ग्रेट ईस्टर्न हॉटेल (कोलकाता)

द ग्रेट ईस्टर्न हॉटेल तथा ललित ग्रेट ईस्टर्न हॉटेल हे भारताच्या कोलकाता (पूर्वीचे कलकत्ता) शहरातील जुने होटेल आहे.

द ज्वेल ऑफ द ईस्ट असे ओळखले जाणारे हे होटेल ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकालात महत्त्वाचे होते असा याचा परिचय होता. या शहराला भेट देणाऱ्या मान्यवर व्यक्ति अनेक वेळा या ग्रेट ईस्टर्न हॉटेलला भेट असत. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या हॉटेलचे महत्त्व कमी झाले आणि नंतर पश्चिम बंगालमधील नक्षलवादी आंदोलनादरम्यान याची अधोगती झाली. त्यानंतर याचे व्यवस्थापन राज्य सरकारने आपल्याकडे घेतले. २००५ मध्ये हे हॉटेल एका खाजगी कंपनीला विकले त्यानंतर २०१३ मध्ये ते नवीन रूपात पुन्हा सुरू झाले.[]

इतिहास

संपादन

ब्रिटिशांनी आधुनिक पद्धतीची हॉटेल भारतात आणली. सर्वात जुने हॉटेल म्हणजे स्पानीस हॉटेल की जे जनतेसाठी सन १८३० मध्ये एशिया खंडात सुरू झाले. हे साधारण १६५ वर्षे कायम चालू आहे. द ग्रेट ईस्टर्न हॉटेलचे उद्घाटन सन १८४० किंवा १८४१ मध्ये डेविड विल्सन यांनी ऑकलंडचे हॉटेल या स्वरूपात चालू केले. नंतर डेविड विल्सन यांचे नाव जॉर्ज इडण झाले. ते पहिले ऑकलंडचे सरदार होते त्यानंतर ते भारताचे गव्हर्नर जनरल झाले. या हॉटेलची सुरुवात करण्यापूर्वी त्यांचे याच जागेवर पाव विकण्याचे दुकान होते. हे हॉटेल १०० खोल्या आणि तळमजल्यावर एक डिपार्टमेंटल स्टोअर उघडून चालू केले. त्यानी १८६० मध्ये या हॉटेलचा विस्तार केला आणि त्याचे नाव ग्रेट ईस्टर्न हॉटेल वाइन आणि जनरल परवेईंग कंपनी ठेवले.[] सन १८५९ मध्ये संचालक मंडळात एका भारतीय संचालकाचा समावेश केला. सन १९१५ मध्ये हे हॉटेल ग्रेट ईस्टर्न हॉटेल म्हणून ओळखले जाऊ लागले. सन १८८३ मध्ये या हॉटेल मध्ये विध्युतीकरण झाले आणि भारत देशातील विध्युतीकरण झालेले ते पहिले हॉटेल ठरले. पुढील काळात त्यात बरेच बदल होत गेले. सन २००५ मध्ये ते द ललित हॉटेल, पॅलेस अँड रेसॉर्ट म्हणून प्रसिद्ध झाले.[]

सुधारणा (पुंनर्जीवन)

संपादन

हे हॉटेल सुधारणा करण्यासाठी बरीच म्हणजे सात वर्षे बंध होते. १९ नोवेंबर २०१३ रोजी ललित ग्रेट ईस्टर्न म्हणून यातील कांही विभाग चालू केला.[] या इमारतीचा आराखडा कायदेशीर नोंदनिकृत केला आणि या इमारतीत होणाऱ्या सुधारणा म्हणजे दर्शनी भाग शोभिवंत व्हावा शिवाय भव्य असा जिना असावा हे करण्याची आशा धरली. या हॉटेलचे तीन विभाग केले. हेरिटेज I, हेरिटेज II आणि न्यू ब्लॉक.

ठिकाण

संपादन

हे जुन्या कोर्ट हाऊस मार्गावर आहे. येथून असेम्ब्ली साधारण ३ किमीआहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ साधारण १७ किमीआहे. हावडा रेल्वे स्थानक ४ किमीआहे.

सर्व खोल्या सर्व सोईनी युक्त आरामदाई आहेत. त्यात कॉफी मेकर, मिनरल वॉटर, दैनिक, साप्ताहिक, विध्युतीकरण केलेली सेफ, मिनी बार, मेज, टेबल लॅम्प, आहेत. डिलक्स खोलीतून शहराचे दर्शन बसल्या जागेवरून आरामात घेता येते.[]

सुविधा

संपादन

येथे ५०० लोकांची सोय होऊ शकेल असे सभा, लग्न कार्य, यासाठी बॉलरूम आहे. शिवाय विडियो कोन्फ्रंसिंग, प्रोजेक्टर, सेक्रेटरियल सेवा, प्रदूषण संशोधन व्यवस्था, प्रेक्षणीय स्थळ दर्शन, सहल व्यवस्था, विमान रेल्वे टीकेट बुकिंग, आणि हमाल व्यवस्था या सुविधा आहेत.[]

संध्याकाळी उच्च प्रतीचा चहा आणि कॉकटेल, २४ तास डिंनर, बेकरी फूड, पब मध्ये मदिरा, फिंगर फूड, स्पा सुविधा, प्रत्येक व्यक्तिला रोज रात्री एक लिटरची पाण्याची बाटली, एलसीडी, मुलांचे साठी पूल, वाहन तळ, धोबी, चलन बदल, इस्त्री, इ. सुविधा आहेत.

संदर्भ

संपादन
  1. ^ "एक युगाचा अंत: ग्रेट इस्टर्न चा व्यवस्थापन बदल".
  2. ^ "ग्रेट इस्टर्न हॉटेलचा इतिहास".
  3. ^ "ग्रेट इस्टर्न हॉटेल पुन्हा लॉंच साठी सज्ज".
  4. ^ "औपचारिक नवीन ग्रेट इस्टर्न यावर्षीच्या अखेरीस लॉंच साठी सज्ज".
  5. ^ "द ललित ग्रेट इस्टर्न कोलकाता हॉटेल ची वैशिष्ट्ये".
  6. ^ "ग्रेट इस्टर्न हॉटेल ची सुविधांची यादी".[permanent dead link]