घुमुसरी हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः ओरिसामधील गंजम जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि कंधमाल जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या फुलबनी प्रांतात आढळतो.[] या गोवंशाला बोली भाषेत घुमसरी, गुमसूर तथा देशी गोवंश म्हणून सुद्धा ओळखले जाते.

घुमुसरी गाय
स्थिती पाळीव
मूळ देश भारत
आढळस्थान गंजम जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि फुलबनी शहर
मानक agris IS
उपयोग मशागतीचा गोवंश
वैशिष्ट्य
वजन
  • बैल:
    २०८.५ किलो (४६० पौंड)
  • गाय:
    १६६.८ किलो (३७० पौंड)
उंची
  • बैल:
    १३६.१४ सेंमी
  • गाय:
    १२६.२७ सेंमी
आयुर्मान १८ ते २० वर्षे
डोके मध्यम ते छोटे निमुळते, चपटे कपाळ
पाय छोटे आणि काटक
शेपटी मध्यम, पातळ आणि काळा शेपूट गोंडा
तळटिपा
बहुतेक वेळा दुधदुभत्यासाठी सुद्धा यांचा वापर होतो

शारीरिक रचना

संपादन

हा गोवंश अंगाने लहान, काटक आणि शिडशिडीत असून बहुतेक वेळा हा पांढऱ्या रंगात आढळतो. कधीकधी हा हलका राखाडी किंवा पांढरा आणि राखाडी अशा मिश्र छटेत असतो. या गोवंशाचे डोके लहान असून कपाळ मोठे आणि सपाट असते, तसेच कपाळावर छोटी खाच असते. या गोवंशाचे डोळे मध्यम काळे असून, डोळ्याच्या वरती दोन माफक, छोटे आणि काळी शिंगे असतात. शिंग पाठीमागे थोडेसे बाहेर जाऊन टोकाशी आत वळलेले असते. काही जनावरांत शिंग सरळही असू शकते. डोक्याच्या बाजूला मध्यम छोटे, आडवे टोकदार आणि तीक्ष्ण कान असतात. गळकंबळ लहान आणि पांढरे असते.[]

गायींच्या पाठीवर लहान तर बैलाच्या पाठीवर मध्यम आकाराचे वशिंड असते. पाय लहान आणि काटक असून खूर काळे असतात. या गोवंशाची शेपटी मध्यम-लहान आणि पातळ असून शेवटी काळा शेपुटगोंडा असतो.[]

वैशिष्ट्य

संपादन

ओरिसातील इतर गोवंशाच्या तुलनेत हा कष्टकरी गोवंश असून याची फारशी देखभाल करावी लागत नाही. याच्या ग़ाईची थोडी जास्त काळजी घेतल्यास ४ ते ६ लिटर दूध सहज मिळते.[] राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB) निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो[]

भारतीय गायीच्या इतर विविध जाती

संपादन

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या इतर विविध जाती

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Bajpai, Diti. "ये हैं भारत की देसी गाय की नस्लें, जिनके बारे में आप शायद ही जानते होंगे" (हिंदी भाषेत). 2020-11-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b c "GHUMUSARI" (इंग्रजी भाषेत). २५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). २५ मार्च २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन