गिरिजा व्यास

भारतीय राजकारणी
Girija Vyas (es); গিরিজা ব্যাস (bn); Girija Vyas (hu); Girija Vyas (ast); Girija Vyas (ca); Girija Vyas (yo); Girija Vyas (de); Girija Vyas (ga); गिरिजा व्यास (mr); Girija Vyas (fr); Girija Vyas (da); Girija Vyas (sl); ジリジャ・ビャス (ja); Girija Vyas (sq); گریجا ویاس (ur); جيريچا ڤياس (arz); Girija Vyas (nn); ഗിരിജ വ്യാസ് (ml); Girija Vyas (nl); ಗಿರಿಜಾ ವ್ಯಾಸ್ (kn); गिरिजा व्यास (hi); గిరిజా వ్యాస్ (te); ਗਿਰਿਜਾ ਵਿਆਸ (pa); Girija Vyas (en); Girija Vyas (nb); Girija Vyas (sv); கிரிஜா வியாஸ் (ta) política india (es); politikari indiarra (eu); política india (ast); política índia (ca); polaiteoir Indiach (ga); نویسنده و سیاست‌مدار هندی (fa); 印度政治人物 (zh); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag); politiciană indiană (ro); indisk politiker (sv); індійський політик (uk); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय राजनीतिज्ञ (hi); Indian politician (en-ca); இந்திய அரசியல்வாதி (ta); politica indiana (it); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); femme politique indienne (fr); India poliitik (et); भारतीय राजकारणी (mr); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); Indian politician (en); פוליטיקאית הודית (he); indisk politikar (nn); ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയപ്രവര്‍ത്തക (ml); Indiaas auteur (nl); política indiana (pt); հնդիկ քաղաքական գործիչ (hy); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); indisk politiker (da); política india (gl); سياسية هندية (ar); politikane indiane (sq); Indian politician (en-gb)

गिरिजा व्यास (जन्म ८ जुलै १९४६) एक भारतीय राजकारणी, कवयित्री आणि लेखिका आहेत. त्या चित्तोडगड मतदारसंघातून १५व्या लोकसभेच्या सदस्य होत्या आणि भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा होत्या.

गिरिजा व्यास 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजुलै ८, इ.स. १९४६
Nathdwara
नागरिकत्व
व्यवसाय
नियोक्ता
  • डेलावेर विद्यापीठ
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • Ministry of Housing and Urban Poverty Alleviation
  • ११व्या लोकसभेचे सदस्य
  • १३व्या लोकसभेचे सदस्य
  • १५वी लोकसभा सदस्य
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

वैयक्तिक जीवन

संपादन

गिरिजा व्यास यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी कृष्णा शर्मा आणि जमुनादेवी व्यास यांच्या घरी झाला.[]

तत्त्वज्ञानात डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्यांनी उदयपूरच्या मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ आणि अमेरिकेतील डेलावेर विद्यापीठात अध्यापन केले.

त्यांनी आठ पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी तीन कवितासंग्रह आहेत. एहसास के पार मध्ये त्यांच्या उर्दू कविता आहेत, सीप, समुद्र और मोती मध्ये त्यांच्या हिंदी आणि उर्दू कविता आहेत तर नॉस्टॅल्जिया ह्या संग्रहात इंग्रजी कविता आहेत.[]

राजकीय कारकीर्द

संपादन

१९८५ मध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून, त्या उदयपूर, राजस्थान येथून विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या आणि १९९० पर्यंत राजस्थान सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले. []

१९९१ मध्ये, त्या लोकसभेत उदयपूर, राजस्थानचे प्रतिनिधित्व करत भारतीय संसदेत निवडून आल्या आणि नरसिंह रावांच्या मंत्रालयात भारत सरकारमध्ये उपमंत्री (माहिती आणि प्रसारण) म्हणून नियुक्ती झाल्या.

  • १९९३: अध्यक्ष, अखिल भारतीय महिला काँग्रेस;
  • १९९३-९६:
    • सदस्य, सल्लागार समिती, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय;
    • सदस्‍य, सदन आणि परदेश विषयक स्‍थायी समिती
  • १९९६: ११व्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आल्या
    • सदस्य, राजभाषा समिती
    • सदस्य, महिला सक्षमीकरण समिती
    • सदस्य, पेट्रोलियम स्थायी समिती
    • सदस्य, सल्लागार समिती, गृह मंत्रालय
  • १९९९: १३व्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आल्या
    • सदस्य, पेट्रोलियम आणि रसायने समिती

२००१-०४ पर्यंत, त्या राजस्थान प्रांतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा होत्या. व नंतर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाच्या अध्यक्षा होत्या.

फेब्रुवारी २००५ मध्ये, काँग्रेस पक्षाने मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारवर वर्चस्व गाजवले, व त्यांना पाचव्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नामित केले. या पदावर त्या ऑगस्ट २०११ पर्यंत होती. २००८ मध्ये त्या राजस्थानमध्ये आमदार म्हणूनही निवडून आल्या होत्या. २०१३ मध्ये त्या गृहनिर्माण आणि शहरी गरीबी निर्मूलन मंत्री होत्या.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Rang-E-Ehsas".
  2. ^ "Girija Vyas: Poet and champion of women's rights".
  3. ^ "Girija Vyas Biography, Girija Vyas Bio". 5 October 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 November 2011 रोजी पाहिले.
  4. ^ "Girija Vyas Takes Charge As Minister For Housing And Urban Poverty Alleviation".