गांधी नावाच्या संस्थांची यादी
शिवाजी नावाच्या संस्था या लेखात शिवाजीचे नाव असलेल्या संस्थांची एक (अपूर्ण) यादी वाचता येईल. 'गांधी' घराण्यातले नाव असलेल्यासुद्धा अनेक संस्था भारतात आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अन्य गांधी यांच्या नावांवरून नामकरण झालेल्या संस्थांची यादी पुढे दिली आहे. भारत सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या ५८ योजनांपैकी १६ योजना, राजीव या नावाने, आणि ८ योजना इंदिरा या नावाने पुनीत झाल्या आहेत. या बहुतेक सर्व सरकारी योजनांची नावे पुढील यादीत सापडतील. ही भविष्यातल्या लेखांची अनुक्रमणिका आहे असे समजावे.
अनेक कल्याणकारी योजना, संस्था आणि अगदी रस्ते, पूल आणि चौक यांनाही नेहरू-गांधी परिवारातील व्यक्तींची नावे देण्याची मक्तेदारी काँग्रेसने आजही (११ जुलै २०१३) पूर्णपणे राखली. आजच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात फक्त महिलांसाठीच असलेल्या विद्यापीठाच्या स्थापनेचा निर्णय केला. तसेच राजीव गांधी यांच्या नावाने राष्ट्रीय हवाई वाहतूक विद्यापीठ स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. या दोन्ही ठरावांवर वर्तमानपत्रांनी सडकून टीका केली आहे.
इंदिरा गांधी
संपादनमहात्मा गांधी
संपादनराजीव गांधी
संपादन४. इतर गांधी
संपादन- कच्ची आयुर्वेदिक औषधविक्रीची मुंबई/पुण्यातील दुकाने : काला गांधी, कालीदास गांधी (पुणे कॅॅंप), किरण गांधी (धारावी), गोरा गांधी (ताडदेव), गोरागांधी दवाखाना (नळ बाजार, चर्नी रोड, परळ) जे.एम. गोरागांधी (डंकन रोड), चुनीलाल छगनलाल गांधी, नाझ गांधी (मुंबई सेंट्रल), फरहान गांधी (शिवाजीनगर-गोवंडी रोड), फैज गांधी, मिलन गांधी, (जोगेश्वरी पश्चिम), मोहम्मद इब्राहीम गांधी (इब्राहीम गांधी चौक-पायधुनी), लालुभाई व्रजलाल गांधी (अहमदाबाद)
- कस्तुरबा खादी ग्रामोद्योग विद्यालय
- कस्तुरबा गांधी चौक (जुने नाव सी.पी.टॅंक), मुंबई.
- कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना, भारतातील सर्व राज्यांत. (२०१३ साली) एकट्या महाराष्ट्रात ४३ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये आहेत. तर संपूर्ण भारतात, (मार्च २०१३पर्यंत) ३५०० कस्तुरबा गांधी निवासी बालिका विद्यालये उघडली गेली आहेत, आणि त्यांत ३.६ लाख मुली मोफत शिक्षण घेत आहेत. मुलींपैकी २९% अनुसूचित जातीच्या, २६५ अनुसूचित जमातीच्या, २६५ इतर मागासवर्गीय जातींच्या, ९% मुसलमान आणि १०% दारिद्ऱ्यरेषेखालील कुटुंबांतील आहेत. या मुलींचा सर्व खर्च शाळा करते. शिवाय त्या प्रत्येक मुलीला वरखर्चाला दरमहा २०० रुपये दिले जातात.
- कस्तुरबा गांधी रोड, बोरीवली (मुंबई); अहमदाबाद; जामनगर; पुणे; बंगलोर; राजकोट; कॉनॉट प्लेस (नवी दिल्ली),
- प्रियंकाजी महिला उद्योग संस्था, पुणे
- बा, बापू कार्यकर्ता पुरस्कार
- वाच्छा (Vatcha) गांधी मार्ग (मुंबई)
- मोदी सोराबजी वाच्छागांधी अगियारी, मुंबई
- डॉ. व्ही.बी. गांधी रोड, मुंबई (जुने नाव फोर्बस स्ट्रीट)
- शामळदास गांधी रोड (जुने नाव प्रिन्सेस स्ट्रीट), मुंबई
- संजय गांधी उद्यान (जुने नाव बोरीवली नॅशनल पार्क, त्याहून जुने नाव कृष्णगिरी उपवन), मुंबई
- संजय गांधी औष्णिक विद्युत केंद्र, बिरसिंहपूर (मध्य प्रदेश)
- संजय गांधी रस्ता, रेल्वे स्टेशनजवळ (पुणे)
- संजयनगर (भोपाळमधील एक विभाग)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादननेहरू-गांधी-नेहरू-गांधी [१][permanent dead link]
गांधीमार्ग [२]
नेहरू-इंदिरा-राजीव योजना [३] Archived 2016-03-04 at the Wayback Machine.
(अपूर्ण)