गाब्र्येल नारुतॉविच
(गेब्रियेल नारुतोविझ या पानावरून पुनर्निर्देशित)
गाब्र्येल नारूतोविच (पोलिश: Gabriel Narutowicz; १७ मार्च १८६५ - १६ डिसेंबर १९२२) हा पोलंड देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. पोलंडच्या १९१८ मधील स्वातंत्र्यानंतर योझेफ पियुसुद्स्कीच्या मंत्रीमंडळामध्ये समाजकल्याण मंत्री व परराष्ट्रमंत्री राहिलेल्या नारूतोविचने १९२२ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत आश्चर्यकारक विजय मिळवला. परंतु सत्तेवर आल्यावर केवळ ५ दिवसांनी त्याची हत्या करण्यात आली.
गाब्र्येल नारूतोविच | |
पोलंडचा राष्ट्रप्रमुख
| |
कार्यकाळ ११ डिसेंबर १९२२ – १६ डिसेंबर १९२२ | |
मागील | योझेफ पियुसुद्स्की |
---|---|
पुढील | स्तानिस्लाफ वोयसीचोव्स्की |
जन्म | १७ मार्च, १८६५ तेलशियाई, रशियन साम्राज्य (आजचा लिथुएनिया) |
मृत्यू | १६ डिसेंबर, १९२२ (वय ५७) वर्झावा, पोलंड |
धर्म | रोमन कॅथलिक |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत