गणेश हरि पाटील

(ग.ह. पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)

प्राचार्य गणेश हरि पाटील (जन्म : १९ ऑगस्ट १९०६; मृत्यू : १ जुलै, १९८९) हे एक मराठी कवी आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांच्या अनेक कविता मराठी शालेय पाठ्यपुस्तकांत असत.

ग.ह. पाटील हे बालसाहित्यिक होते. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी ’बालशारदा’ या ग्रंथाचे संपादन केले. त्या ग्रंथाला त्यांनी अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावनाही लिहिली होती. पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य असलेले पाटील, त्या कॉलेजमध्ये अध्यापन करताना सतत प्रयत्‍नशील आणि प्रयोगशील असत. लेखकांनी मुलांना सकस आणि आणि परिपूर्ण साहित्य यासाठी ग.ह. पाटील यांनी महिनाभराचे शिबिर त्यांनी १९६० मध्ये आयोजित केले होते. या शिबिरासाठी महाराष्ट्रभरातून होतकरू लेखक निवडले होते. शिबिराचा लाभ घेतलेले लेखक मुलांच्या क्षेत्रांत पुढे नावारूपाला आले. .

ग.ह. पाटील यांच्या कवितांचा संग्रह ’गस्तवाल्यांची गीते आणि निवडक कविता’ या पुस्तकाद्वारा प्रकाशित झाला आहे. पुस्तकाचे संपादन त्यांच्या कन्या डॉ. मंदा खांडगे यांनी केले आहे. पुस्तकाला शांता शेळके यांची प्रस्तावना आहे. ग.ह. पाटलांचा ’लिंबोळ्या’ या नावाचा एक कवितासंग्रह आहे, त्यात त्यांच्या बालकवितांशिवायच्या अनेक कविता आहेत.

ग.ह. पाटील यांच्या प्रसिद्ध आणि मुलांच्या आवडत्या कविता

संपादन
  • अबलख वारूवरी बैसुनी येती हे पाटिल । भरजरी । शिरीं खुले मंदिल
  • डरांव डरांव, डरांव डरांव... का ओरडता उगाच राव?"
  • देवा तुझे किती सुंदर आकाश
  • पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती
  • फुलपाखरू छान किती दिसते
  • माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिलाऱ्या बैलाची जोडी हो

ग.ह.पाटील यांची पुस्तके

संपादन
  • गस्तवाल्यांची गीते आणि निवडक कविता (संकलन, संपादिका मंदा खांडगे)
  • पाखरांची शाळा (बाल कवितासंग्रह)
  • बालशारदा (गद्य)
  • लिंबोळ्या (काव्यसंग्रह)

पुरस्कार

संपादन

पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालसाहित्यासाठी ग.ह. पाटील यांच्या नावाचा पुरस्कार ठेवला आहे. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेले कवी :-

विशेष

संपादन

कै. ग.ह. पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त .’प्रतिमा प्रकाशना’ने बालशिक्षण : बालसाहित्य : विविध आयाम या नावाचा ग.ह. पाटील गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. डॉ.लीला दीक्षित आणि ग.ह.पाटील यांच्या कन्या डॉ.मंदा खांडगे यांनी त्या ग्रंथाचे संपादन केले आहे. या ग्रंथात अठरा नामवंत लेखक, अभ्यासक व बालशिक्षण-तज्‍ज्ञांचे विविध अंगांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण लेख आहेत. या ग्रंथाला महाराष्ट्र सरकारचा आणि बालकुमार साहित्य संमेलनाचा पुरस्कार मिळाला आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

ग.ह. पाटील यांची आठवणीतील गाणी