गोविंदराव कुलकर्णी (जन्म : कोल्हापूर, इ.स. १९२९; मृत्यू : कोल्हापूर, ११ डिसेंबर २०१४) हे एक मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांच्या पत्‍नीचे नाव विजया. डॉ. चारुहास भागवत व इंजिनिअर उमेश भागवत ही त्यांची मुले.

गोविंद कुलकर्णी यांचे मूळ नाव शरदचंद्र लक्ष्मण भागवत. लहानपणापासूनच त्यांना सिनेमाविषयी ओढ होती. कुटुंबीयांचा सिनेमात काम करण्यास विरोध असल्याने आणि वडिलांनी सिनेमासाठी मूळ नाव लावायचे नाही, अशी ताकीद दिल्याने त्यांनी गोविंद कुलकर्णी हे नाव घेतले. त्याच नावाने दिग्दर्शक, निर्माता म्हणून नाव कमवले. गोविंदराव कुलकर्णी यांनी व्ही. शांताराम यांच्या पिंजरा चित्रपटात एक छोटीशी भूमिकाही केली होती.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे ते काही काळ संचालक होते.

कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेले दादा कोंडके यांचे सिनेमे विशेष गाजले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत वीस सिनेमांचे दिग्दर्शन व सहा सिनेमांचे निर्माते-दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.

गोविंदराव कुलकर्णी यांचे चित्रपट

संपादन
  • अंगार (दिग्दर्शन)
  • अशी रंगली रात्र (दिग्दर्शन, निर्मिती)
  • एकटा जीव सदाशिव (१९७२, दिग्दर्शन, निर्मिती)
  • गोविंदा आला रे आला (दिग्दर्शन)
  • चुडा तुझा सावित्रीचा (दिग्दर्शन)
  • जय तुळजा भवानी (दिग्दर्शन)
  • झाकली मूठ सवा लाखाची (दिग्दर्शन)
  • दैवत (दिग्दर्शन)
  • पिंजरा (१९७२, अभिनय)
  • बन्या बापू (दिग्दर्शन)
  • मर्दानी (१९८३, दिग्दर्शन, निर्मिती)
  • मानाचं कुंकू (१९८१, दिग्दर्शन, निर्मिती)
  • मुरळी मल्हारी रायाची (दिग्दर्शन)
  • लागेबांधे (दिग्दर्शन)
  • शपथ तुला बाळाची (दिग्दर्शन)
  • सोंगाड्या (१९७०, दिग्दर्शन, निर्मिती)
  • हऱ्या नाऱ्या झिंदाबाद (दिग्दर्शन, निर्मिती)

पुरस्कार

संपादन
  • चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार

.