गिरीधर गामांग

भारतीय राजकारणी

गिरीधर गामांग ( एप्रिल ८,इ.स. १९४३) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.ते फेब्रुवारी १७,इ.स. १९९९ ते डिसेंबर ६,इ.स. १९९९ दरम्यान ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री होते.त्यांनी इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकींमध्ये ओरीसा राज्यातील कोरापूट लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. पण इ.स. २००९च्या निवडणुकीत त्यांना प्रथमच पराभवाचा सामना करावा लागला.

एप्रिल १७,इ.स. १९९९ रोजी अटलबिहारी वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावेळी ते ओरीसाचे मुख्यमंत्री होते पण त्यांनी तोपर्यंत लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता.त्यामुळे ते लोकसभेचे सदस्य या नात्याने लोकसभेत हजर राहिले आणि त्यांनी वाजपेयी सरकारविरोधात मत दिले.त्यांची ही कृती वादग्रस्त ठरली.