गोपालचंद्र मुखोपाध्याय

(गोपाल पाठा या पानावरून पुनर्निर्देशित)
Gopal Chandra Mukhopadhyay (sl); গোপালচন্দ্র মুখোপাধ্যায় (bn); Gopal Chandra Mukhopadhyay (fr); ગોપાલ ચંદ્ર મુખોપાધ્યાય (gu); Gopal Chandra Mukhopadhyay (nl); Gopal Chandra Mukhopadhyay (ca); गोपालचंद्र मुखोपाध्याय (mr); Gopal Chandra Mukhopadhyay (de); Gopal Chandra Mukhopadhyay (ast); Gopal Chandra Mukhopadhyay (en); Gopal Chandra Mukhopadhyay (es); Gopal Chandra Mukhopadhyay (ga); கோபால் சந்திர முகோபாத்யாய் (ta) Indian butcher (1913–2005) (en); বাঙালি হিন্দু ব্যক্তিত্ব (bn); Indian butcher (1913–2005) (en); இந்திய தொழிலதிபர் (ta) Gopal Chandra Mukherjee, Gopal Patha (en); গোপাল পাঁঠা (bn)

गोपालचंद्र मुखोपाध्याय (बांग्ला: গোপালচন্দ্র মুখোপাধ্যায়; १९१३ - २००५), किंवा गोपाल पाठा हे एक भारतीय व्यावसायिक होते,ज्यांनी १९४६ मध्ये कुप्रसिद्ध डायरेक्ट ॲक्शन डे किंवा कलकत्ता दंगा दरम्यान मुस्लिम लीगच्या हल्ल्यांपासून हिंदू लोकांचे संरक्षण करण्यासाठी भारत राष्ट्रीय वाहिनी स्थापित केली.[][][][]

गोपालचंद्र मुखोपाध्याय 
Indian butcher (1913–2005)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९१३
कोलकाता
मृत्यू तारीखइ.स. २००५
कोलकाता
नागरिकत्व
व्यवसाय
  • butcher
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

प्रारंभिक आयुष्य

संपादन

गोपाल चंद्र यांचा जन्म कोलकात्याच्या बोब्बबाजार येथील मलंगा लेनमधील बंगाली हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब पूर्व बंगालच्या चुआडंगा जिल्ह्यातील जीवननगर उपजिल्हामध्ये आले आणि ते १८९० पासून कलकत्ता येथे स्थायिक झाले.[] क्रांतिकारक अनुकुलचंद्र मुखोपाध्याय यांचे ते पुतणे होते.[] लहानपणी, त्याला 'पाठा' (बंगालीमध्ये: बकरी) हे टोपणनाव मिळाले कारण त्याचे कुटुंब मांस विक्री करत होते.[] [] परंपरेने त्यांच्याकडे मांस विक्रीचे दुकान चालवण्याची जबाबदारी आली. व्यवसायाचा भाग म्हणून त्याला मुस्लिम व्यापाऱ्यांशी नियमितपणे संवाद साधावा लागत असे.[] मुखर्जींना भेट देणारे इतिहासकार संदीप बंदोपाध्याय यांच्या मते, पाठा यांनी "मुस्लिमांविरुद्ध कधीही द्वेष बाळगला नाही" परंतु "जेव्हा मुस्लिम दंगेखोर मध्य कोलकाता येथे पोहोचले तेव्हा त्यांना हिंसक होण्यास भाग पाडले गेले".[]

फाळणीपूर्व हिंसाचार

संपादन

१९४६ मध्ये, मुस्लिम लीगने १६ ऑगस्ट रोजी थेट कारवाईद्वारे पाकिस्तानच्या स्थापनेची हाक दिली. बंगालच्या मुस्लिम लीग सरकारने त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. कोलकाता जिल्हा मुस्लिम लीगने कोलकाता मैदानावर एका भव्य रॅलीसाठी एक तपशीलवार कार्यक्रम प्रकाशित केला ज्यामध्ये हातात तलवार घेऊन मोहम्मद अली जिना यांचे चित्र प्रकाशित करण्यात आले.[]

१६ ऑगस्ट रोजी सकाळी शहरात मारहाण आणि दंगलीच्या घटना सुरू झाल्या. गोपाल चंद्र खरेदीला जात असताना हा प्रकार त्यांनी पहिला. ते वापस घराकडे परत गेले, जिथे त्यांना मुस्लिम लीगचे स्वयंसेवक हातात लांब काठ्या घेऊन दंगे करताना दिसले. हिंदूंच्या हत्येची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी आपल्या जवळच्या माणसांना एकत्र केले आणि त्यांना सूड घेण्याचा किंवा निर्दयतेने प्रत्युत्तर देण्याची आज्ञा दिली. एका खुनाच्या बदल्यात दहा खून करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.[]

भारत राष्ट्रीय वाहिनीचे स्वयंसेवक चाकू, तलवारी, काठ्या आणि रॉडने सज्ज झाले. गोपाल चंद्र यांच्याकडे दोन अमेरिकन मेड ०.४५ बोअर पिस्तुल आणि काही ग्रेनेड होते. त्याने हे पिस्तूल दुसरे महायुद्धोत्तर कोलकाता शहरात तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांकडून मिळवले होते. त्यांच्या माणसांनी वापरलेली काही शस्त्रे भारत छोडो आंदोलनात खरेदी केली होती.[]

काही दिवसांच्या दंगलीनंतर मुस्लिम लीगने शांतता प्रस्तापित केली. मुस्लिम नॅशनल गार्डचे सदस्य शेख मुजिबुर रहमान यांच्यासह मुस्लिम लीगच्या विद्यार्थी संघटनेचे नेते जी. जी. अजमिरीने गोपालला रक्तपात थांबवण्याची विनंती केली.[][]

नंतरच्या आयुष्यात, गोपाल एक सामाजिक कार्यकर्ते बनले आणि निराधारांसाठी नॅशनल रिलीफ सेंटर नावाची धर्मादाय संस्था त्यांनी चालवली. त्यांनी त्यांच्या परिसरात कालीपूजा सुरू केली. कलकत्त्यात दरवर्षी पूजा सोहळ्यादरम्यान, अनेक लोक त्यांनी सुरू केलेल्या प्रसिद्ध पूजेला भेट देण्यासाठी येतात. २०१४ मध्ये, हिंदू एकता गोपाळ पंथाची शताब्दी साजरी केली.[][१०]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b Das, Suranjan (1994). "The 'Goondas': Towards a Reconstruction of the Calcutta Underworld through Police Records". Economic and Political Weekly. 29 (44): 2879.
  2. ^ a b Whitehead, Andrew (1 July 1997). "Duty does not permit repentance - The Butchers of Calcutta". Indian Express. 16 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 March 2011 रोजी पाहिले.
  3. ^ Sengupta, Debjani (2006). "A City Feeding on Itself: Testimonies and Histories of 'Direct Action' Day" (PDF). In Narula, Monica (ed.). Turbulence. Serai Reader. 6. SARAI. pp. 288–295. OCLC 607413832.
  4. ^ "Gopal Mukherjee: The man who led Hindu resistance and saved Calcutta from falling into Pakistani hands". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2022-11-11. 2023-02-17 रोजी पाहिले.
  5. ^ Bandyopadhyay, Sandip (2010). Itihasher Dike Fire Chhechallisher Danga ইতিহাসের দিকে ফিরে ছেচল্লিশের দাঙ্গা (Bengali भाषेत). Kolkata: Radical. p. 58. ISBN 978 - 81 85459-07-3.
  6. ^ Khan, Yasmin (2007). The Great Partition: The Making of India and Pakistan. Yale University Press. p. 66. ISBN 978-0-300-12078-3. 6 March 2011 रोजी पाहिले.
  7. ^ a b c d "Celebrating the centenary of a "divisive" figure". The Hindu. 18 August 2014. 21 August 2014 रोजी पाहिले.
  8. ^ a b c "Remembering Gopal Mukherjee, The Braveheart Who Saved Calcutta In 1946". १९ ऑगस्ट २०१७ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  9. ^ "Howrah keeps alive 'tantrik' puja tradition". Times of India. ८ मार्च २०१२ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  10. ^ "Celebrating the centenary of a "divisive" figure". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2023-03-28 रोजी पाहिले.