गोवालिया टँक
गोवालिया टँक हा मुंबईतील मलबार हिल व कंबाला हिल ह्या टेकड्यांच्या पायथ्याशी असलेला भाग आहे. एकोणिसाव्या शतकात मुंबईत अनेक पाण्याची तळी होती. सी पी टँक,नर्दुल्ला टँक, गोवालिया टँक, वगैरे नावाने ती ओळखली जात असत.हे तलाव श्रीमंत लोकांनी पुण्यकर्म म्हणून बांधलेले असत.गरीब लोक इथून पिण्यासाठी पाणी घेऊन जात असत.हल्ली ह्या तलावांपैकी बाणगंगा तलाव अस्तित्वात आहे. मलबार हिल व खंबाला हिल टेकड्यांवर पडलेला पाऊस खाली उतरून गोवालिया टँक मध्ये जमा व्हायचा.येथे गवळी लोक आपली गुरेढोरे घेऊन यायचे व गुरांना पाणी पाजायचे तसेच गुरांच्या आंघोळी करायचे. तलावावर येणाऱ्या गवळ्यांमुळे ह्या तलावाला गोवालिया टँक हे नाव पडले.[१]
- ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार दिनांक ०२ जानेवारी २०२५