१६३५ साली समर्थ राजस्थानात जयपूरला आले.तिथे आचार्य गोपालदास त्यांचे शिष्य झाले.गोपालदासांवर समर्थांनी केलेला देशभक्तीचा संस्कार दीर्घकाळ टिकून होतो. १६७० साली औरंगजेबाच्या धर्मवेडास उधान आले.या देशात राहण्यासाठी हिंदूंनी राहण्यासाठी हिंदू जिझिया कर भरला पाहिजे, असे फर्मान औरंगजेबाने काढले.आचार्य गोपालदास यांनी हा कर भरण्यास नकार दिला.त्यांना अटक करून औरंगजेबाच्या दरबारात आणले गेले. तिथेदेखील त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आणि कर भरण्यास नकार दिला. औरंगजेबाने आपल्या मारेकऱ्यांना आचार्यांची हत्या करण्यास सांगितले.परंतु मारेकरी पोहोचण्यापूर्वीच गोपालदासांनी आपल्या कुबडीतील तलवार स्वतःच्या छातीत खुपसून आत्मसमर्पण केले.गोपाल दासांच्याच घराण्यातील १० वे पुरुष रामचंद्रवीर हे भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बरोबर होते .रामचंद्रवीरांचे सुपुत्र आचार्य धर्मेंद्र महाराज आजही धर्मजागृतीचे काम करीत आहेत.याचा अर्थ समर्थांनी १६३५ साली जयपुरात पेटवलेली देशभक्तीची ज्योत अजूनही तेवत आहे.

आचार्य गोपालदास