गाय बगळा,ढोर बगळा किव्हा गोचीडखाऊ(शास्त्रीय नाव: Bubulcus ibis , ब्युबल्कस आयबिस ; इंग्लिश: Cattle Egret, कॅटल इग्रेट) हा मध्यम आकाराचा बगळा असून मुख्यत्वे गायी-म्हशीचे कळप जिथे असतात तिथे वावरत असतो. या कळपांच्या सानिध्यात राहून तो गायी, म्हशींकडे आकर्षित होणारे किडे खातो. अशा प्रकारे एक प्रकारचा सह-अधिवास जपला जातो. म्हणूनच या बगळ्याला गाय बगळा असे म्हणतात. दिसायला लहान बगळ्यासारखा जरी पुर्णपणे पांढरा असला तरी या बगळ्याला गळ्यापाशी थोडासा पिवळा रंग असतो व विणीच्या हंगामात हा पिवळा रंग अधिक गडद होतो. इतर वेळेस साध्या लहान बगळ्यात व गाय बगळ्यात फरक शोधणे अवघड जाते. लहान बगळ्याची चोच काळी असते तर गाय बगळ्याची चोच पिवळी असते.

गाय बगळा
गाय बगळा
बगळ्याचे अंडे
शास्त्रीय नाव ब्युबल्कस आयबिस
(Bubulcus ibis)
कुळ बकाद्य
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश कॅटल इग्रेट
(Cattle Egret)
संस्कृत पिंगलिका
हिंदी गाय बगला,सुराखिया