ग्रहण परिकल्पना - ग्रहलाघवम्

ग्रहलाघवम् हा एक भारतीय ज्योतिष शास्त्रातील प्राचीन ग्रंथ असून यावरील टीका (भाषांतर) आणि विश्लेषण असलेले अनेक ग्रंथ निघालेले आहेत. सदरील ग्रंथात सूर्यग्रहण तथा चंद्रग्रहणासंबंधित विस्तृत माहिती दिली आहे. ग्रहण म्हणजे सूर्य किंवा चंद्र यांचे बिंब झाकले जाऊन ते आपल्याला दिसत नाहीत. खंडग्रास ग्रहणात बिंबाचा काही भाग छायाग्रस्त होतो व तोच भाग दिसत नाही. म्हणून अशा परिस्थितीला रवि किंवा चंद्राचे ग्रहण असे म्हणले आहे.


छादयत्यर्कमिन्दुर्विंधु भूमिभा छादकच्छाधमानैक्यखण्डं कुरू ।
तच्छरोनं भवेच्छन्नमेतधदा ग्राहम्होनावशिष्टं तु खच्छन्नकम् ।।


पौर्णिमा तिथीच्या अंति चंद्रग्रहण होते. पृथ्वी ही रवि व चंद्र यांच्या मध्ये येते व तिच्या छायामध्ये चंद्र पूर्वेकडुन प्रवेश करतो. त्यावेळी जेवढा भाग छाया ग्रस्त असतो तेवढया भागाला ग्रहण लागतो. हेच कारण आहे चंद्र जेवढा झाकला जातो तेवढेच ग्रहण होते. चंद्रग्रहणात छादक पृथ्वी व छाद्रय चंद्र असतो. येथे पृथ्वीची छाया चंद्राला आच्छादित करते. झाकणारा ग्रह = छादक व झाकला जाणारा ग्रह = छादय असतो. ग्रहणमोक्ष पश्चिमेकडुन होते. सूर्यग्रहण हे अमावस्या तिथी अंति संभव असते. जेव्हा पृथ्वी व रवि यांच्यामध्ये चंद्र पश्चिमेकडुन सूर्यबिंबास झाकण्यास सुरुवात करतो. चंद्रग्रहणात पृथ्वीची छाया चंद्रबिंबाचा जेवढा भाग आच्छदित करते तेवढया भागाला ग्रहण असते. पण सूर्यग्रहण तसे नसते. सूर्यग्रहणात स्थान भेदानुसार ग्रहण दृष्टिगोचर होते. कारण सूर्यग्रहणात वस्तुतः सूर्य आच्छादित होत नाही तर पाहणार द्रष्टा व सूर्याच्या मध्ये चंद्र अवरोधक असतो. चंद्र आपल्या दृष्टिपथाला जितका अवरोधन करतो तेवढाच सूर्यग्रहण दृष्टि गोचर होते. चंद्रबिंब लघु आहे. सूर्यबिंब बृहत आहे म्हणून जर द्रव्य सूर्य व चंद्राच्या केंद्रगत सूत्रात स्थित होऊन सूर्याला पहातो, तर सूर्याचे वलय/कंगण ग्रहण व्यास दिसते, कारण केंद्रगत असल्याने चंद्रबिंब सूर्याच्या मध्याबिंबात स्थित असेल शिवाय चंद्रबिंबाच्या चारी दिशांना सूर्याचा प्रकाश जो झाकला गेलेला नाही तो पसरतेत व मधोमध चंद्रबिंब असल्याने तो भाग कृष्ण वर्ण दिसेल. व तो वलय आकारात असेल काही स्थान/ठिकाण असेही असतील तेथे सूर्यग्रहण दृष्ट होणार नाही. म्हणून सूर्य ग्रहणात अक्षांश, देशांतर वरून दृश्यदृश्यचा निर्णय केला जातो. येथे चंद्र छादक व रवि छादय आहे ग्रहण मोक्ष पूर्वेकडून होतो. छाया व छादक भेदामुळे सूर्य व चंद्रग्रहण परिस्थितीत पुरक पडतो.<


ग्रहण संभव आहे किंवा नाही ते आधी पहावे लागते. त्यासाठी खालील गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.

  1. पर्वान्त कालिक सूर्यातून पर्वान्त कालिक राहु वजा करून जी बाकी असते तिचा भूज बनवून तो जर १४ ने कमी असेल तरच ग्रहण संभव असते, अन्यथा नाही.
  2. मानैक्यार्ध खंडापेक्षा शर नेहमी कमी असावा तर ग्रहण होईल.
  3. एक अंगुलापेक्षा अल्प ग्रासमान असेल तर सूर्य व चंद्रग्रहण होत नाही.

वरील नियमांनुसार ग्रहण संभव होते का पाहावे, असेल तर चंद्रग्रहणात खालील गोष्टींच्या संस्कार करून चंद्रग्रहाणाचा ग्रासमान, स्पर्श, मोक्ष काळ, संम्मीलन काळ, उन्मीलन काळ, स्पर्श दिशा, मोक्ष दिशा इत्यादिचे ज्ञान प्राप्त होते ते कसे ते पाहुया.

चंद्रग्रहणासाठीः –

सर्वप्रथम पर्वान्तकालिक ग्रह स्पष्ट करावे लागतात, मुख्यतः रवि, चंद्र, सूर्याची गति, चंद्राची गति पौर्णिमा तिथीच्या भोग्य घटी.

सूर्यग्रहणासाठीः –

अमावस्या तिथीच्या भोग्य घटी व पर्वान्तकालिक स्पष्ट लग्न बाकी वरील प्रमाणे (चंद्रग्रहणाप्रमाणे).

पर्वान्तकालिक स्पष्ट ग्रह करण्यासाठी ग्रहांच्या दैनिक गतिना भोग्य काकाने (पौर्णिमांत/अमावस्यांत) गुणावे व ६० हयिनी भागावे प्राप्त गति उदयकालीक ग्रहात मिळवणे राहुसाठी वजा करणे.

अश्याप्रकारे चंद्र व सूर्य ग्रहाणाचा विचार करावा.


संदर्भ

संपादन