गॉस्पेल

(गोस्पेल या पानावरून पुनर्निर्देशित)

गॉस्पेल शब्दाचा मूळ अर्थ आहे ख्रिस्ती संदेश. याला मराठीत सुवार्ता किंवा शुभवर्तमान असे म्हणतात. परंतु दुस-या शतकात तो संदेश ज्या पुस्तकांमध्ये मांडण्यात आला होता त्यांच्यासाठीही हा शब्द वापरला जाऊ लागला. या अर्थाने गॉस्पेलची व्याख्या येशूच्या शब्दांची आणि कृतींची कथा म्हणून केली जाऊ शकते, ज्यामधे येशूचे शिक्षण, जीवन, मरण (जगासाठी केलेले बलिदान) आणि पुनरुत्थान याचा समावेश होतो.

व्युत्पत्ती

संपादन

गॉस्पेल (/ˈɡɒspəl/) हा इंग्रजी शब्द कोईन ग्रीक भाषेतील εὐαγγέλιον (euangélion) या शब्दाचे भाषांतर आहे , त्याचा अर्थ "चांगली बातमी" असा होतो. (εὖ "चांगले" + ἄγγελος ángelos "बातमी देणारा". [] जुन्या इंग्रजीमधे gōdspel असे भाषांतर होत असे,(gōd "good" चांगले + spel "news" बातमी). येशूच्या जीवनाचे आणि शिकवणीचे लिखित अहवाल सामान्यतः गॉस्पेल म्हणून ओळखले जातात. [] नवीन करारच्या पहिल्या चार पुस्तकांना गॉस्पेल्स ( शुभवर्तमाने ) असे म्हणतात. ती चार पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत
१. मत्तयकृत शुभवर्तमान
२. मार्ककृत शुभवर्तमान
३. लूककृत शुभवर्तमान
४. योहानकृत शुभवर्तमान . []

  1. ^ Woodhead 2004, पान. 4.
  2. ^ https://en.wikipedia.org/wiki/The_Gospel
  3. ^ पवित्र शास्त्र शब्दकोश, प्रा. वि.ना. गोठोस्कर, जीवन वचन प्रकाशन, 2002