गौतमी (अभिनेत्री)
गौतमी ताडीमल्ला उर्फ गौतमी ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री असून तिने तेलुगू, कन्नड, तामिळ, मल्याळम आणि हिंदी चित्रपटात काम केले.
गौतमी ताडीमल्ला | |
---|---|
गौतमी | |
जन्म |
गौतमी ताडीमल्ला २ जुलै, १९६८ श्रीकाकुलम, आंध्रप्रदेश |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | • चित्रपट कलाकार, • दूरदर्शन कलाकार, • समाज सेवा |
कारकीर्दीचा काळ | १९८७ -१९९८ |
भाषा | तेलुगू |
पती | • • कमल हासन २००५ ते २०१६ |
अपत्ये | सुब्बुलक्ष्मी |
अधिकृत संकेतस्थळ |
gautamitadimalla |
धर्म | हिंदू |
विशाखापट्टणम येथे GITAM अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना इ.स. १९८७ साली दयामायूडू तेलुगू चित्रपटात काम करून तिने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीस सुरुवात केली[१]. ४ जून १९९८ मध्ये चेन्नई येथे गौतमी आणि संदीप भाटिया विवाहबद्ध झाले आणि पुढील वर्षी १९९९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना सुब्बुलक्ष्मी नावाची मुलगी सुद्धा झाली.
कालांतराने इ.स. २००५ ते २०१६ पर्यंत गौतमी आणि कमल हासन लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले.[२]
संदर्भ
संपादन- ^ "Gauthami". २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ Bhattacharya, Ananya (1 November 2016). "Kamal Haasan and Gautami part ways after living together for 13 years". इंडिया टुडे. 2 November 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.