधील चंडीगढ विद्यापीठाअंतर्गत पी. एच. डी. करत आहे. त्यांचा अभ्यास विषय हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा आहे त्यांचे मार्गदर्शक प्रो. इमॅन्युएल नाहर हे आहे. [११]आणि त्यांचे लग्न हे करंजित कौर सोबत झाले असून त्यांना दोन मुलं आहे.[१२]
संदर्भ
संपादन- ^ "Ministers". punjabassembly.nic.in. 2021-10-08 रोजी पाहिले.
- ^ "द टाइम्स ऑफ इंडिया". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2021-10-01.
- ^ "द टाइम्स ऑफ इंडिया". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2021-10-01.
- ^ "द टाइम्स ऑफ इंडिया". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2021-10-01.
- ^ "द टाइम्स ऑफ इंडिया". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2021-10-01.
- ^ "Charanjit Singh Channi is Punjab's first Dalit CM". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-09-20. 2021-10-08 रोजी पाहिले.
- ^ "Punjab gets its first Dalit CM in Charanjit Singh Channi". www.telegraphindia.com. 2021-10-08 रोजी पाहिले.
- ^ "PM's Message To Charanjit Channi, Punjab's First Dalit Sikh Chief Minister". NDTV.com. 2021-10-08 रोजी पाहिले.
- ^ Hans, Raj Kumar. Making Sense of Dalit Sikh History. Duke University Press. pp. 131–151.
- ^ Hans, Raj Kumar. Making Sense of Dalit Sikh History. Duke University Press. pp. 131–151.
- ^ Kaur Channi, Harpreet; Singh, Manjeet; Singh Brar, Yadwinder; Dhingra, Arvind; Gupta, Surbhi; Singh, Harpuneet; Kumar, Raman; Kaur, Swapandeep (2021-05). "Agricultural waste assessment for the optimal power generation in the Ludhiana district, Punjab, India". Materials Today: Proceedings. doi:10.1016/j.matpr.2021.04.481. ISSN 2214-7853.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Kaur Channi, Harpreet; Singh, Manjeet; Singh Brar, Yadwinder; Dhingra, Arvind; Gupta, Surbhi; Singh, Harpuneet; Kumar, Raman; Kaur, Swapandeep (2021-05). "Agricultural waste assessment for the optimal power generation in the Ludhiana district, Punjab, India". Materials Today: Proceedings. doi:10.1016/j.matpr.2021.04.481. ISSN 2214-7853.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)