गाइड (चित्रपट)
गाइड हा विजय आनंद दिग्दर्शित आणि देव आनंद यांनी निर्मित केलेला १९६५ मधील भारतीय द्विभाषिक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. ह्यात देव आनंद आणि वहिदा रेहमान यांच्या मुख्य भुमिका आहेत.आर.के. नारायण यांच्या १९५८ च्या द गाईड या कादंबरीवर आधारित हा चित्रपट राज (देव आनंद), एक टूर गाईड आणि रोझी (वहिदा रेहमान) यांची कथा कथन करतो, जी एका श्रीमंत पुरातत्वशास्त्रज्ञाची दमित पत्नी आहे.[१]
1965 film by Vijay Anand | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा | |||
निर्माता | |||
वापरलेली भाषा | |||
वितरण |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
गाईड हा बॉक्स ऑफिसवर प्रकाशित झाल्यावर अत्यंत यशस्वी चित्रपट होता व तेव्हापासून हा सर्वोत्कृष्ट बॉलीवूड चित्रपटांपैकी एक मानला जातो.[२] विशेषतः आनंद आणि रेहमान यांच्या कामगिरीसाठी तसेच एस.डी. बर्मन यांच्या संगीतासाठी याला व्यापक समीक्षकांची प्रशंसा मिळाली.
१४ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, गाइडला आघाडीची नऊ नामांकने मिळाली आणि अग्रगण्य ७ पुरस्कार जिंकले ज्यात ४ प्रमुख श्रेणी (सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (विजय), सर्वोत्कृष्ट अभिनेता (देव), आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (रेहमान). अश्या प्रकारे असे करणारा फिल्मफेर पुरस्कारांच्या इतिहासातील हा पहिला चित्रपट ठरला ज्याला हे चार पुरस्कार मिळाले. ३८ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी भारताची अधिकृत प्रवेश म्हणूनही त्याची निवड करण्यात आली होती, परंतु तो नामांकित म्हणून स्वीकारला गेला नाही. २०१२ मध्ये, टाईम मासिकाने "सर्वोत्कृष्ट बॉलीवूड क्लासिक्स" च्या यादीत ह्याला चौथ्या क्रमांकावर सूचीबद्ध केले.[३]
संगीत
संपादनगाणे | गायक | गीतकार |
---|---|---|
"आज फिर जीने की तमन्ना है" | लता मंगेशकर | शैलेंद्र |
"दिन ढल जाये" | मोहम्मद रफी | |
"गाता रहे मेरा दिल" | किशोर कुमार आणि लता मंगेशकर | |
"क्या से क्या हो गया" | मोहम्मद रफी | |
"पिया तोसे नैना लागे रे" | लता मंगेशकर | |
"सैया बेइमान" | लता मंगेशकर | |
"तेरे मेरे सपने" | मोहम्मद रफी | |
"वहान कौन है तेरा" | एस.डी. बर्मन | |
"हे राम हमारे रामचंद्र" | मन्ना डे आणि कोरस | |
"अल्ला मेघ दे पाणी दे" | सचिन देव बर्मन |
संदर्भ
संपादन- ^ "Guide; a human odyssey". 27 May 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 June 2015 रोजी पाहिले.
- ^ "BoxOfficeIndia Top Earners 1960-1969 (Figures in Indian rupees)". 3 January 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 June 2015 रोजी पाहिले.
- ^ Guide - 1965 - Best of Bollywood
|access-date=
requires|url=
(सहाय्य)