गौड सारस्वत ब्राह्मण
गौड सारस्वत ब्राह्मण ही दक्षिण भारतातील सारस्वत ब्राह्मणांतील एक पोटजात आहे. (ही महाराष्ट्राबाहेर कधीकधी गौड, गौडर, गौडा इत्यादी नावांनी दर्शविली जाते) (कोकणी: गौड सारस्वत, कन्नड: ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ, मल्याळम: ഗൌഡ സാരസ്വത) ही हिंदू धर्मातल्या ब्राह्मण जातीतील ६ पोटजातींपैकी एक पोटजात आहे. महाराष्ट्रीयन ब्राह्मण जातीतील इतर ५ पोटजाती देशस्थ, चित्पावन, कऱ्हाडे, दैवज्ञ व देवरुखे ह्या आहेत.[ संदर्भ हवा ]
गौड सारस्वत जातीतील ब्राह्मण कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळ किनारपट्टी लगतच्या प्रदेशात आढळून येतात. भाषकदृष्ट्या सारस्वत ब्राह्मणांमध्ये मराठी व कोकणी भाषक असे दोन गट आहेत. गौड सारस्वत ब्राह्मणांत कुडाळदेशकर गौड ब्राह्मण, कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण, नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण अशा अनेक पोटपोटजाती आहेत. गौड सारस्वत ब्राह्मण हे मूळचे ऋग्वेदी ब्राह्मण आहेत.[ संदर्भ हवा ]
सारस्वत ब्राह्मणांतही मेंगलोरी सारस्वत; आणि त्यांच्यातही त्यांच्या त्यांच्या मठाप्रमाणे बरेच भेद आहेत.[ संदर्भ हवा ]
जनजीवन
संपादनमुंबईत राहणारे गौड सारस्वत ब्राह्मण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेले आहेत. श्रावणात ह्यांचे अनेक उत्सव साजरे केले जातात. मुंबईत वाळकेश्वरला असलेल्या बाणगंगा तलावावर आश्विन नवरात्रीत पालखी आणि दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो. ह्या समाजातील स्रिया सिल्क साड्या, परकर पोलके नेसून येथे येतात.सरस्वती नदीच्या काठी वसलेला हा समाज गोवा राज्यात काही काळ स्थिरावला होता परंतु पोर्तुगीज लोकांचा अन्याय आणि अत्याचार सहन न झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थायिक झाला. अठराव्या शतकात ते मुंबईत आले आणि येथेच कायम रहिवासी झाले. मुख्यतः वाळकेश्वर,गिरगाव, दादर, माहीम भागात ह्यांची वस्ती आढळते. हे शैव आणि वैष्णव अश्या दोन्ही पंथावर विश्वास ठेवत असल्याने ह्यांचे दोन्ही पंथाचे मठ आहेत.हे व्यवहारात मराठी बोलतात.घरात ते गोड कोकणी बोलतात. बाणगंगा येथे सन १७१५ मध्ये सावंतवाडीहून आलेल्या रामा कामतांनी घाट बांधला आहे. गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट कडे सन १८७९ पासून बाणगंगा तलाव आणि परिसराची मालकी आहे. ह्याच परिसरात वाळुकेश्वर मंदिर, फोंड्याच्या कैवल्य मठाची शैव शाखा,आणि काशीच्या वैष्णव मठाची शाखा आहेत.
चालीरीती
संपादनसारस्वत समाजात पाहुणचार फार केला जातो.अभ्यागताला जेवणाशिवाय किंवा रिकाम्या हाती कधीच पाठविले जात नाही. महिला हिरे आणि पोवळ्यांचे दागिने सर्रास वापरतात.पुरुष धोतर आणि पांढरी टोपी अथवा पगडी पारंपरिक पोशाखात देवकार्य करतात. जेवणात खोबरे हमखास वापरले जाते. नारळाच्या दुधाच्या शेवया हा गोड पदार्थ आवर्जून केला जातो. घावणे, आंबोळी हे शाकाहारी पदार्थ नियमित खाल्ले जातात. मांसाहार करणारे पापलेट, शिंपल्या,कालवं, बांगडे आवडीने खातात.
संदर्भ
संपादन१ मुंबई टाईम्स ०६०३२०२०.